Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

ढोंग - } धूपांग } (सरल वृक्ष) खा व
ढोपर - } धूपाई }

ढोमण - धूम्रक ( शिसू) - धूम्रकवनं. खा व

ढोलवारें - धवलिकाद्वारं. खा नि

ढोलासिंगी - धवलिकाशृंगिका. खा नि

ढोली - धवलिका. खा नि

 

तटबुधें - तट ( उतरण) - तटंबौद्धं. खा नि

तताणी - ततपर्णी. २ खा व

तपोवन - तपोवनं. खा नि

तरंगवाडी- त्रंग (हरिश्चंद्राचें आकाशनगर) - त्रंगवाटिका. खा म

तरगार - सं. प्रा. तरकागाहर. यल्लापूर. ( शि. ता. )

तरडी - तरट (तरवड) - तरटिका. खा व

तरडें - तरट ( तरवड ) - तरटकं. २ खा व

तरसाळी - तरक्ष (तरस) - तरक्षपल्ली. खा इ

तरसोद - तरक्ष (तरस ) = तिरक्षोदं. खा इ

तरोडें - तर - तरवाटं. खा नि

तर्‍हाड - तर. खा नि

तर्‍हाडी - तर - तरवाटिका. २ खा नि

तर्‍हावद- तर - तरावर्त. खा नि

तलखेड - तल. खा नि

तळई - तल - तलावती. खा नि

तळदी - तरदी ( वनस्पति). खा व

तळबीड - तलविधं = तळबीड.
भैरिक्याद्यैषुकार्यादिभ्यो विधल्भक्तलौ (४-२-५४ ). विध हा प्रत्यय देशवाचक आहे. भौरिक्यादि गणांत किंवा ऐषुकार्यादि गणांत तल शब्द नाहीं. तेव्हां तो ह्या गणांत नवीन घातला पाहिजे.

तळवाडें - तलवाट = तळवाड = तळवडें = तळवडें (ग्रंथमाला)

तळेगांव - तलग्रामं (मावळांतील मुख्य गांव - तलावाशीं कांहींएक संबंध नाहीं.)

तळेगांव - तल - तलीयग्रामं. २ खा नि

तळवाडें - तलपाटं. १० खा नि

[ उत (आणि) = उअ = व ] ओ, व, हें अव्यय फारशींत संस्कृतसदृश प्राकृतांतून गेलेलें आहे; व मराठींत महाराष्ट्रीद्वारा उतरलेलें आहे. व हें अव्यय फारसींतून मराठींत आलें असें म्हणण्याचें कारण नाहीं. (भा. इ. १८३५)

वइनी [ गृहवत्नी = वयनी = वइनी ] घरांतील यजमानाच्या पत्नीला वयनी म्हणतात. वयनीबाई म्हणजे गृहवत्नी. भगिनी पासून वहिनी व बहीण हे दोन शब्द निघतात.

वई [ वृति = वइ = वई] वई म्ह० कुंपणा. (ग्रंथमाला)

वखवख [ वृष्]

वखवखणें १ [ वृष्. वीप्ता, आभीक्ष्ण्यं) वृषवृष = वखवख ] वखवख म्ह० अत्युत्सुक होणें. ( धा. सा. श. )

-२ [ वष् हिंसायां. वष्= विख् = वखवख (द्विरुक्ति) ] ( ग्रंथमाला )

वग १ [ अवगति = वगइ ( अलोप ) = वग (स्त्रीलिंग)] अवगति म्हणजे माहिती, परिचय, ज्ञान. (भा. इ. १८३६)

-२ [ वग् गतौ ] (ग्रंथमाला)

वंगण १ [ व्यंजनं = वंगण ] वंगण म्हणजे गाडीच्या चाकाचें ओंगण.

-२ [ भ्रक्षण (तेल) = वंगण ]

वंगणें १ [ वगि गतौ. वंगनं = वंगणें ] वंगणें म्हणजे नम्रतेची गति कमी करणें. (धा. सा. श.)

