Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
स्थलनामव्युत्पत्तिकोश
निरपुर - नीवर (निवार्याची जागा) - नीवरपुरं. खा नि
निरूरवी - नीवर (निवार्याची जागा) - नीवरपुरवहा. खा नि
निरूळ } नीवर ( निवार्याची जागा) - नीवरपल्लं. खा नि
निरोळें }
निर्गुडी - निगुंठी. खा व
निवाणें - नीववनं. खा व
निषाणें - निष (लोकनाम ) - निषवनं. ५ खा म
निसणीचा घाट - निश्रेणी = निसेण्णी = निसणी. (भा. इ. १८३३)
निसरडी - निर्झरवाटिक. खा नि
निळशी - नीलशयी (झाडावरून). मा
नीळगव्हाणा - नीली. २ खा व
नुराबाद, नूरनगर - खा मु
नेपाल - (कर्णाटक पहा)
नेमणें - निंब -नैंबवनं. खा व
नेरपाट - नीवर (निवार्याची जागा)- नीवरकं = नेर. खा नि
नेरी - नीवर (निवार्याची जागा) - नीवरिका. ४ खा नि
नेवाडें - नीपवाटं. खा व
नेवाळें - नीप - नीपालयं. खा व
नेव्हाळी - नीपपल्ली. ३ खा व
नेषी - निष ( लोकनाम ) - नैषिक. खा म
नेसावें - नैषवहं (निषध शब्दांतील निष लोकांचें गांव). मा
नेसू - निःस्वा. खा न
नेहतें - निहाका (घोरपड) - निहाकास्थानं. खा इ
नेहरें - निहाका ( घोरपड ) - निहाकावेरं. २ खा इ
नैगांव - नदीग्राम = नईगावं = नैगांव = नायगांव. ( भा. इ. १८३३ )
नोगांग - अनुगंगम् = नुगंग = नोगांग. गंगेच्या कांठचा देश तो नोगांग.
गंगा म्हणजे कोणतीही पवित्र नदी. त्यावरून पवित्र नदीच्या कांठच्या एका देशाचें नांव. (भा. इ. १८३६) न्याहाळी - नदीवाहालि. खा नि
न्हावी - नापित (स्नापित) - नापितका. २ खा म
न्हावें - नापित (स्नापित) - नापितकं. २. खा म
न्हाळोद - नलिपद्रं. खा नि
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सणा सुदी चा [ क्षणस्य सुदिनस्य त्यत् = सणा सुदी च ( चा-ची-चें ) ]
सतका [ सत्कारः = सत्का, सतका ] a present to kings by subjects
सतत [ तन् ८ वृद्धौ. सततं, संततं = सतत ] ( धा. सा. श. )
सतरा [ सप्तापरदशन् ] ( अकरा २ पहा)
संतापणें [ संतप्यति = संतापणें ] (भा. इ. १८३३)
संतापवणें [ संतापयति = संतापवणें ] (भा. इ. १८३३)
सतावणें [ सत्रायते ( सत्रं पापं चिकीर्षति) = सतावतो ] (भा. इ. १८३३)
सत्तर १ [ सप्तति ] ( अकरा १ पहा)
-२ [ सप्तृदृशति ] (विंशति पहा)
सत्रंज [ शत्रुंजय: ( ३-२-४६) = सत्रंज ] सत्रंज हा शब्द फारशींत बुद्धिबळाच्या डावाला लावतात.
सत्रा [ सत्रा always (वैदिक) = सत्रा (मराठी अप्रकृत many besides the riglit one ) ] तुभ्यं ब्रह्माणि सत्रा दधिरे to thee songs have been offered always. सत्रा बोलणीं नकोत, सत्रा गोष्टी सांगतो, ह्या वाक्यांत सत्रा म्हणजे सोळा अधिक एक असा अर्थ नाहीं. सदा, पुष्कळ, अवांतर असा अर्थ आहे.
सत्त्वाथिला [ सत्वान्वित + ल = सत्वाथिला.
नामान्वित + ल = नामाथिला ]
संथ १ [ शंत (सुखी) = संथ ] संथ निजला आहे म्हणजे सुखी निजला आहे.
-२ [ संस्त् ( निजणें) = संथ ] संथ पडला आहे म्हणजे निजून पडला आहे.
संथा १ [ संस्तावः = संथाआ = संथा.
