Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
वैराण [ विरिणं शून्यमूषरं (अमर-तृतीयकांड-नानार्थवर्ग-५६) शून्यं निराश्रयों देशः । उषरं स्थलभेदः तद्विरिणमिति स्यात्. वैराण हा शब्द विरिण या शब्दापासून निघाला आहे. विरिणस्य इदं वैरिणं । देश वैरिण झाला आहे = देश वैराण झाला आहे ] (भा. इ. १८३३)
वोज १ [ ओजस्=वोज (नपुंसक)] (भा.इ. १८३३)
-२ [ ऊर्जा = उज्जा = वोजा = वोज ( स्त्री ) ] ( भा. इ. १८३३)
वोटा [ प्रकोष्ठः = वओटा = वोटा = ओटा ]
वोडंबर [ अवडंबर (ज्यांत उंबर म्हणजे ढोलकें वाजवून खेळ करतात तो खेळ, गारोड्याचा खेळ) ] (ज्ञा. अ. ९ पृ.८४)
वोढ [वध्]
वोढि [ ऊह् : ऊढि idea, consideration.
आ + ऊह् : ओढि idea, consideration = वोढि ] idea, consideration.
उ०- परि धर्मपत्नी कां धांगडि । पोसितां जरि एक वोढि ।
तरि कां अपखडि । आणावी आंगां ॥ ज्ञा.१८-९३६
वोतारी [ अव+तप् १ संतापे ] (धातुकोश-ओत २ पहा
वोथंबा [ अव + स्तंभ् - अवष्टंभः ] (धातुकोश-वोथंब पहा)
वोपासीर [ उपाश्रय dependance upon, reliance upon = वोपाशिर ] thing on which dependance or reliance is placed.
उ०- ॐ पासीरयाचें बळ । घेउनी मिरवी कीळ ।
तैसें रत्न न्हेवे निखळ । चक्रवर्ति हा ॥
अमृतानुभव जुनी पोथी १३७
वोरबाडणे [ व्रश्च् ६ छेदने. वरीवृश्च्यते = वरबडणें = वोरबडणें = ओरबाडणें । ( धा. सा. श. )
वोल्हावणें [ ओलावणें पहा ]
वोशट, वोशेट [ वशिष्ट (वसा superlative) = वोशेट, वोशट ] full of greese हाताला वोशेट लागेल म्हणजे वसा, चर्बी लागेल.
वोह [ उधन = वोह (कास ) ]
वोहर [ वधूवर = वोहर ] (स. मं.)
बोहरा [ वधूवरक = वोहरा ] ,,
व्याजबीज [ व्यायव्यय: = व्याजबीज. आय = आज. विआय = व्याज. विशेषेण आयः = व्यायः व्यय = बीज ] (भा. इ. १८३४)
व्याही [ विवाही = विआही = व्याही ] (स. मं.)
व्हा जा [ करूं ये पहा]
व्हेरी Very [ परिशून्य very empty. परि = वरि = Very ]
स्थलनामव्युत्पत्तिकोश
धांदरणे - धनद (कुबेर ) - धनदारणं. खा म
धांदरी - धनद ( कुबेर ) - धनदपुरी. खा म
धादरें - धनद (कुबेर ) - धनदपुरं २ खा म
धानवाड - धाना - धानावाटकं. खा व
धानोरें - धाना - धानापुरं. ८ खा व
धामडोद - धर्म (व्यक्तिनाम ) - घर्मिष्टपद्रं. खा म
धामणगांव - धामनी. ३ खा व
धामणदर - धामनी. खा व
धामणें - धर्मवनं ( बौद्धधर्मावरून ). मा
धामोडी - धर्म (व्यक्तिनाम ) - धर्मवाटिका. खा म
धायटें - धाय्य (पुरोहित) - धाय्यवाटं. खा म
धार - धारा (नगर नाम ) - धारा. २ खा म
धारगांव - धारा (नगरनाम ) - धाराग्रामं. खा म
धारडें - धारा (नगरनाम ) - धारावाटं. खा म
धारागीर - धारा (नगरनाम) - धारागिरी. २ खा म
धालेवाडी - धालवाटिका (धाले, ढाले हें कुणब्यांत आडनांव आहे ). मा
धावडीघाट } - धातकी (धावडा ). खा व
धावडीपाडा }
धावडें - धातकीवाटं. खा व
धावें - धातकी ( धावडा) - धातकं. खा व
धीमघाट - धृतिमतां घाटः खा प
धीरसगांव - धीरवर्ष ( व्यक्तिनाम ) - धीरवर्षग्रामं. खा म
धुकी - धूक (वारा ) - धुकिका. खा नि
धुपी - धूप (सरल) धूपिका. खा व
धुपी - धूपिका. २ खा नि
धुपें - धूप (सरल) - धूपकं. खा व
धुपें - धूपकं. ३ खा नि
धुमावल - धूम - धूमावलि. २ खा नि
धुरखेड़ें - ध्रुव ( पक्षिविशेष ). ३ खा इ
धुवड - ध्रुव (पक्षिविशेष) ध्रुववाटं. खा इ
ध्रुवाणी - धूक ( वकुल ) -- धूकवनी. खा व
धुवाणी - धूप (सरल) - धूपकवनी. खा व
धुप - धुंक्षा (करढोंक ) - धुंक्षा. खा इ
धुपें - धुंक्षा (करढोंक ) - धुंक्षं. खा इ
धुळें - धूलि - धूलिकं. खा नि
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
वेल्हाळा [ वेल्लहला ] (वेल्हाळ ३ पहा)
वेल्हाळी [ वेल्लहला ] (वेल्हाळ १ पहा)
वेव्हाणी [ व्यवधानिः seperateness = वेव्हाणी ] भिन्नव्यवस्था, प्रविभाग.