-२ [ वघि आक्षेपे निंदायां । गतौच । वंघनं = वंगणें ] कसा वंगला म्हणजे निंदेनें मऊ आला. ( धा. सा. श. )

वगत [ अवगति ( ज्ञान ) = वगत ]

वगळणें [ अवगलन = ओगळण = वगळण = वगळणें ] (ग्रंथमाला)

वाचक-वचकणें १ [ वष्क = वसक = वाचक. वष्कन = वचकणें ] वष्क म्हणजे पहाणें. ( भा. इ. १८३४)

-२ [ उच्चकनं = वचकणें ] उच्चकनं म्हणजे आदरानें पहाणें. (भा. इ. १८३७)

वचणें [वि + अय् to waste away = वचणें ] नासणें.

वाचावचा [ वच् परिभाषणे - वचंवचम् = वचावचा ( बोलतो ) ]

वजा [ वज् ]

वटई [ वर्तका = वटई] पक्षिविशेष.

वटवट [ वट् परिभाषणे ] ( ग्रंथमाला )

वटी [ वर्तिका ] ( वाटी पहा)

वठणें १ [ वंठ ] ( उठणें ३ पहा)

-२ [ व्यथ् १ भयसञ्चलनयोः . व्यथ् ( कोरडें होणें ) = पडणें ] वृक्षः व्द्यधते = झाड वाटतें. ( धा. सा. श. )

-३ [ उठ् उपघाते ] ( ग्रंथमाला )

वठवणें [ प्रस्थापन = पट्ठावण = वट्ठावण = वठावनें = वठवणें ] भा. इ. १८३२)

लोढणें १ [ स्त्र्यगारं अंतःपुरं अवरोधनं ( अमरद्वितीयकांड-पुरवर्ग ११) रोधन = लोढण ] लोढण म्हणजे स्त्री.
वडिलांनीं आमच्या गळ्यांत हें लोढणें अडकविलें आहे म्हणजे स्त्री अडकविली आहे. लोढणें (रोधन) याचा अर्थ प्रतिबंध असाहि आहे. त्यामुळें हा शब्द मराठींतहि व्द्यर्थक आहे. (भा. इ. १८३४)

-२ [ लोडनं प्रतिघाते ] (ग्रंथमाला)

लोंढा [ लुंडकः = लोंडा, लोंढा. लुंडक = गोळा ]

लोण [ लवनं = लोण ] कोणा वर लोण येणें.

लोणकढें [ क्वथ् १ निष्पाके. नवनीतक्वथितं = लोणकढे ( तुप ) ( धा. सा. श. )

लोणा [ लवणक = लोणअ = लोणा ] ओलासारखा जमिनीवर येणारा मिठाचा एक विकार. ( भा. इ. १८३३) लोथ [ छुन्थ् १ हिंसायाम् = लोथ ( मृतशरीर) ] शीर कापून बाकी राहिलेला शरिराचा भाग. (धा. सा. श.)

लोधा [ लुब्ध = लोद्ध = लोध (धा-धी-धें ) ] ( भा. इ. १८३२)

लोंबणें [ लुबि अदर्शने. लुंबनं = लोंबणें ] तो आडमार्गात लोंबत राहिला म्हणजे दिसत नाहींसा झाला.  ( धा. सा. श.)

लोळविणें [ लू ९ छेदने. लोलूयनं = लोळविणें ] तरवारीनें लोळवणें = असिपत्रेण लोलुयनं. लोळणेंचें णिच् जो लोळविणें तो धातू, निराळा. ( धा. सा. श. )

लोळा [ लोहलः = लोळा ] लोहल म्हणजे सांखळीची मधली मोठी कडी.

