Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

रेटा [ रीढा (अपमान) = रेटा, ( रेटणें म्हणजे अवमानानें पलीकडे लोटणें ) ]

रेड [रेडा, रेडी, रेडें, रेडकू, रेडकी ) रिष्यते इति रेट् । रिषति हिंसार्थः । यज्ञकर्मणि या रिष्यते सा रेट्. ज्या म्हसराला यज्ञकर्मात मारतात तें रेट्, रेड्, रेट् = रेड् = रेड (डा-डी-डें) रेडसि ६-१८ माध्यंदिनीय वाजसनेयसंहिता. ] ( भा. इ. १८३३)

रेती [रांति ( कीट, गंज) = रेती (कीटासारखी अती बारीक वाळू) किंवा रेता =रेती]

रेफ [ रिफ = कर्कश नाद करणें. (नाम) रेफ = कर्कश नाद = र (उच्चार) ] ! अलीफ = अलेफ = अरेफ = अ हा कर्कश नाद करणें. आसुरभाषांत अ चा उच्चार कंठांतून कपतात, तेव्हां अलेफ शब्द संस्कृत अरेफ ह्या शब्दाचा आसुर अपभ्रंश आहे. (भा. इ. १८३२)

रेरे [ रय् to go ] रेरे चालला आहे.

रेलणें [ लैण् श्लेषणे. लैणन =रेलणें. ल = र; ण = ल ] (धा. सा. श. )

रेव [ रेता = रेव (स्त्री) ]

रेवड [ रयपथः =रेवड ] नदीची रेवड म्हणजे वाळूची वाट.

रेवन्त - रेवन्त देवाचा उल्लेख वराहमिहिर-बृहत्संहिता अध्याय ५८ श्लोक ५६ व विष्णु पुराण ३ (२, ६, ७ श्लोक) येथें आहे. ही देवता घोड्यावर बसून मृगया करीत असलेली कोरीत किंवा घडवीत. हिच्या प्रतिमा महाराष्ट्रांत खेडोखेडीं सांपडतात. कलकत्त्याच्या Indian Museum मध्यें ह्या देवाची एक मृगयाक्रीड मूर्ति आहे. रेवन्त हा शब्द रैमत् = रेमन्तः (अनेकवचन) ह्या संस्कृत शब्दाचा महाराष्ट्री अपभ्रंश आहे. रैमत् म्हणजे श्रीमन्त, लक्ष्मीवान्; 'रेवन्त' ? ह्या प्राकृत रूपानें ज्या अर्थी हा शब्द बृहत्संहितेंत व विष्णुपुराणांत येतो, त्या अर्थी हे दोन्ही ग्रंथ प्राकृत-महाराष्ट्री प्रचलित झाल्यावर बर्‍याच किंवा कांहीं कालानें झाले असले पाहिजेत. बृहत्संहितचा काल प्रसिद्ध आहे. तोच विष्णुपुराणाचा काल असावा; कारण विष्णुपुराणांत गुप्तांचा उल्लेख आहे. (भा. इ. १८३२)

रोक [ लोक् ]

रोख १ [ रोषः = रोख (क्रोधस्थान ) ] आमच्यावर रोख कां? त्याचा रोख माझ्यावर आहे = तस्य रोषः ममोपरि.

-२ [ रोकः (रोखीची खरेदी) = रोख ]

-३ [ अपरोक्ष = रोख (अ आणि प यांचा लोप) ]
अपरोक्ष निंदा म्हणजे रोख निंदा. (भा. इ. १८३४)

-४ [ रोक (प्रत्यक्ष खरेदी ) = रोख ]