पाणिनि ३-३-३१ यज्ञे समि स्तुवः
समेत्य स्तुवंति यस्मिन्देशे छंदोगाः स देशः ]
-२ [ श्रंथा = संथा ( श्रंथ् १० to arrange संदर्भे ]
-३ [ संहिता = संथा ] वेदपाठाची संथा.
सदाफुली [ सदंपुष्पा = सदाफुली ] ( सायण on अथर्व - ४ कांड - ४ अनुवाक - सू. २० ऋ.).
संदूक [ सं + धुक्ष् to kindle : संधुशा = संदूक ] a kindling tapering cloth.
सनई १ [ स्वनिका = सानिका = सनई. स्वन् १ शब्दे ] सानिका, सानेयिका हे स्वनिकाचे अपभ्रंश आहेत.
-२ [ सानिका ( वाद्यविशेष ) = सनई, सणई ]
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सडक १ [ सरक going = सडक adverb
सडक चालला went on continuously
-२ [ सरकः a continuous road = सडक ]
-३ [ सध्र्यंच् = सडक ] तो सडक निघून गेला म्ह० नीट सरळ निघून गेला. सडक रस्ता = नीट सरळ रस्ता. शेवटीं नीट रस्त्याला सडक म्हणूं लागले. (धा. सा. श. )
सडा १ [ ( शडि संघाते ) शड: = सडा ]
-२ [ स्यदः = सडा ] shower, violent shower.
संडासः [ संदेशः ( जरद्रर्ता ) = संडास ] old pit for night-soil. अथर्ववेद-द्वितीयकांड ४३
सढळ १ [ शिथिर extended (दानार्थं प्रसारित) = सढळ ] देण्याला सढळ हात असणारा.
-२ [ श्रद्धावत् = सड्ढाल = सढळ = सढळ ] सढाळ असा उच्चार गांवढे लोक करतात. (भा. इ. १८३२)
सणा १ [ क्षण: = सण ]
-२ [ शणु ( अथर्ववेद ) = सण ] hemp.
सणई [ सानिका ] ( सनई पहा )
सणंग १ [ सनंगु ( a kind of leather ) = सणंग. ( सनंगुः, चसः, हविस, सक्तुः ) उगवादिभ्यो यत् (५-१-४ पाणिनि ) उकारान्त शब्दांत हा शब्द पाणिनीयांत आहे ] सणंग म्हणजे मराठींत तलम उत्तम कमावलेल्या कातड्यासारखें कापड.
-२ [ सनंगु a kind of leather garment = सणंग (५-१-२ पाणिनि ] सणंग म्हणजे मराठींत कापडविक्ये कापडाच्या, धोत्राच्या किंवा लुगड्याच्या तुकड्याला म्हणतात. अत्यन्त पुरातन कालीं आर्य कातड्याचीं वस्त्रें पांघरीत, नेसत, असें दिसतें.
सणणणण [ सनश्वन्] (सणसणित पहा)
सणवई [ क्षणवृत्तिः = सणवई] सणवई म्हणजे सणाच्या दिवसाचें वाढणें.
सणसणित १ [ सनश्वन् = सणसणित, सणणणण, सणाणणें, खणखणित ]
-२ [ सनीपण (सन् to gain) = सणसणणें, सणसणून बोलणें ]
-३ [ स्वनस्वनितं = सणसणित. स्वन् १ शब्दे ] मोठ्या आवाजाचें. ( धातुकोश-सणसण २ पहा)
सणाणणें [ सनश्वन्] (सणसणित १ पहा)
सणा वारीं [ क्षणस्य वारे = सणा वारी ] सणा ही षष्ठी आहे.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
संगीन १ [ संगः ( संगिनी ) a kind of weapon = संगीन ]
-२ [ संगृह्णाति = संगिण्हइ = संगीन ] संगीन तयारी = comprehensive preparation.
संघष्टण [ संघर्षण पासून संघष्टण आला नाहीं. संघृष्ट पासून संघष्ट आणि संघष्ट पासून संघटण. धृष्ट असा धातू धरला. संघर्षणपासून सांघरण असें रूप व्हावें. तें वर्तमान मराठींत नाहीं संघष्टण आहे. (भा. इ. १८३६)
संच [ षच् समवाये = संच, सांचवणें ] (ग्रंथमाला)
सचकार [ सत्यंकार = सच्चँकार = सचकार ] ( भा. इ. १८३२)
संचळ [ सौवर्चल = सौच्चळ = संचळ ] ( भा. इ. १८३४)
सचोटी [ सत्यवृत्तिः = सचोटी ]
सच्च ( च्चा-च्ची-च्चें ) [ सत्य = सच्च (खरें) शस्य = सच्च (प्रशंसनीय ) ]
सच्चा १ [ शस्यं = साचें, सच्चें, सच्चा ]
-२ [ सस्यकः किंवा शस्यकः = सच्चा ( अप्रतिम साधू) ] शस्यक शब्दांतील श चा स पाणिनीय कालीन प्राकृतप्राबल्य दाखवितो.