लौंड [ लौड = वेड्यासारखें वागणें. लौड = लौंड (उन्मत्त, मूर्ख मनुष्य) = लौडा, लवडा (उन्माद = शिस्न ) ] (भा. इ. १८३२)

लौडा [ लौडः ] ( लवंडणें पहा)

लौंडा [ रुंड (offspring of mule on a mare)
= लौंडा ( Bastard), लवंडा ]

लौंडी [ रुंडिका = लुंडी = लौंडी, लवंडी ] रुंडिका म्हणजे कुंटण.

लेचापेचा १ [ लिश् ४ अल्पीभावे + पिशू अंशभावे.
लेशकपेशक = लेच्यापेच्या = लेचपेचा.  श = च ] weak and reduced. (धा. सा. श.)

-२ [ लिशः + पिशः. लिश् अल्पीभावे + पिश् अवयवे ]

लेच्यापेच्या [ लिश् to grow small = लेश्यः = लेच्या. पिप् to hurt =पेष्यः = पेच्या ]

लेंडं [ लेंडं = गू ( पशूंचा ) ] (भा. इ. १८३२)

लेंड्डक [ लेष्टुक = लेठ्ठुक = लेड्डुक = लेंडुक ]

लेणार [ रत्नगृह = लअनघर = लेन्हार = लेणार ]

लेणें - रत्न. रच्यास्थानीं मागधींत ल; कारण मागधींत र हा उच्चारच नाही. महाराष्ट्रीची मराठी होतांना मगधांतील लोकांच्या संगतीनें रअण हा उच्चार लअण = लयण = लइण = लेणें असा मराठींत लकारयुक्त झाला. ( राधामाधवविलासचंपू पृ. १६२)

लेपें [ लेप्यम् (चित्र ) = लेपें ] भिंत, कापड इत्यादींवरील चित्र.

लेंवडा [ श्लेष्मटः ] Phlegmy (लेमडा पहा )

लेंभडा [ श्लेष्मटः ] Phlegmy ,,

लेमडा [ श्लेष्मट: = लेंबडा, लेंभडा, लेमडा ] Phlegmy. शेमडालेमडा. श्लेष्मट = शेंबडा.

लोचका [ लेचक: ] ( धातुकोश-लोचक पहा)

लोटणें १ [ लोट् स्वप्रे. अति लोट = रात्र झाल्यामुळे लोटलों = अतिरात्रं अलोटम् ] लोटणें = निजणें. ( भा. इ. १८३३)

-२ [ लोट् पूर्वभावे = लोट. दिवस लोटले = दिवसाः अलोटन्. लोटणें = गत होणें. लोटणें (ढकलणें) लोट् धौर्त्ये । ] (भा. इ. १८३३)

-३ [ लुट् १ भाषायां ] त्यानें शिव्यांची लाखोली लोटली म्ह० अति शिव्या दिल्या. लोटणें म्ह० अति बोलणें. ( धा. सा. श )

लोठा [ लोष्टः = लोठा ] मोठेमोठे लोठे मारणें.

लोड [ लोटकं = लोड] पाठ ठेकून लोळण्यास उपयोगी असा तक्क्या. 

डुंखरें - द्रुमखलं. खा व

डुबकी - द्रुम (झाड) - द्रुमकिका. खा व

डुवगुल - द्रुम (झाड) - द्रुमगुल्मं. खा व

डोंगर - दुर्वगिरि = डुग्गइरि = डुग्गिरी = डोगिर = डोगर = डोंगर. (महाराष्ट्राचा वसाहतकाल पृ-२०९ )

डोंगरगांव - डुंगरग्रामं. मा

डोंगरगांव - दुर्गगिरि. खा नि

डोंगरद - दुर्गगिरि. खा नि

डोंगराज - दुर्गगिरि. खा नि

डोंगराळ - } दुर्गगिरि.

