Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

शेट [सेधः = शेट ], सेध म्हणजे शेंपूट. शेट उपट म्हणजे शेंपूट उपट. माणसाला शेंपूट नाहीं, सबब उपस्थीय केस.

शेटमारी [ शिट् अनादरे. शेट = अनादर. मारि=मृत्युप्राय रोग ] या दोन्ही शब्दांनीं अनादर व तिरस्कार दाखविला जातो. हे दोन्ही उच्चार अपशब्द नाहींत. Damn, plague take thee ह्या वाक्यांतील Damn व plague ह्या शब्दांप्रमाणेंच वरील शब्द आहेत.

शेंडी १ [ शिखंडि = शिअंडि = शेंडी ] (स. मं.)

-२ [ शिखंडि = सिकंडि = सिअंडि = सेंडी = शेंडी ] शिखंडि = अल्पशिखा. (ग्रंथमाला)

शेण १ [छगण = शगण = शअण = शाण = श्याण = शेण ] (ग्रंथमाला)

-२ [ शकन् ( गाईचें शेण ) = शअण = शाण = शेण ] शाण हा उच्चार अद्याप आशिष्ट करतात. ( भा. इ. १८३३)

शेणकूट [ शेणगंड पहा ]

शेणगंड [ गंड = वीर, शूर पुरुष, श्रेष्ठ पुरुष.
शेणगंड = शेणवयांतील उत्तम पुरुष
( विपरीत लक्षणेनें, अधम शेणवई)
न्हावगंड = स्नापिकगंडः (उत्तम न्हावी, विपरीत लक्षणा)
ब्राह्मणगंड = उत्तम ब्राह्मण
(विपरीत लक्षणेनें वाईट अधम ब्राह्मण )
शेणकूट = (कूट = मुख्य) विपरीत लक्षणेनें अधम, नीच शेणवई ] (भा. इ. १८३२)

शेणवड १ [श्यैनंपाता (शिकार) = शेणवड. शकन्+ पाता = शेणवड ] होळीच्या सणांत शिकार करीत. श्येनपासून हि शेण शब्द निघती, व शकन् पासून हि शेण शब्द निघतो.

-२ [ शकन् + आवृत्ति = शेणावड = शेणवड ]

-३ [ शकपाता ] ( धूळवड पहा)

शेतखाना [ शकनखनिः = शेणखाना, शकृतखनिः = शेतखाना ] शकृतखनि: = म्हणजे गुवाचा खड्डा.

शेतगणा [क्षेत्रगणः=शेतगणा] गांवच्या सर्व शेतांचा समूह.

शेतभात [ क्षेत्रभक्तिः=शेतभात ] भक्ति म्हणजे तुकडा, भाग. भात म्हणजे तांदूळ या शब्दाचा येथें कांहीं एक संबंध नाही. (भा. इ. १८३४)

शेती [ क्षेत्रपत्यं = शेती ]

शेंदणें [ स्यन्दनं= शेंदणें, सेंदणें] (भा. इ. १८३६)

० शीर, ० सर [ शील = शीर = सीर = सर.
प्रमाणशीलं = प्रमाणशीर, प्रमाणसर.
रीतिशीलं = रीतशीर, रीतसर ]

शीळ [ शीश् (शब्द: ) ] whistle ( शीट १ पहा)

शुक् [ शुक् to move गतौ to gate away = शुक् ] get away, to a cat

शुक्क्, पुक्क् [ पुक्क् = शुक्क् ] पुक्क् जाणें असा संस्कृत धातू आहे. मांजराला शुक्क् किंवा षुक्क् म्हणून महाराष्ट्रांत हांकलतात. ज्या वेळेस संस्कृत भाषा बोलण्यांत होती म्हणजे पाणिनीच्या वेळेस मांजराला जा, नीघ, असें सांगावयाचें म्हणजे षुक्कस्व असें रूप योजीत. त्यावरून मराठींत आज्ञार्थोंचें द्वितीयेचें एकवचन षुक्क असें परंपरमें आलें आहे. ह्या मराठींत षुक्क रूपावरून पाणिनीय षुक्क, ष्वक्क, ष्वस्क् स्वस्क् हे धातू रोजच्या बोलण्यांतले होते, केवळ पाणिनिकल्पित नव्हते, हें उघड होतें. इतकेंच नव्हे तर सिद्ध होतें. मराठी व्युत्पत्तीवरून पाणिनीय धातुपाठावर प्रकाश हा असा पडतो. (भा. इ. १८३५)