सजण [ सज्जन = सजण ] ( स. मं.)
सजणा ! [ संज्ञा to be of the same mind, to understand one another = संजानानः = सजण ] one who is of the same mind with the speaker. सजणा हें संबोधन लावण्यांत फार येतें. सुजन शब्द निराळा.
संजाव [ फारसी ] (स. मं. )
संजोग [ संयुगः union, fit = संजोग ] union, fit.
सज्जा [ सद्या (सद् to sit) = सज्जा ] माडीवरील बसावयाची पुढची जागा.
सज्नीखान [ स्वर्जिकक्षार = सज्जिआखार = सज्जीखार ] (भा. इ. १८३४)
सटकन् [ सट्ट १० हिंसायाम् ] (धातुकोश-सडक २ पहा)
सटकन्, सटदिनि [ चटकर पहा ]
सटाणा १ [ षष्टिहायन = सटाणा ] षष्टि हायन म्हणजे मोठा हत्ती, त्यावरून सटाणा म्हणजे मोठा, अगडबंब.
-२ [ स्तनकः = सटाणा. स्तन् to thunder ]
सटी [ श्वठि:, श्वठ् १ असंस्कारे ] (धातुकोश-सठ पहा)
स्थलनामव्युत्पत्तिकोश
नावरी - नववर ( नवा पति ) - नववरिका. खा म
नावरें - नववर ( नवा पति ) - नववरकं. खा म
नावली - नामि ( विष्णु ) - नामीपल्ली. खा म
नासिंदें - नासिक्य ( नगरनाम ) - नासिक्यपद्रं. खा म
नाळ - नालिकं. खा नि
नाळोद - नालंद (बौद्धनगर) - नालंद. खा म
निकुंभें - निकुंभ ( राजवंशाचें नांव - निकुंभकं. खा म
निगड़ें - निगडें. मा
निजामपुर - २ खा मु
निझर - निर्झरकं. खा नि
निताणें - नितत्नी - नितत्नं. खा व
निदेड - निद ( विष ) - निदवेरं. खा नि
निपाणें - नीपवनं. २ खा व
निंब - निंब. खा व
निंबगव्हाण - निंबगवादनी. गवादनी = कुरण. ३ खा व
निंबवेल - निंबवेरं. खा व
निंबाइत - निंबादित्यं. खा व
निंबुनपाडा - निंबवनपाटकः खा व
निंबाणी - निंबवनी. २ खा व
निंबोळ - निंबपल्लं. ३ खा व
निंभारी - निंबागारिका. खा व
निंभेल - निंबवेरं. खा व
निंभोटें - निंबवाटं. खा व
निंभोरी - निंबपुरी. खा व
निंभोरें - निंबपुरं. ७ खा व
निमखडी - निंबखलि. खा व
निमखेड - निंब. २ खा व
निमखेडी - निंब- ४ खा व
निमगांव - निंबग्रामं. ४ खा व
निमगुळ - निंबगुल्मं. ३ खा व
निमघाट - निंबघाट: खा प
निमघाडी - निंब. खा व
निमझरी - निंबझरी. खा व
निमडाव - निंबद्रुवहं खा व
निमडाळें - निंब-निंबद्रुमपल्लं. खा व
निमतळें - निंबतलं. खा व
निमदरडें - निंबदरवाटं. खा व
निमशेवडी - निंबसीमंतिका. खा व
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सउरा [ शकुलः = सउरा, सौरा ] ( भा. इ. १८३६ )
सकट [ सकृत् ] बरोबर, together. (सगट पहा)
सकत [ संशक्त = सकत ] Powerfull ( अशिष्ट )