डोंगराळे - } दुर्गगिरि. खा नि

डोण - द्रोणी. खा नि

डोण - द्रोण = डोण, दोण (नदीनाम, प्रांतनाम) (भा. इ. १८३६)

डोंबकणी - डोंब (लोकनाम ) - डोंबकवनी. खा नि

डोंबें - डोंब (लोकनाम) - डोंबकं. खा म

डेमखली - डोंब (लोकनाम). खा म

डोमगांव - डोंब (लोकनाम) - डोंबग्रामं. खा म

डोमवाडें - डोंब (लोकनाम ) - डोंबवाटं. खा म

डोहोरी - दुहृद (ढोर) - दुहृदपुरी. खा म

डोळगांव - दोला - दोलकग्रामं. खा नि

 

ढगडी - ध्वाक्षा ( वनस्पति ) - ध्वाक्षवाटिका.

ध्वाक्षा = ढाका = ढाग = ढग० खा व

ढंढाणें - धांधा (एलची ) - धांधावनं. खा व

ढवलाई - धवल - धवलावती. खा नि

ढवली - धावलिका. २ खा नि

ढवलीगार बारी - (गांवावरुन). खा प

ढवळीबारी घाट - (गांवावरून). खा प

ढाणाविहीर - धाना. खा व

ढालगांव - डाहल (लोकनाम) - डाहलग्रामं. खा म

ढेकाळें - ढेंक (पक्षिविशेष) - ढेंकतलं. खा इ

ढेंकूं - ढेंक (पक्षिविशेष) - ढेंकं. खा इ

ढंगाचें - ढेंक (पक्षिविशेष) - ढेंकीयं. खा प

ढोकाटी बारी - ध्वांक्षवाटिकाद्वार. खा प

लुचाडणें [ लुञ्च् १ अपनयने. लुचादानं = लुचाडणें ] ( धा. सा. श.)

लुची [ रुचित = लुचिअ = लुची ] श्राद्धांत रुचितं म्हणून तृप्तिप्रश्न करितात. लुची जीभ म्हणजे रुचकर अन्न खाणारी जीभ. ( भा. इ. १८३४)

लुच्चा १ [ लुंच् अपनयने. लुंचक = लुच्चअ = लुच्चा] (ग्रंथमाला)

-२ [ लुप्सा = लुच्चा (one who लुभ्s or लुप्s) ]

लुटारू [ लुंठाकरः = लुटारा, लुटारू ]

लुटुलुटु चालणें [ लुट् प्रतिघाते. लुटुलुटु ( द्विरुक्ति ) चालणें म्हणजे प्रत्याघात झालेला मनुष्य चालतो तसें चालणें. लुटुलुटु यांतील ट बद्दल मराठी टु आला आहे. हा उ षणु वगैरे अनेक शब्दांत येतो. ग्रंथमालेंतील माढें येथील शिलालेखांत षणु रूप आलें आहे.] (ग्रंथमाला)

लुबडा [ लुब्धकः = लुबडा ]

लुबरा [ लुभिरः ( लुभति ) लुभ् ४ आकांक्षायाम् = लुबरा ] हावरा. ( धा. सा. श. )

लुबाडणें १ [लुभ् ४ आकांक्षायाम, लुब्धापनं = लुबाड-अणं = लुबाडणें ] (भा. इ. १८३६)

-२ [ लुभ् ४ आकांक्षायाम्, लुब्धादानं = लुब्बाडाणँ = लुबाडणें ] ( धा. सा. श. )

लुला [ लोलः ( कांपणारा ) = लुला ]

लुसलुशीत १ [ लूष् (भवादि भूषविणें) = लुसलुशीत ] ( धा. सा. श. )

-२ [ श्लक्ष्णश्लंक्ष्णित = लुसलुशित ] (भा. इ. १८३४)

लूट [ लोप्त्रं = लोट = लूट ] चोरांची लूट म्हणजे चोरलेलें धन.

ले-घरले (खानदेशी) = गृहस्य आरे near the house. ला बद्दल खानदेशांत व बंगालींत ले योजितात.