जनून - जन्हु (गंगेचा पिता ) - जन्हुवनं. खा म

जनूनें - जन्हु (गंगेचा पिता ) - जन्हुवनं. खा म

जमनई - यमनदी. खा न

जयदर - जय ( व्यक्तिनाम ) - जयदरः खा म

जयनगर - जय ( व्यक्तिनाम ). खा म

जयपुर - जय ( व्यक्तिनाम ). खा म

जरली - जरडी. खा व

जलाजणी - जल - जलांजलि. २ खा नि

जलोला - जल - जल्लोद्रा. खा नि

जव - यव - यव्यं. खा व

जवखेडी - यवखेटिका. खा व

जवखेडें - यवखेटं. ७ खा व

जसाणें - यवसवनं खा व

जळकू -जलूका -जलूकं. २ खा इ

जळकें - जलूका - जलूकॅ. २ खा इ

जळगांव - जलूकाग्रामं. ५ खा इ

जळचक्र - जलूकाचक्रं. २ खा इ

जळवद - जलूकावर्त. खा इ

जळाजणी - जलज (कमल ) - जलजवनी. २ खा व

जळूं - जलूका - जलूकं. खा इ

जळोद - जलूकापद्रं, २ खा इ

जांगलाखोरी - जांगल ( अरण्य ) - जांगलककुहरिका. खा नि

जातेगांव - जर्तिक (पंजाबांतील लोक) - जर्तिकग्रामं. खा म

जातोडें - जर्तिक (पंजाबांतील लोक) - जर्तिकवाटं. २ खा म

जानफळ - जन्हु (गंगेचा पिता) - जन्हुफळि. २ खा म

जानफळी - जन्हु (गंगेचा पिता ). खा म

जानवें - जन्हु ( गंगेचा पिता) - जान्हवं. खा म

जानोरी - जन्हु (गंगेचा पिता) - जन्हुपुरी. खा मा

जापी - जपा - जपिका. २ खा व

जापोरें - जपा (जास्वंद) - जयापुरं. खा व

रुळी [ रूढि ] रू-गुरूं, मेंढरूं, वासरूं, पाखरूं, कोकरूं, वकरूं, म्हसरूं, मछरूं, वाघरूं, हातिरूं या शब्दांतील रूं हा प्रत्यय पाणिनीय ष्ठरच् प्रत्ययापासून निघाला आहे. वत्सोक्षाश्वर्षभेभ्यश्च तनुत्वे ष्ठरच् (५-३-९१) ह्या सूत्रांत तनुत्वदर्शक तर प्रत्यय सांगितला आहे. वत्स (मूल) अणि वत्सतर ( लहान मूल).
वत्सतर = वच्छअर (महाराष्ट्री )
= वच्छरुं ( अपभ्रंश)
= वासरुं (मराठी )
तरः, तरी, तरम् असा तिन्ही लिंगी हा प्रत्यय आहे. गुतर = गुअर = गुरुं = गोरूं (ज्ञानेश्वरी ) = गुरूं. पक्षितर = पक्खिअर = पक्खिरुं = पाखिरूं (ज्ञानेश्वरी ) - पाखरूं. 
वर्करतर = बक्करअर = बाकरूं = बकरुं.
मक्षितर = मच्छिअर = मच्छिरुं = मछरूं = मच्छर ( मच्छरदानी ).
मत्स्यतर = मछअर = मच्छरुं = मच्छर ( मांसमच्छर ). 
व्याघ्रतर = वाघरूं. हस्तितर = हातिरूं. 
महस् + तर = म्हसअर = म्हसरुं = म्हसरूं. 
कुक्कुरतर = कूउत्तर = कूत्तरुं = कुतरूं. 
मयूरतर = मोरअर = मोअरुं = मोरूं. पाडा, पाडी हे शब्द म्हशीच्या वत्साला लावतात. तर प्रत्यय लागून पाड + तर = पाडअर = पाडरूं = पारडूं. पाड + तरी = पाडरी = पारडी = पारडें. 
कोंकरूं व मेंढरूं ह्यांचे मूळ संस्कृत शब्द धुंडाळले पाहिजेत. रूं हा मराठीतील र्‍हास्वत्वदर्शक प्रत्यय आहे. (भा. इ. १८३२) 

रूपबेरूप [ रूपं विरूपं = रूपबिरूप = रूपबेरूप ] फारशी बे शीं कांहीं संबंध नाहीं. (भा. इ. १८३४)