शुंभ [ शोभार्थे ] निव्वळ शोभेचा जो माणूस तो शृंभ. (ग्रंथमाला)

शेक [ सेक = शेक ] अग्निसेक: - आगीचा शेक = अग्नीयशेक ( भा. इ. १८३४)

शेखी [ शेक्ष्यं skill, learning = शेखी ] प्रौढी.

शेगटवणी [ शिग्रुकपानीयं = शेगटवणी ] शेगटाच्या शेंगाचा काढा.

शेगडी [ शकटी = शगडी = शेगडी ] अंगारशकटी = आगीची शेगडी ( भा. इ. १८३६)

शेगवा [ शिग्व्रा] (शेवगा पहा)

शेज [ शय्या = शेज] ओळी, अन्योन्यसंनिकर्ष.
या पदानां परान्योन्यं मैत्री शय्येति कथ्यते ।
(प्रतापरुद्रीययं - काव्यप्रकरणम्)
पुस्तकें एका शेजेनें लावणें म्हणजे ओळीनें एकमेकांना चिकटून ठेवणें. (भा. इ. १८३४)

शेजार १ [ सज्जगृह = सज्जार = सेजार = शेजार ] शेजार म्हणजे जवळचें घर. (भा. इ. १८३६)

-२ [ सज्जकार = सज्जार = सेजार = शेजार ] सज्जकार म्हणजे जवळीक, जवळ करणें. त्या पुस्तका शेजारीं हें पुस्तक्र ठेव = तस्य पुस्तकस्य सज्जकारे इदं स्थापय.
सज्ज चिकटणें, जवळ होणें. (भा. इ. १८३६) 

-३ [ शय्यागृह = शेजार, सेजार] (भा. इ. १८३६)

शिवण [ श्रीपर्णी = शिवण ] वनस्पति.

शिवण गंभारी [श्रीपर्णी = शिवणी = शिवण (वनस्पति)] ( भा. इ. १८३७ )

शिवणें, उसवणें [सो व उत्सो ह्या धातूंपासून शिवणें व उसवणें निघाले आहेत ] ( ग्रंथमाला)

शिवर ( रा-री-रें ) [ शपिरः = शविरा = शिवरा ] शिव्या देणारा, तोंडाळ. (भा. इ. १८३४)

शिवाशवणें [ सिमसिमाय = शिवशिव ( णें ) ] ( भा. इ. १८३३)

शिंवशिंवणें [ चिमिचिमायते = शिंवशिंवते] ( भा. इ. १८३४)

शिवळ [ शीश् (शब्द: ) ] (शीट पहा)

शिवी [ छिका = शिवी ]

शिसव, शिसू [ शिंशपा = शिसवा = शिसव = शिशवी] ( भा. इ. १८३४)

शिसवी [ शिंशपा = शिसवी = सिसवी (वृक्ष ) ]

शिसार [ शीर्षार्शः = शिसार ] headache.

शिसू १ [ शिंशपा ] (शिसव पहा)


-२ [ सुशवी = शिसवी, शिसव, शिसू ( tree ) ]

शिळक [ श्लिष् १ दाहे ] ( शिळख पहा)

शिळख [ श्लिष् १ दाहे. श्लिप्=शिळख, शिळक, शिणक ] भाजून वेदना होतात तशा वेदना. ( धा. सा. श. )

शिळें [ सीतल = सीअळ = सीळ = शिळ (ळा-ळी-ळे) ] (भा. इ. १८३३)
शी ( प्रत्यय ) - सा-सें-
[ भग्नदेशीय = भंगलीशी, भंगलासा, भंगलेंसें.
नग्नदेशीय = नागवासा, नागवीशी, नागवेंसें.
पुत्रकदेशीय = पोरगासा, पोरगीशी, पोरगेसें.
वृद्धदेशीय = वुड्ढासा, बुढ्ढीशी, बुढ्ढेंसें ]

शीट १ [ शीश् (शब्द: ) = शीट, शीळ, शेळ, शिवळ ] शीश् असा शब्द म्हणजे शीळ.