लेक १ [ रेक a debased fellow = लेक ] लेका ! नीघ.

-२ [ ललक = लअक = लेक, लेंकरूं ( खेळणारें ) ] (सं. मं.)

लेंकरूं १ [ ललकतर = लेकअर = लेंकर = लेंकरूं ] ( ज्ञा. अ. ९ पृ. १७)

-२ [ ललक ] (लेक २ पहा )

लेका ! [ रेक ! ( नीच मनुष्य ) = लेका ! ]

लेकुरवाळी [ ललकरपाली = लअकअरवाळी = लेकरवाळी = लेकुरवाळी ] लहान अर्भक जतन करणारी स्त्री.

टेमलाय - तिमिरा (नगरनाम ) - तिमिरावती. खा म

टेहूं - स्तिभिः (झुडूप ) - स्तिभिकं. खा व

टोकडें - तोक्मन् ( टोंक ) - तोक्मवाटं, खा नि

टोकरखेडें - तुग्र ( भुज्युपिता ) तुग्रखेटं. खा म

टोकरतळें - तुग्र (भुज्युपिता) तुग्रतलं. खा म

टोकरवें - तुग्र (भुज्युपिता ) - तुग्रवहं. २ खा म

टोंकलें - तोक्मन ( टोंक ) तीक्मपल्लं. खा नि

टोणगांव - तूणि (तीळ) तृणग्रामं. खा व

टोळाणें - तुलिका (टोळी) - तुलिकावनं. खा इ

टोळी - तुलिका (टोळी ) - तुलिका. ३ खा इ

 

ठाणें - स्थानक ( शहर ) - स्थानकं. खा म

ठाणे - बिंबस्थान, (पैठण पहा)

ठाणेपाडा - स्थानकपाटक: खा प

 

डांग - ढंक. खा (महाराष्ट्राचा वसाहतकाल पृ. २०९)

डांगर - डंगर (भोपळा ) - डंगरकं. २ खा व

डांगरखळी - डंगरखलिका, खा व

डांगराळ - डंगरपल्लं. ख व

डांगरी - डंगर (भोपळा ) - डंगरिका. खा व

डांगवाडें - ढंक ( पर्वत विशेष) - ढंकवाटं. खा नि

डांगसौंदणें - ढंक (पर्वत विशेष) - ढंक सुंदवनं. खा नि

डांगुरणें - डंगरवनं. खा व

डाणें - ड (शिव ) डवनं. खा म

डांभुर्णी - डामर (लोकनाम) - डामरवनी. २ खा म

डामरूण - डामर (लोकनाम) - डामरवनं. खा म

डावली - दार्व (लोकनाम) - दार्वपल्ली खा म

डावर्ली - डामर (लोकनाम) - डामरपल्ली. खा म

डाहुली - दध्रपल्ली (दध्रनांवाच्या राजावरून) मा

डिगसरी - दिश् - दिकसरी. खा नि

डिगसाई - दिश् - दिक्स्वामिका. खा नि

लाहो [ लंभ्, रंभ् शब्दे. रंभः, लंभः = लाहो ] a continuous cry.

लाह्या [ लांजिका = लाइआ = लाया = लाह्या.
( aspirated) लाही (एकवचन ) ]

लिक् Lick [ लिलिक्षति (लिह् = Lick ] English लिक् lick is desederative of लिह् derived from.]

लिंगाईत [ लिंगायत = लिंगाईत ]

लिंग्या [ लिंगिन् (लुच्चा, ढोंगी) = लिंगी. लिंगिक: = लिंगिआ = लिंग्या ] (भा. इ. १८३६)

लिफाफा [ लिप्तपत्र = लिफाफा ] a cover for a letter. फारशींत लिप् to paint, write पासुन लिफाफा शब्द गेला आहे.