उ०-तैसें प्रकृतिचां गुणीं । जेया कर्माची वेव्हाणी ।
केली आहे वर्णी । चौ हीं इहीं । ज्ञा. १८-८२४
वेसण [गेष् अन्विच्छायाम्. गेषण = गवेसण = गवसणें. गवेसण = वेसण (गचा लोप ) ] (ग्रंथमाला)
वेसवा १ [वेश्या = वेसवा ] cortezan.
-२ [ वेशः पण्यस्त्रिया मृतिः । तया यो जीवति स्त्री पुमान् वा स वेशवान् । (मनु-चतुर्थाध्याय-८४, कुल्लूक).
वेशवान् = वेसवा ] वेसवा म्हणजे कुंटीण किंवा कुंटण. (भा. इ. १८३४)
वेसवार [ वेशवारः ( मसाला ) = वेसवार ]
वेस्वा [ वेस्वा म्हणून जो अपशब्द मराठींत आहे त्याचें मूळ वेसा अव्वा = वेश्या अव्वा. अव्वा = स्त्री. ] ( सरस्वतीमंदिर शके १८२६)
वेसवार [वेसवारः =वेसवार (मसाला) ] धणे, सुंठ, मिरे इत्यादींचा मसाला.
वेहकळ [ वैकंकत ( वनस्पतिविशेष) = वेहकळ ]
वेळ [ वेला (अक्लिष्टमरणं ) = वेळ ] त्याची वेळ आली म्हणजे मरण आलें.
वेळणी [ विल् आच्छादणें. वेलनी = वेळण ] (भा. इ. १८३४)
वेळणें १ [ विल् १० क्षेपे = वेळणें ] पाय वेळतो म्हणजे इकडे तिकडे हलवतो. ( धा. सा. श. )
-२ [ वेल् हलवणें. वेलन = वेळण, वेळणें, वेळणी ] (भा. इ. १८३३)
वेळू [ वेणुः वेळू. ण = ळ ]
वैद्यमानी [ वैद्यंमन्यः = वैद्यमानी ]
वैरण [ पति + आभरण = वइरण, वैरण ] the petticoats given by the husband to the bride at a wedding
वैरणें [ (वि + ईर) वीरणं = वैरणें ] भात वैरणें म्हणजे भात भांड्यांत घालणें. (भा. इ. १८३४)
वैरागर [ वज्रागर = वइरागर = वैरागर ]
स्थलनामव्युत्पत्तिकोश
प्राकृत
रे धणि मत्तमअंगजगमिणि,
खंजनलोआणि, चंदमुहि, ।
चंचल जुव्वण जात ण आणहि;
छइल समप्पइ काँइ णहि ?