-२ [ शिंघ् १ आघ्राणे. शिक्थ] पांखरांचा गू. ( धातुकोश-शिट १ पहा)

शीण १ [ स्विन्न = सिण्ण = सीण = शीण ] सीण असा उच्चार कित्येक करतात. ( भा. इ. १८३२ )

-२ [ शीर्ण = शीण ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ६७)

शीत [ सिवध = सिथ्ध = शित्त = शीत ] (ग्रंथमाला)

शीर १ [ शिरस = शीर (नपुं.) ] 

-२ [ शिरा = शीर ] (स. मं.) म. धा. २५

शिपतर [ शिफास्तर = शिपतर ] शिफास्तर म्हणजे लवचीक फांद्यांचें टोपलें. शिफा तरुप्ररोहः 

शिबें [ सिध्म = सव्व = शिबें ] (भा. इ. १८३४ )

शिमगा [ शृंगार = शिमगाअ = शिमगा ] शृंगार म्हणजे काम, कंदर्प. शिमगा म्हणजे कंदर्पक्रीडा, लक्षणेनें कंदर्पक्रीडेचा वार्षिक दिवस म्हणजे शिमगा. शिमगा करा = शृंगारं कुरु. शृंगार म्हणजे कंदर्पक्रीडेचीं वस्त्रादिक भूषणें. ( भा. इ. १८३३)

शिरकणें [ स्त्रेकृ गतौ । धातुपाठ, भ्वादिः । स्नेक्=शिरक् ] तो इकडे शिरकत नाहीं म्हणजे गमन करीत नाहीं. शिरणें धातू, निराळा. ( भा. इ. १८३४)

शिरचेंच्या [ छिद् ७ द्वैधीकरणे. शीर्पछेद्यः = शिरचेंच्या ] ( धा. सा. श. )

शिरड [श्रेधी, श्रेढी = शिरड ] मडक्यांची शिरड म्हणजे एकावर एक ओळ, रांग, उतरंड.

शिरणें [ श्रि = शिर ( शिरणें ). श्रि म्हणजे जाणें ] तो घरांत शिरला = सः गृहं श्रितः ( भा. इ. १८३६ )

शिरशिरी [ चिरि ५ हिंसायाम्] ( धातुकोश-शिर १ पहा)

शिरा १ [ शै, श्रै, श्रा, श्री १ पाके ] (शिज ५ पहा )

-२ [ श्रायः = शिरा ] पक्वान्न, पाक.

-३ [ श्रा = शिरा ] कोणत्याही पदार्थाचा पाक. (भा. इ. १८३३)

शिराणी [ श्रि प्राप्तौ. श्रयणी = शिरअणी = शिराणी ] प्राप्ति, आश्रय. ( भा. इ. १८३३)

शिरावेध [ सिराव्यधः = शिरावेध ] (भा. इ. १८३७)

शिराळें [ शिरालं = शिराळें. शिरालं शिरासंपन्नं फलं ] फलविशेष.

शिरें १ [ क्षीरं (juice ) = सिरें, शिरें ] juice for ink.

-२ [ श्रृतं = शिरें (शाई करण्याचें ) ]

-३ [ श्रीञ् पाके. श्रीः = शिरा (गव्हाचा )
श्री = शिरें (पकवलेला शाईचा रस )

शिलक [ शिल (कापणीनंतर शेतांत राहिलेले दाणे)
अकच् = शिलक, शिल्लक ] remaining portion leavings.