रेकणें १ [ रेकृ १ शंकायां. रेकनं = रेकणें ] दमधर, असा रेकूं नकोस म्हणजे शंका येऊन बावचळल्यासारखे करूं नकोस. ( धा. सा. श. )

-२ [ रेकणें = म्हशीचा शब्द. रेष = खिंखाळणें ( घोड्याचें) = आवाज (म्हशीचा) ] (भा. इ. १८३२)

-३ [ रेष् अव्यक्ते शब्दे. रेषण = रेकण = रेकणें ] (ग्रंथमाला)

रेखाटणें [ रेषाकर्षणं ] (रेंघाटणें पहा)

रेंघाटणें [ रेषाकर्षणं =रेघाटणें, रेंघाटणें, रेखाटणें ] (भा. इ. १८३६)

रेज, रेजा [ रेतज, रेतजा (धुळीचा कण) = रेजा, रेज]

रेटणें १ [ लेट् स्वप्ने, धौर्त्ये. लेट्यते = रेटती ]
तो रेटतो म्हणजे धूर्तपणानें चालतो.
त्यानें रेटून दिली म्हणजे झोंप घेतली. ( धा. सा. श. )

-२ [ लेट् धौर्त्ये. लेट्याति = रेटतो ] कसेंतरी रेटून नेलें म्हणजे शाठ्य केलें. (धा. सा. श.)

-३ [ रेट् १ परिभाषणे. रेटनं = रेटणें ] रेटून बोलणें म्हणजे लावून बोलणें. ( धा. सा. श. )

रुका १ [ रुक्न (सुवर्ण, लेखंड ) = रुक्क = रुक, रुक्मकः = रुका ] एक कानिष्ठ नाणें. (भा. इ. १८३२)

-२ - भोजप्रबंधांत रुक्म म्हणून एका नाण्याचा उल्लेख आहे:-
" ततो बाणाय रुक्माणां पंचदशलक्षाणि प्रादात् ” भोजानें बाणाला पंधरा लाख रुक्म दिले, असें बल्लाल लिहितो. रुक्म या शब्दाचा अर्थ सोनें किंवा लोखंड असा आहे. पंधरा लाख सोन्याचीं नाणीं भोजानें दिलीं असतील हें संभवत नाहीं. तेव्हां लोखंडाचे पंधरा लाख रुक्म भोजानें दिले असावे, असा पक्ष रहतो. तेव्हां रुक्म हें नाणें काय होतें ? रुक्मः या शब्दाचा मराठींत अपभ्रंश रुका. रुका असा होतो व होत आहे. सरासरी १८ रुक्यांचा एक आणा होतो व १६ आण्यांचा एक रुपया होतो. म्हणजे एक लाख रुक्मांचे सध्याच्या मानाचे सरासरी पांचशे किंवा साडे पांचशें रुपये होतात. भोजानें शेंकडों कवींना लक्षलक्ष नाणीं दिलीं. हीं नाणीं सोन्याचीं होतीं, असें समजल्यास कुबेराची ही संपत्ति पुरली नसती. सबब रुक्म हें अगदीं हलकें नाणें भोजाचे वेळेस होतें असें म्हणावें लागतें. हें भोजाच्या वेळचें रुक्म नाणें पेशवाईतील किंवा शिवकालीन रुक्का या नाण्याचें च पूर्वज आहे.

रुकार [ रै करोति (अव्ययप्रकरणम्, ददाति) = रुकारतो ] रुकारणें म्हणजे देणें, होय म्हणणें. (भा. इ. १८३४)

रुकार, रुकारणें - [ ऊरुरीकार: = (उलोपे ) = रुकार ] रुकार म्हणजे मान्यता. ऊरुरीकरणं = रुकारणें. ( धा. सा. श. )

रुखरुखित १ [ रूक्ष harsh द्विरुक्त = रुखरुखित ] very harsh, rough.

-२ [रूक्षरूक्षित = रुखरुखित ] (भा. इ. १८३४)

रुचा [ऋच्छका (इच्छा) = रुचआ = रुचा ] रुचि शब्द निराळा.