सकलाद - हा शब्द फारशींत सगलाद असा आहे. इंग्रजीत scarlet असा आहे. इटालियन भाषेंत Scarlatto; तुर्की iskerlet; फ्रेंच Scarlate असा आहे. मूळ कोणत्या भाषेत हा उत्पन्न झाला तें सांगतां येत नाहीं. Scarlet म्हणजे एका प्रकारचें Broad-Cloth. Scarlet या रंगाशीं या शब्दाचा कांहीं संबंध नाहीं. चिनी भाषेत Sakala म्हणजे एका प्रकारची silk-brocade, मराठेशाहींत सकलादी अफगानिस्थान, इराण व यूरोप या देशांतून महाराष्ट्रांत येत. येथें होत नसत. त्या अर्थी हा शब्द परदेशी आहे असें दिसतें. बहुश: फारशी सगलाद शब्दावरून आला आहे. इंग्रजी scarlet हा हि शब्द फारशी सगलादवरून च घेतला असावा. एक r मध्यें घुसडून दिला आहे. हा इंग्रजी बोलण्याचा स्वभाव हि आहे. ( भा. इ. १८३२ )
सकारणें [ सत्कृ = सकार ( णें ) ] (भा. इ. १८३६)
सकाळ १ [ सत्काल = सक्काळ = सकाळ ] उत्तम शुभ काल तो सकाळ, संध्याकाळ हा शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे. त्याच्या च धर्तीवर सकाळ हा शब्द हि पुल्लिंगी व स्त्रीलिंगी होता. संध्याकाळ ह्या सामासिक शब्दांत संध्या हा शब्द स्त्रीलिंगी तरी आहे. परंतु सत्काल ह्या शब्दांतील सत् स्त्रीलिंगी नाहीं. तेव्हां केवळ संध्याकाळ ह्या शब्दाच्या अनुकरणानें सकाळ हा शब्द स्त्रीलिंगी मानला गेला आहे. मला सकाळ झाली. सकाळ झाला. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाला. दुपार झाला. दुपार झाली.
(भा. इ. १८३३)
-२ [ सकालम् early in the morning = सकाळ, सकाळीं ] early in the morning
सक्त [ असक्तं ( त्वरितं ) = सक्त ( अलोप ) ( क्रियाविशेषण, अव्यय ) ] त्यानें सक्त मेहनत केली = सः असक्तं उद्यतः
सगट [ सकृत् ( together ) = सकट = सगट ] बरोबर, together. छत्रीसगट = छत्रीसुद्धां. सरसगट = सर्वसकृत् ( भा. इ. १८३३)
संगवई [ संवयस् = संगवई ] compassion.
सगा [ सखा = सगा. सखासोदरक = सगासोयरा] (स. मं. )
सगा सोयरा [ सखा सोदरक ] ( सगा पहा)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ष
षुक्क् [ पुक्क्] (शुक्क् पहा)
स
-स [ अच्छ ] गृहं अच्छगम्य = घरा सजाऊन.
स १ [ गृहम् + अच्छ towards (vaidik) = घरा + स = घरास
गृहस्य + आरे, आरात् = घरा + ला = घराला
गृहस्य + अन्ति = घरा + ते = घरातें ]
-२ [ घरास = गृहं आच. स हा प्रत्यय आच ह्या पूर्ववैदिक विरळ अव्ययापासून निघालेला समजणें युक्त ] ( आसपास पहा)
स (सा-सी-सें ) [ पुत्रदेश्य almost a boy = पोरगेलासा. मनुष्यदेश्य = मनुष्यसा. पशुदेश्य = पशूसा.
देश्य = स ( सा-सी-सें ) ]
सई १ [ सति (सो to cut) end, destruction = सई, सै, सही ] end, destruction, finish. वसई सई केली Vasai was captured. स्मृति = सई, सय memory. सई मारणें म्हणजे अखेरी मारणें.
-२ [ सत्यम् ! = सई ! ] गेलों त सई = गतः अहं तावत् सत्यम् I did go after all, indeed.
-३ [ सखि ! = सहि ! = सई ! ] सया, सये, इत्यादि वैभक्तिक व लैंगिक रूपें.