शिल्लक [ शिल (कापणीनंतर शेतांत राहिलेलें धान्य) = शिल्लक ] (शिलक पहा)

शिखराथिला [ शिखरान्वित + ल = शिखराधिला ] आथिला प्रत्ययान्त शब्द सदा विशेषणें असतात, क्रियापदें नसतात.

शिंगरूं [ शिशुकतरं = शिउगअरं = शिगरूं = शिंगरूं ] शिंगरूं म्हणजे अश्वशिशु.

शिंगाडा [ शृंगाटक = शिंगाडअ = शिंगाडा ] (भा. इ. १८३३)

शिजणें [ शिजि अव्यक्ते शब्दे ] भात वगैरे शिजतांना जो अव्यक्त शब्द होतो, त्याच्या अर्थी. (ग्रंथमाला)

शिजे [ षिधु संराद्धो । संराद्धिर्निष्पात्तिः । अन्नं सिध्यति = सिज्जइ = अन्न सिजे शिजे ] ( भा. इ. १८३३ )

शिट् [ शिट् अनादरे = शिट्, छित्, छत्, छे, छीः ] (ग्रंथमाला)

शिटी [ क्ष्विदा = सिटी = शिटी. क्ष्विद् to whistle ]

शिडकाव १ [ शीकृ १ सेचने. शीकापातः ] ( धातुकोश-शिडकाव ३ पहा)

-२ [ शीक् १० आमर्षणे. शीकापातः=शिकाव = शिडकाव ( डागमः )] ( धा. सा. श.)

शिडी [ श्रेढि = शिडी ]

शिणक [ श्लिष् १ दाहे] ( शिळख पहा)

शितवड [ सिक्थावर्त = शितवड ] शितांचा घोळ.

शितें [ सीमन्तक = शितें ( भांग ) ]

शिंदळ [ शिस्नदेवनी ] मैथुनाची आवड असणारी. ( धातुकोश-शिंदळ पहा)

शिदोरी [ सिद्ध + आहार्यं = सिदोरी, शिदोरी ] शिदोरी म्हणजे शिजवलेलें अन्न.

शिनळ १ [ शिस्नदेवनी ] मैथुनाची आवड असणारी. ( धातुकोश-शिंदळ पहा)

-२ [ छिन्ना = शिन (+ स्वार्थक ल) = शिनळ ] छिन्ना म्हणजे जारिणी.

शिपटी १ [ शिफा ] (शेपाटी पहा)

-२ [ शिफा = शिप + टी (हृस्वत्व दर्शक ) = शिपटी ] शिपटी म्हणजे झाडाचा फोक. शिफा म्हणज तरुप्ररोह.

-३ [ शिफा = शिप. शिप + हृस्वत्वदर्शक टी = शिपटी. मूलादूर्ध्वं गता शिफालता ] शिपटी म्हणजे फेकाटी.

शिपणें, शिंपणें [ सिन्व् = सिप्प = शिपणें, शिंपणें. सिन्व् = सेचने ] (भा. इ. १८३६)

नागझिरी - नाग (लोकनाम) - नागझरी. ७ खा मा

नागडुली - नाग (लोकनाम) - नागदुलि. खा म

नागण - नाग (लोकनाम) - नागवनं.२ खा म

नागद - नाग (लोकनाम) - नागपद्रं. खा म

नागपाडा - (जांबुळपाडा पहा)

नागपाडा - नागपद्रक = नागपड्डअ = नागपाडा. ठाणें किंवा कुलाबा जिल्ह्यांत ह्या नांवाचें एक क्षुद्र गांव आहे. नांवावरून दिसतें कीं, पूर्वी एथें नाग लोकांची वस्ती होती. ( भा. इ. १८३३)

नागपुर - नाग (लोकनाम). २ खा म

नागरगांव - नागरग्रामं ( नाग लोकांवरून ). मा

नागलवाडी - नाग (लोकनाम) - नाग - र-वाडी. २ खा म

नागवण - नाग (लोकनाम) - नागवनं. खा म

नागवें - नाग ( लेकिनाम ) - नागवहं. खा म

नागशेवडी - नाग (लोकनाम) - नागाशेवन्तिका. खा म

नागाथली - नागस्थली (नागांचें गांव). मा

नागांव - (नयगांव पहा).