लिवणें [ लिप्= लिव ] संस्कृतांत लिहिणें या अर्थी दोन धातू आहेत, लिख् व लिप्· लिखपासून लिहिणें व लिपपासून लिवणें. लिवणें हा शब्द महाराष्ट्रांत ब्राह्मणेतर जाती हमेश योजतात, व हा शब्द शुद्ध आहे. लिहिणें या शब्दाचा अपभ्रंश नाहीं. (भा. इ. १८३४)

लिवलिवणें [ लिप् (लिप्त = भक्षित ) = लिव (द्विरुक्त) लिवलिवणें ] जीभ फार लिवलिवते आहे, म्हणजे फार खाण्यास इच्छिते आहे. ( भा. इ. १८३५)

लिहालिहा [ ( Vaidik रेरिह् (continuously licking) from रिह् to lick = लिहालिहा ] जीभ लिहालिहा करते खाण्याला.

लुकलुकणें १ [ लोक् १ दर्शने. लोकनं (लोकची द्विरुक्ती) = छकळुकणें ] ( धा. सा. श. )

-२ [ लोकृ दर्शने. द्विरुत्तोनें लुकलुकणें म्ह० थोडें थोडें दिसणें ] ( धा. सा. श. )

लुगडें [ दुकूलं = डुगूलं = लुगूड़ँ = लुगडेँ ] देशमुख व पाटील व सरदार यांना पूर्वी वस्त्रें देत त्यांना लुगडी ही संज्ञा असे. ( भा. इ. १८३३)

लुंगवणें [ लुष्, लूष १० चौर्ये. लुष्, लूष् (लूषयति) = लुखवणें = लुंगवणें (चोरणें ). लूष् चोरणें ( चुरादि ) ] ( धा. सा. श. )

लुचका १ [ लुचकः ] (धातुकोश-लोचक पहा)

-२ [ लुंच् ]

लुंचणें [ लुंज् १० बलादाने. लुंजनं = लुंचणें ] पोर दूध लुंचतें म्हणजे थान ओडून पितें. पोर थानाचा लुचका घेतें म्हणजे ओटानें दुधाकरतां थान ओढतें. ( धा. सा. श. ) म. धा. २३

लाफ्या [ लंफ = उडी मारणें. लाफ्या = लंफक = उड्डया मारणारा = बोलतांना उड्या मारणारा = गप्पा ठोकणारा ] (भा. इ. १८३२)

लांबगा [ लंब + क ] (पोरगा पहा )

लांबबिंब [ लंबविलंब = लांबबींब = लांबबिंब. विलंब = बिअंब = बिंब ] (भा. इ. १८३४)

लाभ [ विक्रेत्रा मूलादधिकं प्राह्यं लाभः । ] धान्य मापतांना पहिल्या अधोलीस लाभ म्हणतात. लाभ म्हणजे वाढीची व्याजाची अधोली. ती पहिल्यांदां काढून घेत.

लाभणें [ लाभपासून नामधातू] धान्य मापतांना पहिल्या अधोलीस लाभ म्हणतात. प्रयासानें कोणास पहिला मुलगा झाला म्हणजे मुलगा लाभला म्हणतात. ( धा. सा. श.)

लामणदिवा १ [ लावण्यदीपक = लामणदिवा ] (भा. इ. १८३२)

-२ [ लावण्यदीपः = लावणदिवा, लामणदिवा ]

लारी [ लेहिताखारी ] (कहारी पहा)

लालडी [ ललाटिका (तिलकविशेषः ) = लल्लटिका = लालडिआ = लालडी ] ornament. कपाळावर बांधण्याचा एक दागिना.