रुचीबेरुची [ रुचिविरुचि = रुचीबेरुची ] विरुचि = वाईट रुचि. (भा. इ. १८३४)

रुंद [ वृंद = वुंद = रुंद. वृंदिष्ट = वुंदिट्ट = रुंदट ] ( भा. इ. १८३२ )

रुपया [ रूप्यकः ] ( निप्क पहा )

राहुटी [ रथ्याकुटी = राहउटी = राहुटी ] राहुटी म्हणजे प्रवासांतील पटकुटी म्हणजे तंबू.

राळ १ [राला = राळ ]

-२ [ राद्धि from राध् to kill, exterminate राद्धि = राढि = राळि = राळ ] राळ करणें, उडवून देणें to exterminate.

रिठा १ [ रिष्टः = रिठा ]

-२ [ अरिष्टक = रिठा ( अलोप ) ] (भा. इ. १८३४)

रिणकरी [ऋणकारी = रिणकरी ]

रिणको [ ऋणकामः ] (धनको पहा )

रितें [ रिक्त = रित्त = रित = रितँ = रितें-ता-ती ] (ग्रंथमाला)

रिप् रिप् १ [ रिफ् to utter a grating sound = रिपरिप पाऊस पडतो ]

-२ [ रिप् to revile ] आतां रिपरिप् पुरे.

री १ [ री to howl ] री ओढणें to howl after any one.

-२ [ री (वृकशब्दः ) = री ] री म्हणजे कोल्ह्याचा शब्द. री ओढणें म्हणजे एक कोल्हें ओरडलें म्हणजे बाकीचीं जशीं ओरडतात तसें करणें.

री ओढणें [ री ९ गतौ. री (शब्द करणें) = री ओढणें] ( धा. सा. श. )

री री करणें [ री to howl ] 

री री करीत जाणें [ रि to go ]

रीस १ [ ऋक्ष = रीस ] अस्वल.

-२ [ ऋषभ = रिसह = रीस ] मराठींत अडाणी बेडौल माणसास रीस म्हणतात.
मूळ ऋषभ हा शब्द संस्कृतांत पुरुष-ऋषभ वगैरे सामासिक शब्दांत श्रेष्ठत्व दाखवितो. विपरीत लक्षणेनें मराठींत रीस कनिष्ठत्व, अधमत्व दर्शवितो. (भा. इ. १८३६)

रुई १ [ ऋतिः (मार्ग, रस्ता ) = रुइ = रुई ] ही बोलण्याची रुई नव्हे म्हणजे मार्ग नव्हे.

-२ [ रोहित् ( मृगविशेषः ) ( हसृरुहियुषिभ्य इतिः उणादि १०२ ) रोहित् = रोहिअ = रोही = रुई ] हरिण एक प्रकारचे. ( भा. इ. १८३३)

राजी-होणें [ राध् राध्यति = राजी होणें ] to be affectionate towards. कृष्णाय राध्यति = कृष्णाला राजी होते.

राजे लोक [ राजलोकाः = राजे लोक ] राजांचें मंडळ. (भा. इ. १८३६)

राड [ द्राङ् तुकडे तुकडे करणें. द्राङ् = राड ] (भा. इं. १८३४)

रांडरुं [ रंडातरी = रांडरी, (प्रेमदर्शक ) रांडरूं ]

राडा [ ह्रदः = राडा ] रक्ताचा, शेणाचा, चिखलाचा राडा.

राणा [ राजन्यः = राअणा = राणा ]

राणीवसा [ राज्ञ्यावासः = राणीवसा ]

रातवा [ रात्रिपातः = रातवा ] रातवा म्हणजे रात्रीचा सर्व समय.

रात्रों औषींस, औषीं [ रात्रौ दोषसि = औषीं (द = अ ) ] (भा. इ. १८३३)

राप [ राद्धि] (राब पहा)

राब [राद्धि = राब्भी = राबी = राब = राप ] गुळाची राब म्हणजे शिजवून दाट केलेला रस.