नागूर - नागपुर = नागूर.

नाटोर - नट. (कर्णाटक पहा)

नाडगांव - नाट (लोकनाम) - नाटग्रामं. खा म

नाडसें - नाट (लोकनाम ) - नाटकर्ष. खा म

नाडी - नाट (लोकनाम) - नाटी. खा म

नाणें - ज्ञानं ( बौद्धज्ञानं ) - ज्ञानकं. खा म

नाणें - ज्ञानवनं ( बौद्धांचें ज्ञान ज्या वनांत मिळतें त्या वनांतील गांव). मा

नाणोली - ज्ञानपल्ली. मा

नाथरी - नाथपुरी. खा म

नाथें - नाथकं. खा म

नांद - नंदक (नांदुर्खी) - नंदकं. २ खा व

नांदगांव - सं. प्रा. नंदिग्राम. ( शि. ता. )

नांदगांव - नंदक (नांदुर्खी ) - नांदग्रामं. खा व

नांदगांव - नंदिग्राम. मा

नांदराघाट - (गांवावरून). खा प

नांदरें - नंदकपुरं. ६ खा व

शाडू [ शाद: (कर्दमः ) = शाडू ]

शाण [ छगण ] ( शेण पहा)

शानदार १ [ सान्द्रं ] (छानदार २ पहा)

-२ [ सान्द्र ] (छानदार ३ पहा)

शांदार [ सांद्र ] (छानदार ३ पहा)

शाहजोग [ साधुयोग्य = साहुजोग = शाहजोग ]
वाटेल त्या सीध्या माणसास मिळणारी हुंडी.

शाहाळें [ शालूकं ] ( शाळे पहा)

शाळू १ [ शीतालुः = शिआळू= शाळू. शीतं न सहते शीतालुः ] शाळू सोबती म्हणजे कष्ट मेहेनत ना सोसणारे स्नेही.

-२ [ शयाळु = श्याळु = शाळू ] (भा. इ. १८३४)

शाळें [ शालूकं = शाळें, शाहाळे. हाकार उच्चारसौकर्यार्थ ] नारळाला* शाळें, शाहाळें म्हणतात.

शिकंदर - हा फारसी शब्द अलेक्सेंदर या ग्रीक शब्दापासून निघाला आहे हें सांगावयाला नको च. निघण्याचा प्रकार असा - अलेक्सेंदर = अलेक्सिंदर = कसिंदर = सिकंदर = शिकंदर. 
अले = अल् अरबी आर्टिकल झालें; व अलसिकंदर असा शब्द बनला. पैकीं अल् हें आर्टिकल उडून नुसता सिकंदर शब्द राहिला. पुरातन शिलालेखांत अलिकसुंदर असें संस्कृत रूप या शब्दाचें आढळतें. “ नशीब शिंकंदर ” अशी म्हण फारसींतून मराठीत रूढ झालेली सर्वांना माहीत आहे च. (भा. इ. १८३२ ) 

शिंकणें [ शृंख् ( शिकणें ) = शिंक ( आपस्तंबीय धर्मसूत्र ) ] ( भा. इ. १८३४)

शिकरण [ शिखरिणी = शिकरण (केळ्यांची वगैरे) ] (भा. इ. १८३४)

शिंकरणें [सिंघाणकरणं = शिंखाणअरणँ = शिंकारणें = शिंकरणें ] शिंकरणें म्हणजे नाकांतला मळ काढणें. ( भा. इ. १८३६)

शिकरी [ शिक्यराजिः = शिकराई = शिकरी. शिक्यरज्जुः = शिकराई = शिकरी ] रहाटाच्या घडमाळेच्या शिंक्यांचा दोर.

शिंका [ छिक्का = शिंका ( अनुस्वारीकरण ) ] ( भा. इ. १८३३ )

शिखर [ शीर्ष = शिखर (र व प यांचा व्यत्यास ) ] शिखर म्हणजे डोकें.