-४ [ गांवढे लोक सई शब्द प्रत्येक क्षणीं ह्या अर्थी मराठींत सध्या योजतात. हा सपदि ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. सपदि = सअइ = सइ = सई. ] ( सरस्वतीमंदिर)
-५ [ सखि = सहि = सइ = सई ] कसा जातो पाहूं तो सई = कथं गच्छति पश्यानस्तावत् सखे. सई या शब्दाचें संबोधन सये. सई हा शब्द पुलिंगी हि आहे व स्त्रीलिंगी हि आहे. सया, सय्वा हे हि शब्द सखि शब्दापासून निघाले आहेत व ते लावण्यांत अर्थातच फार येतात. (भा. इ. १८३४)
स्थलनामव्युत्पत्तिकोश
नांदर्ड - नंदक (नांदुर्खी). खा व
नांदर्ड़ें -नंदक (नांदुर्खी) - नंददरवाटं. खा व
नांदर्वडें - नंदक (नांदुर्खी). खा व
नांदवण - नंदक (नांदुर्खी ). खा व
नादिन - नार्दन् ( बैल ) - नार्दिनं. खा म
नादू- नादेय (नरवेल) नादेयद्रु. खा व
नांदूर -नंदक (नांदुर्खी). खा व
नांदूरखेडें - नंदक (नांदुर्खी). २ खा व
नांदेड - नंदक (नांदुर्खी) - नंदवेरं. २ खा व
नांदोड - नंदक (नांदुर्खी ) नंदवाटं. खा व
नांदोड - नंदपद्र. (भा. इ. १८३६)
नांदोरी नंदक (नांदुर्खी ) - नंदपुरी. खा व
नांदोरें - नंदक (नांदुर्खी ). खा व
नांनछळ - नंदक (नांदुर्खी ) नंदस्थल. खा व
नामट्या घाट - नामिवाटिका घाट: खा प
नामपुर - नामि (विष्णु ) - नामिपुरं. खा म
नायगांव - (नयगांव पहा)
नायगांव - (नैगांव पहा)
नायगांव - नदीग्रामं ( = नइगांव = नैगांव = नायगांव ) मा
नायगांव - नदीग्रामं. ४ खा नि
नायगांव बारी - (गांवावरून ). खा नि
नायडोंगरी - नदी डोंगरिका. खा नि
नारणें - नार ( नारायण शब्दाचा एकशेष)- नारायणवनं. खा म
नारवाड - नार ( नारायण शब्दाचा एकशेष) - नारवाटं. खा म
नारवाड़ें - नार ( नारायण शब्दाचा एकशेष) - नारवाटकं. खा म
नारवें - नार ( नारायण शब्दाचा एकशेष) - नारवहं. खा म
नारवोहाळ - नार (नारायण शब्दाचा एकशेष) - नार = ओघालि. खा म
नारायणपुर - नारायण. २ खा म
नारोद - नार ( नारायण शब्दाचा एकशेष) - नारोदं. खा म
नालखेड़ें - नालिखेटं. खा नि
नावरा - नववर ( नदा पति ) - नववरः. खा
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
शेव १ [ सेवि (बोर) = शेव] शेव म्हणजे फळफळावळ.
-२ [ सेवं (शेवफळ) = शेव ]
शेवगा १ [शिग्व्रा = शेगवा, शेवगा (गर्दे-वाग्भट ) ] ( भा. इ. १८३४)
-२ [ शिग्रुकः = शेउगा = शेवगा ]
शेवट [ छंबट् ! ( नाशदर्शक अव्यय) = शेंवट] शेंवट ! तो मेला = छंबट् स मृतः. महाभारत ३-१८-२६ त हा शब्द येतो.
शेंबट [ सीमन्= शिवँ = शींव = शींवट (अतिशयदर्शक) = शेवट ] ( ग्रंथमाला)
शेवती [ शतपत्री = शेवती ]
शेवा [ शेव् सेवने = शेवा, सेवा ] म्हणजे सेवा शब्दाप्रमाणें शेवा शब्द हि शुद्ध संस्कृत आहे. (भा. इ.१८३३) शेळ [ शीश् ( शब्द: ) ] ( शीट पहा)
शेळपट [ चिल्लपट्टः = शेळपट ] चिल्ल म्हणजे सैल व पट्ट म्हणजे वस्त्र आहे ज्याचें तो. शेळपट म्हणजे अजागळ, चापून-चोपून धोतर, वस्त्रें न नेसणारा.
शेळी [ छेलिका = शेळी. छगली = शअळी = शेळी ] छलिका हा शेळी ह्या मराठी प्राकृत शब्दावरून बनविलेला संस्कृत शब्द आहे; मूळ शब्द छागः (भा. इ. १८३५)
शोकी [ सौखिक: = शोकी ] सुखाभिलाषी.