रामरगडा [ रामह्रद: ] (रामराडा पहा)

रामराडा [ रामह्रद: = रामराडा. रामह्रदः = रामरहंडा = रामरघडा = रामरगडा ] रामह्रद म्हणजे परशुरामानें मारिलेल्या क्षत्रियांच्या रक्ताचा ह्रद म्हणजे हौद. त्यावरून कोणताहि वीभत्स पातळ पदार्थाचा सांठा.

रायभोगा [ राजभोगीनः ( तंडुलः ) ५-१-९ पाणिनि = रायभोग ( तांदूळ ) ] राज्ञे हिताः तंडुलाः राजभोगीनाः तंडुलाः

रायवळ [ राजपालित=रायवळ ] राजाचीं रानांतील लांकडें. रायावळा [ राजामलक: = रायावळा ]

रास [ रासः (गौळ्यांचें नृत्य) = रास ]

राहराहून [ रह् १ त्यागे ] ( धातुकोश-राह ५ पहा)

राहाटी [ राद्धि: ] ( धातुकोश-रहाळ पहा)

राहिलेपण [ रु to sound, hum णिच् रावय् निष्ठा रावित. रावित + ल = राइअल = राहिल. रावितत्वन (Vaidik ) = राहिलपण = राहिलेपण humming ]
सरलेयां गीता चा समारंभु । न वचे राहिलेपणा चा सोभु ( ज्ञानेश्वरी १८-४२१ )
राहिलेपण म्हणजे नादत्व, अनुरणन । गाणें संपलें तरी त्याचें अनुरणन मागें कांहीं काळ रहातें तसें.

चोरढ - चकोरधं. खा इ

चोरबंधारें - चकोरबंधकारं. खा इ

चोरमळी - चकोरमलय: खा इ

चोरवड - चकोरवट: ५ खा इ

चोरविहीर - चकोरविवरिका. २ खा इ

चौकी - चतुर् (चार) चतुष्किका. खा नि

चौगांव - चव्यग्रामं. ६ खा व

चौंढी - चतुर (चार) - चतुष्पथं. ३ खा नि

चौपाटी - चतुष्पाटी (गिरिनदी ) = चौपाटी.
सध्यां चौपाटी म्हणून मुंबई शहराचा जो भाग आहे तेथें गिरगांवाजवळून वहात येणारी एक लहान नदी होती. ती गिरगांवच्या खाडींत पडे.

चौपाळें - चतुर् (चार) - चतुष्पालिका. २ खा नि

चौबारी - चतुर ( चार ) - चतुर्द्धारिका. खा नि

चौल्हेरवाडी - चोल (लोकनाम) चोलगिरिवाटिका. खा म

 

छकडिया - शकटिकं. गोध्रा. (पा. ना.)

छडवेल - छद (तमाल) - छदवेल्लं. २ खा व

छाईल - छायापल्लं खा नि

छापटी - शापठिक (मोर) - शापठिका. खा इ

छापरा - शफरीय, महीकांठा. (पा. ना.)

छापरी - छत्वरी (लत्तागृह). खा व

छावणी - छादनी. खा नि

छितर - श्वित्र - श्वित्रकं. खा नि

छिनालकुवा - छिन्ना (गुळवेल). खा व

छिरवें - छिदिरवहं. खा नि

छीका - छिक्कका ( नाकशिंकणी). खा व

 

जखाणे - यक्षवन.