नयदाभाडी - नदीदर्भवाटिका. खा नि

नयाडी मुंजवाड - नदी-नदीवाटिका = नयाडी खा नि

नरकोळ - नरक (असुरनाम) - नरकपल्लं. खा म

नरढाणें - नल (व्यक्तिनाम ) - नलधानं. २ खा म

नरव्हाळ - नल (व्यक्तिनाम) - नलवाहालि. खा म

नरसीपुर - नरसिंहपुरं. खा म

नरूळ - नल (व्यक्तिनाम) - नलपल्लं. खा म

नर्मदा - नर्मदा. खा न

नवडणें - नर्मट (सूर्य) - नर्मटवनं. खा म

नवडाली - नर्मट (सूर्य) नर्मटपल्ली. खा म

नवल - नकुल ( मुंगूस ) - नकुलकं. खा इ

नवलगांव - नकुल ( मुंगूस) - नकुलग्रामं = नउलगांव = नवलगांव. खा इ

नवलपुर - नकुल (मुंगूस) - नकुलपुरं ३ खा इ

नवलाणें - नकुल (मुंगूस) - नकुलवनं. खा इ

नवसरी - नव ( अभ्रक ) - नवसरी. खा नि

नवसरी - सं. प्रा. नवसारिका. (शि. ता.)

नवापाडा - (जांबुळपाडा पहा)

नवापुर - नव (अभ्रक ) - नवकपुरं. खा नि

नवेगांव - नव (अभ्रक ) - नवग्रामं. ३ खा नि

नवेगांव घाट - गांवावरून. खा प

नसरदपुर - } खा मु
नसिराबाद - }

नळ - सं. प्रा. नळवाडी. कुलाबा. ( शि. ता.)

नळकसें - नल (व्यक्तिनाम) - नलकर्ष. खा म

नळवडी - सं. प्रा. नळवाडी. धारवाड. (शि. ता.)

नळवडेवाडी - सं. प्रा. नळवाडी. फलटण, कोरेगांव. ( शि. ता.)

नळवणें - सं. प्रा. नळवाडी. पुणें. (शि. ता.)

नळवें - नल (व्यक्तिनाम) - नलवहं. २ खा म

नळवाड - नल (व्यक्तिनाम) - नलवाटिका. खा म

नळवाण - नल (व्यक्तिनाम) - नलवाहनं. खा म

नळगव्हाण - नल (व्यक्तिनाम) - नलगवादनी. खा म

नाकोड - नाक (स्वर्ग ) - नाकवाटं. खा म

नागछळ - नाग (लोकनाम) - नागस्थलं. खा म

नागझर - नाग (लोकनाम ). खा म

नागझरी - नागासरित् = नागझरी.
पुण्यांत नागनाथाच्या देवळाजवळील ओढा.

शपत् [ शंवत् ( अंतःकरणे, अभिमुख्ये ) = शपत् ( निपात ) ] येईल तर शपत् इत्यादि वाक्यांत हा निपात मराठींत आढळतो. (भा. इ. १८३४)

शंभरावा [ शततमः = शंभरावा. त्रिंशत्तमः = तिसावा. दहावा, नववा इ. ]

शरम [ श्रम् ४ खेदे. श्रमिः = शरम ] ( धा. सा. श. )

शरमणें [ श्रम् तापे खेदेच । श्रम = शरम ] त्याला शरम वाटली = त्याला खेद वाटला. फारसी शरम शब्द मराठींत स्त्रीलिंगी असल्यामुळे हा प्राकृत शरम शब्द हि स्त्रीलिंगी झाला आहे. ( भा. इ. १८३३ )

शारिर [ शरीर ( सं. ) = शरिर ] (स. मं.)

शर्य्यत [ श्वर्त् गतौ श्वर्तिः = शर्यत ] race. फारसी नाहीं.