लालुच [लोलुंचा = लालुच]

लालुचणें [ लुञ्च् १ अपनयने. लोलुञ्च्यते = लालुचणें ] ( धा. सा. श. )

लावणी [ मूळ संस्कृत शब्द लापनी. त्याचें प्राकृत लावणी] ह्या लावण्या महाराष्ट्रांतील लोकांच्या तोंडीं आज दोन हजार वर्षांपासून आहेत. शृंगार, प्रेम वगैरे विषयांवर लापनी ऊर्फ लावणी गाण्याचा छंद इतर कोणत्याही राष्ट्रांतल्यापेक्षां महाराष्ट्रांतील लोकांना विशेष आहे. ( सरस्वतीमंदिर श्रा. १८२६)

लावणीसंचणी [ लापनीसंचयनी = लावणीसंचणी ]

लावालाव १ [ लामकालामकं = लावालाव. लमकस्य भावः लामकं. लामकं + आलामकं= लामकालमकं. ] लमक म्हणजे जार, दुष्ट पुरुष. त्याचा गुण तो लावालाव.

-२ [ लापालापिका = लावालाव ] लावालाव म्हणजे बोलून भांडण लावणें.

लाहालाहा १ [ लष् ( द्वि. ) ] ( धातुकोश-लाहालाहाकर पहा)

-२ [ लभ् १ प्राप्तौ. लालभः = लालहा = लाहालाहा लभचा क्रियासमभिहार ] लाहालाहा म्हणजे मिळविण्याची अतिशयित हाव. ( धा. सा. श.)

लाघव [ श्लाघिमा = लाघव ] कवीचें लाघव म्हणजे स्तुति करण्याचें कौशल.

लाघवी [ श्लाघाविन् = लाघावी = लाघवी ] लाघवी म्ह० हांजी हांजी करणारा, मर्जी संपादन करणारा. लाघावी व लाघवी हीं दोन्हीं रूपें भाषेत प्रचलित आहेत. (भा. इ. १८३४)

लाँच [(स्त्री) लंचा = लाँच (स्त्री)] (भा. इ. १८३४)

लाज १ [ लज् to cover अपवारणे (आच्छादणें)= लाज (कासोटा) ] त्यानें माझी लाज काढली म्हणजे कासोटा फेडला.

-२ [ लज् १ प्रकाशने. लंजा = लाज ] दिव्याची लाज म्हणजे प्रकाश. ( धा. सा. श. )

-३ [(पुं.) लंज (कासोटा) = लाँज = लाज (स्त्री)] लाज म्ह. कासोटा. त्यानें लाज सोडली आहे म्हणजे कासोटा सोडला आहे. कोणी बाई म्हणते:- त्यानें माझी लाज काढली म्हणजे त्यानें माझा कासोटा फेडला. (भा. इ. १८३४)

-४ [ लज् १० अपवारणे ] लाज काढली. (धा. सा. श.)

लाजाळूं [ लज्जालुः = लाजाळूं ]

लाट १ [ राध् - राधः good fortune, prosperity = लाट ] prosperity, gain. लाट लागला.

-२ [ अरघट्ट ] ( रहाट पहा )

-३ [ रत्निः (पुं. स्त्रि.) (Elbow to fist) = लाटण = लाट = लाटणें ] हाताची लाट, लाटण.

-४ [ लाटः (जीर्णालंकार) = लाट (आकस्मिक लाभ) ]

लाटण [ रत्निः ] (लाट ३ पहा)

लाटणें [रत्नि = लटणि = लाटणी = लाटणें ] (भा. इ. १८३६)

लाड [ ह्राद्, ल्हाद् १ सुखे. ह्राद: ल्हादः = लाड. हादिनी = लाडण ] लाड, करणें म्ह० सुख होईल असें वागवणें. ( धा. सा. श. )

लाडका [ ह्लाद् १ सुखे. ह्लादक: = लाडका ]

लाडण [ ह्लादिनी] ( लाड पहा )

लाथ [ लत्ता ]

लाथाडणें [ लृत्तास्तृतं = लाथाड, लाथाडणें (+णें)
संस्तृत = संथड (जैनमहाराष्ट्री) उपस्तृत = उपत्थड (जैनमहाराष्ट्री) ] (भा. इ. १८३६)

लापट [ लंपट = लापट ]