जंजाल्याघाट - (गांवावरून). खा प

जतपुर - यतिपुरं. खा म

रळी [ लल् १ विलासे. ललिः: = रळी ] खेळ, विनोद. (धातुकोश-रळ पहा)

राई १ [ राजिका (कृष्णसर्षप ) = राई (मोहरी) ] धान्यविशेष (भा. इ. १८३७)

-२ [ राजि=राई (अंब्यांची ओळ) ] (भा. इ. १८३७)

राउल [ राजकुट = राजकुल (राजगृह) = राउल ] (ज्ञा. अ. ९ पृ. १४६ )

राखडी [ रक्षिका ] (राखी पहा)

राखणावळ [ रक्षणामूल्यं = राखणाऊळ = राखणावळ ]

राखी १ [ रक्षिका an amulet to protect = राखी, राखडी ]

-२ [ रक्षी अथवा रक्षा=राखी ] श्रावणी पूर्णिमेला मनगटांत बांधलेली दोरी. ( भा. इ. १८३६)

राखोडी [ रक्षाकूटि = राखाऊडि = राखोडी, राखोंडी, राखुंडी ]

-२ [ रक्षाकुंडी = राखोंडी ] राखेचा खड्डा.

राखोळ [ रक्षामूल्यं = राखोळ ] गाईचें चरण्याबद्दल भाडें.

रांग [ रघ् १ गतौ ] ( धा. सा. श. )

रांगणें १ [ रंगण = रांगणें ] (भा. इ. १८३६)

-२ [ रिंगणें = रांगणें. इ= आ ] (भा. इ. १८३७)

रागिट [ रागाविष्ट = रागाइट्ट=रागैट्ट= रागीट = रागिट. ]

राघू [ राघ् (नाम) म्हणजे कर्ता माणूस. त्याचें ममतादर्शक रूप राघू. राघ् = राघ = राघू ] तो काय राघू आहे = तो मोठा कर्तासवरता आहे ( भा. इ. १८३४ )

रांजण [ अलंजरः =(अलोप) लांजर = रांजर = रांजण ]

राजवट [ राज्यवृत्तिः = राजवट ]

राजवटी १ [ राज्यवृत्ति = राजवटी ]

-२ [ राज्यावस्थिति = राजावठिइ = राजावटी = राजवटी ]

राजवर्ख [ राजवर्चस्= राजवर्क, राजवर्ख ] राजाला शोभण्यासारखी, उत्तमोत्तम. (भा. इ. १८३६)

राजवर्खी [ राजावर्त (cloth of different colours) = राजवर्ख. र्त = र्ख ]
राजवर्खी बांगड्या म्हणजे नाना रंगाच्या बांगड्या.

राजस (सा-सी ) [ राजर्षि = राजस (सा-सी ) राजर्षे ! = राजसा ! (पुल्लिंग) राजसे (स्त्रीलिंग ) ] राजसा ! हें संबोधन लावण्यांत व गाण्यांत मराठी भाषेत फार येतें.

राजी [ राजोपजीविन्= राजोपजीवी = राजी ] attached to the master. लोक राजी राखणें to keep people attached to the master, king.

रंडीबाज [ रंडाभाज् = रंडीबाज ] बाज हा फारसी शब्द भाज् या संस्कृत शब्दापासून निघाला आहे किंवा त्याचा सहोदर आहे.

रताळू [ रक्तालुः = रताळू ]

रती [ रक्ति (गुंज १’७५ ग्रेन ) ] (भा. इ. १८३२)

रद, रद्द, रद्दी [ रद् १ भेदने. रदः = रद, रद्द, रद्दी ] रद्दी कागद म्हणजे फाडलेले, टाकून दिलेले कागद. ( धा. सा. श. )

रपरप, रपारप [ रपि शब्दे ] (ग्रंथमाला)
रमारमी ( रम् to pause, stop, loiter : रमः + रमिः = रमारमी ] stopping and loitering किती रमारमी केली तरी कर्ज फेडलेंच पाहिजे. रमारमी करून कसातरी निसटलों.

र र करणें [ री ९ गतौ. रेरीयते = रेरे = रर करणें म्हणजे अत्यन्त मंदगतीनें शिकणें ] रेरे करीत शिकतो. ( धा. सा. श. )

रश्शी [ रज्जु = रस्सू = रस्सी. रशना = रसआ = रस्सी.
रश्मि = रस्सि = रस्सी ] तिसरी व्युत्पत्ति विशेष ग्राह्य तिन्ही खर्‍या. (भा. इ. १८३६)

रसोई [ रसहूदिका = सरहूईआ = रसोईआ = रसोई ] षडरसांचा जो पाक म्हणजे सूद ती रसोई. सूद म्हणजे शिजवणें, पाक (भा. इ. १८३७)

रस्ता देणें [ दतवर्त्म = रस्ता दिलेला ] हा प्रयोग संस्कृतांतून आला आहे.