शोफा [ शतपुष्पा = शअउप्फा = शोफा ]
शौनिक [ शाकुनिक: = शौनिक:] शौनिक हा संस्कृत शब्द शाकुनिक या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. शकुनान् हंति शाकुनिक: ( ४-४-३५ )
श्यानी - करूनश्यानी, जेऊनश्यानी, घेऊनश्यानी इ० धातुसाधित अव्ययांतलें. हा श्यानी प्रत्यय वैदिक भाषेंत तुरळक आहे. हा पाणिनीय संस्कृत भाषेंत नाहीं व कोणत्याही प्राकृत भाषांत नाहीं. वैदिक भाषेंत सन् ला इ प्रत्यय लागून सनि असें सप्तम्यंत रूप धातूना जेडून कांहीं थोडीं धातुसाधित अव्ययें बनतात. जसें-गृणषिणि, तरीषणि, नेषणि इ. ह्या सनि-षणि प्रत्ययापासून मराठी श्यानि प्रत्यय आला आहे. (राधामाधव विलासचंपू पृ. १८५)
श्रद्धा १ [ श्रद्धा ( शौच ) = श्रद्धा ] शौच, परसाकडेस.
-२ शुधा ( पादणे ) = शर्धा, श्रध्धा ] पादपें. भिक्षुक लोक सोंवळ्यांत असतांना हा शब्द योजतात.
श्रध्धेला गेला म्हणजे अपानद्वारा वायू सोडण्या करितां गेला. ( भा. इ. १८३७ )
श्रद्धासु [ श्रत् + धा-धास् ( सिच्) श्रद्धासुः = श्रद्धासु ] faithful.
श्रध्धा [ शर्धा = श्रध्धा ] श्रध्धेला जातो म्हणजे वायू सरण्याला जातो.
श्रु-श्रवति = सराव. अक्षुणोत् = सुनणें, सुनावणें ( भा. इ. १८३४)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
शेपाटी [ शिफा a fibrous root = शिपटी, छिपटी शेपाटी ] a twig of tree.
शेंब १ [ श्लेष्मन् Phlegm = शेंब, शेम ] शेंब हगतो passes phlegmy matter through anus.
-२ [ श्लेष्मन् = शेंब ] आंव झाली असतां गुदद्वारा जो आम पडतो त्याला शेंब म्हणतात.
शेंबडा [ श्लेष्मल] (शेमडा पहा )
शेंबूड १ [ श्लेष्मधातु Phlegm = शेंबूड ] Phlegm.
-२ [ श्लेष्मोदक = शेम्मोड = शेमोड = शेंवोड = शेंबोड = शेंबूड ] (भा. इ. १८३३)
शेम [ श्लेष्मन्] ( शेंब १ पहा )
शेमडा [ श्लेष्मल = शेमडा, शेंबडा ] Phlegmetic
शेमणें १ [ शेप = शेप ( Penis) शेपन् = शेमणें ] Penis vulg.
-२ [ शेप ]
-३ [(सं.) शेव = (प्रा.) शेम = (म.) शेमणें (पुल्लिंग ) ] (भा. इ. १८३२ )
शेर १ [ श्रेयः = शेर (अधिक श्रीमान्) ] तेवढ्यानें तो शेर झाला = तेन स श्रेयानभवत्.
-२ [ सेरः = शेर ] सेर शब्दाची व्याख्या भास्कराचार्यांनीं लीलावतींत केली आहे. बहुशः हा शब्द भास्कराचार्यकालीन मराठी आहे.
शेरणी [ श्रेणी = शेरणी ] श्रेणी म्हणजे एका च धंद्याच्या माणसांचा समाज. त्यांना वांटून देण्याचा पदार्थ तो शेरणी. (भा. इ. १८३३)
शेरास सवा शेर [ जयति श्रेयसः सपादश्रेयस्तरः = शेरास सवा शेर. श्रीमानाला अधिक श्रीमान जिंकतो ]
शेंरी (सैरेयी turned up by the सीर plough, under plough = शेरी ] land under plough, cultivated land. शेरी जमीन, शेरी.
शेलक (का-की-कें) [ शिल् वेंचणें. क प्रत्यय लावून शेलक ( का-की-कें) ] (भा. इ. १८३३)
शेलकें-का-की [ शिल् उंछे (वेंचणें ) = शेलकें ] choice, picked.
शेलटी [सल्लकी = शेलटी ] वृक्ष.
शेला [ चेलः = सेला = शेला. चिल् ६ वसने ] (धातुकोश-शेल १ पहा)