शहाण १ [ शिक्षाज्ञ = सिहाणु = सिहाण ( णा-णी-णें ) = शहाण ( णा-णी-णें ) ] सिहाण शब्द ज्ञानेश्वर व दासोपंत योजतात. (भा. इ. १८३२ )

-२ [ विचक्षणवतीं वाचं वदेत् (ऐतरेय ब्राह्मण ) वेदकालीं कोणालाही कांहीं काम सांगतांना असे शब्द योजीत :-
" देवदत्त, विचक्षण, गां आनय ” म्हणजे देवदत्त या संबोधनापुढें विचक्षण हें विशेषण उच्चारीत. (विचक्षण) चक्षण = सहण = शहाण (णा-णी-णें). देवदत्ता, शहाण्या, गाय आण ] हा प्रयोग सध्यांही आपण मराठींत करितों. ( भा. इ. १८३४)

-३ [ सज्ञानः = सयाणा = शहाणा ] व्रजभाखेंत सयाने (शहाणा) असा अपभ्रंश आहे.

शहारा [ सीत्कार: = सीयारा (ज्ञानेश्वरी ) = शहारा ] shivering.

शा - ( सा २ पहा)

शाई [ श्यावा = श्याई = शाई. शामिका = शाइआ = शाई ] शाई म्हणजे काळा रस हा प्रथन अर्थ. नंतर कोणत्याहि रंगाच्या लिहिण्याला योग्य अशा रसास शाई हें नांव पडले. ( भा. इ. १८३४ )

धुळोद = धूलिपद्रं. खा नि

धूड - ध्रुव (पाक्षीविशेष) - ध्रुववाटं. खा इ

धूळपिंपरी - धूलिपीपरिका. खा नि

धोंगडें - धुंक्षा ( करढोंक) - धुंक्षावाटं. खा इ

धोडखेडें - अध्यूढ (शिव)- अध्यूढखेटं. खा म

धोडखेडें - धोड (सर्पविशेष) - धोडखेटं. खा इ

धोडप - धोड (सर्पविशेष) - धोडपं = धोडान् धालयति. खा इ

धोड़ी - धोड (सर्पविशेष) - धोडिका. खा इ

धोडी - अध्यूढ (शिव)-अध्यूढा(अलोप). खा म

धोत्र - धत्तूर. खा व

धोम - वांई जवळ धोम महाबळेश्वर म्हणून गांव आहे. तें धौम्य ऋषीनें वसविलें अशी आख्यायिका आहे. वस्तुतः हा शब्द धूम या देशवाचक शब्दावरून निघालेला दिसतो. धूमादिभ्यश्च ( ४-२-१२७ ). वुञ् प्रत्यय लागून धौमक होतें. त्याचें प्राकृत ओम. दक्षिणेंत वसाहती करतांना उत्तरेकडील देशनामें प्रचलित झाल्याचें हें उदाहरण आहे. (भा. इ. १८३२)

 

नकाणे - नखिन् (सिंह ) - नखिवन. खा इ

नकाणे - नक (दारुकपुत्र) - नकवनं, नकस्थानं. खा म

नगरदेवळें - नगर-देवलकं. ३ खा नि

नगांव - नग (पर्वत ) - नगग्रामं. ८ खा नि

नझरदेव - नागझर देव. खा न

नटावद- नट (व्रात्यक्षत्रिय ) - नटावर्त. खा म

नटावर -नट (व्रात्यक्षत्रिय) - नटावर्त- खा म

नडवाडें - नट (व्रात्यक्षत्रियं) - नटवाटकं. २
नडिया, नडियाद - नट. (कर्णाटक पहा). खा म

नंदगांव - नंदक (नांदुखीं ). २ ख व

नंदलवाडा - नंद (यादवनाम) - नंदपल्लीवाटक: खा म

नंदाणें - नंदक (नांदुर्खी ). खा व

नंदाळे - नंदक (नांदुखीं). २ खा व

नंदुरबार - नंदक (नांदुखीं ) - नंदकपुरद्वारं. खा व

नयगांव - नैगमः (बाजारपेठेचें गांव, रहदारीचें गांव)
= नायगांव = नायगांव = नागांव.