रस्सा १ [ रस्यः = रस्सा ]

-२ [ रसक: = रसा ] रसक म्हणजे मांसाची आमटी, soup. ( भा. इ. १८३६ )

रस्सी [ रश्मि = रंसि = रस्सी ] (भा. इ. १८३२)

रहाट [ अरघट्ट = रहाट, लाट ]

रहाटागर [ अरघट्टाग्रहारः = रहाटागर ]

रहाणें [ ली ९ श्लेषणे. लयनं = रअणें = रहणें = रहाणें-राहणें ] लयन म्हणजे वास करणें, वास करण्याचें स्थान.
रहाणें हा मराठी धातु ली-लय् ह्या संस्कृत धातूपासून निघाला आहे ह्यांत संशय नाही. ( भा. इ. १८३६)

रखेली [ रक्षिता = रखिल्ला = रखेली ] (स. मं.)

रगटी-टें [ लक्तिका ] ( लक्ती पहा )

रगड १ [ ह्रग् १ संवरणे. ह्रगितं = रगड ] रगड म्हणजे पुरेसें, पुष्कळ, आच्छादण्यासारखे. ( धा. सा. श. )

-२ [ लगड pretty, handsome = रगड ] Pretty, plenty.

रंगणास आणि [ रंह् १ गतौ ] (धातुकोश-रंघव पहा)

रगत [ रक्त = रगत ] रात किंवा राक असा अपभ्रंश नियमाप्रमाणें न होतां, मराठींत रगत अपभ्रंश झालेला आहे.
भक्त = भगत              क्रिष्ट = किळ्सट्
शक्त = सकत             लुब्ध = लुबड
फक्त = फकत             भृष्ट = भाजट
तख्त = तखत            कुष्ट = कुजट
वख्त = वखत            घुष्ट = घुसळ

संस्कृतांत किंवा इतर भाषांत ज्या शब्दाचे अन्त्य क्त, ख्त, ब्ध, ष्ट हीं जोडाक्षरें असतात, त्या शब्दांचे मराठींत अपभ्रंश जोडाक्षरें फोडून होतात. 
रगत म्हणजे तांबडा असा अर्थ आहे. लालरगत हें मराठींत जोडविशेषण मुसुलमानकालीं बनलें आहे. (भा. इ. १८३६) 

रगतगळू [ रक्तगुल्म = रगतगळूं ] (भा. इ. १८३६) 

रंगाथिल (ला-ली-लें) [ रंगान्वित + ल (स्वार्थे) = रंगाथिल ( ला-ली-लें) ] coloured.

रंगाथिले [ रंगान्वित + ल = रंगाथिलें ] रंगविलेलें.

रटरटणें [ रट्ट परिभाषणे ] रटरटणें (भात वगैरेंचें ). (ग्रंथमाला)

रटाळ, रट्याळ [ रटालु = रटाळ, रट्याळ ] रटाळ, रट्याळ म्हणजे व्यर्थ बडबडणारा किंवा वटवटात्मक.

रट्टा [ अरत्नि (elbow) = रट्टा ] हाताचा रट्टा मारलान्

रंडगोळक [ रंडागोपालक ] (कुंडगोळक पहा)

रडतान [अनध्यायो रुद्यमाने समवायो जनस्य च ॥ १०८ ॥ (मनु-चतुर्थाध्याय)
रुद्यमाने रोदनंध्वनौ । भावे लकार:। (कुल्लूक ) रडतांना पढूं न ये, या वाक्यांत रडतांना हें रूप भावे रडतान या कृदन्ताचें सप्तमीचें रूप आहे. मराठींत भावे, कर्मणि व कर्तरि एकच रूप होतें. ] (भा. इ. १८३४) म. धा. २२