संस्कृत
रे प्रिये मतमर्तगजगामिनी,
खंजनलोचने, चंद्रमुखि, ।
चंचल यौवन जातं न जानासि;
विदग्धेभ्यः समर्पयसि कुतो न हि ? ॥
त्यांत धणी ह्या शब्दाचा अर्थ वारयोषित आहे. हाच धणी शब्द सातार्यांतील धणीचा बाग व
धणीची विहीर ह्यांच्या मालकिणीला लागलेला अद्यापहि ऐकूं येतो. (महाराष्ट्र इतिहास मासिक
श्रावण शके १८२६) धनकवडी - धनकर्वटिका = धनकवडी. कर्वटं, कर्वटिका नाम कुनगरं. (भा. इ. १८३६)
धनपुर - धनपुरं. खा नि
धनराट - धनकराष्ट्रं. खा नि
धनाजें - धनकपद्रं. २ खा नि
धनूर - धनपुरं. खा नि
धनेर - धनवेरं. २ खा नि
धनोरें - धनपुरं. खा नि
धनोली - धनपल्ली. खा नि
धमफा रांजण - धमक (लोहार) - धमकिकारंजनी. खा म
धमडाई - द्रमिट ( नागराज ) - द्रमिटावती. खा म
धमणार - धर्मण ( धामण सर्प) - धर्मणागार. खा इ
धमलाड - द्रमिट (नागराज)- द्रमिटवाटं. खा म
धमाणें - धर्मण ( धामण सर्प) - धर्मणवनं. २ खा इ
धमानी - धर्मण ( धामण सर्प ). खा इ
धरणगांव - धरण. खा नि
धाडणें - धातकी (धावडा) - धातकीवनं. खा व
धांडरी - धांधा. खा व
धांडलें - धांधा. २ खा व
धांडेरें - धांधा. खा व
स्थलनामव्युत्पत्तिकोश
दोणगांव - द्रोणीग्रामं. खा नि
दोणगांव - द्रोणग्रामं. खा म
दोंदगांव - } दुंदुभं (सर्प) खा इ
दोंदवाड - }
दोंदवाडा - }
दोंदवाडी - }
दोंदवाडें - दुंदुभं (सर्प ) - दुंदुभवाटं. ४ खा इ
दोदवें - दुंदुभं (सर्प) - दुंदुभवहं. खा इ
दोधें - दुग्धिका - दुग्धिकं. खा व
दौंडाईचें - ढुंढि (गणपति) - ढुंढ्यावतीयं. २ खा म
दौलतपुर - मुसलमानी गावें. २ खा
द्याणें - दध्यानी (सुदर्शना). २ खा व
द्रविडदेश - (कर्णाटक पहा).
ध
धज = ध्वज. खा नि
धडगांव - धटिन् (शिव ) धटिग्रामं. खा म
धंडाणें - दंडक ( अरण्यविशेष) - दंडकवनं. खा म
धणीचा बाग - सातारा शहरांत पहिल्या शाहू महाराजांच्या वेळेपासून छत्रपतींचे कांहीं बाग आहेत. पैकी एक बागाला धणीचा बाग म्हणतात व एका विहिरीला किंवा चिरेबंदी जलविहाराच्या जागेला धणीची विहीर म्हणतात. धणीचा बागा व धणीची विहीर म्हणजे कोणाचा बाग व कोणाची विहीर म्हणून कित्येक लहान मोठ्या माहीतगार लोकांस विचारतां समाधानकारक उत्तर मिळत नाहीं. कोणी म्हणत, धणी म्हणजे धनी अर्थात् छत्रपति. परंतु धनी शब्दांतील नी ची णी कशी झाली तें कोणी सांगेना. कोणी म्हणत धनीण या शब्दाचा अपभ्रंश धणी असावा. त्यांच्या मतें धनिणीचा बाण ह्याबद्दल धणीचा बाग असा जलद बोलण्यानें अपभ्रंश झाला असावा. ही व्युत्पात्ति खरी मानण्याला एक अडचण येई. ती अशी कीं, ह्या बागेंत शाहूच्या राण्या राहात नसून एक सुस्वरूप नाटकशाळा राहात असे. राण्या राहात असल्या तर धणी म्हणजे धनीण ऊर्फ राणी असा अर्थ करतां आला असता. तेव्हां धणी ह्या शब्दाचा दुसरा कांहींतरी अर्थ असला पाहिजे. धणी हे विशेषनामही नाही, अर्थात् धणी हा शब्द आधुनिक मराठी भाषेंतून बहुतेक लुप्त झालेला असला पाहिजे, व त्याचा पत्ता चारपांचशें किंवा नऊदहाशें वर्षांपाठीमागें काढीत गेलें पाहिजे. निर्णयसागर छापखान्यांत छापलेल्या प्राकृत पिंगलसूत्राच्या १४ व्या पृष्टावर खालील श्लोक आहे :-
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
वेडपा [ विधेयात्मा = वेडपा (वेड्या मनाचा ) ]
विधेयं = वेडें (सेवक, प्रवण )
वेडबंबः [ एडबंबः = वेडबंबः ] ( भा. इ. १८३४ )
वेडा १ [एड = एडक = एडआ = एडा =येडा -वेडा ] अकर्ण एडो बधिरः (हेमचंद्र) (ग्रंथमाला )
-२ [ वैधेय: ( foolish वैजयंती ) = वेडा ]
वेडामुका [ एडमूक: = वेडामुका ] (भा. इ. १८३४)
वेडावणें [ एल् ११. एलाय = वेडाव ] गाण्यानें माकड वेडावून गेलें म्हणजे चेष्टा करूं लागलें. (धा. सा. श.)
वेडें (आसक्त) [ विधेय = विडेअ = वेड डा-डी-डें ) ] भक्तजनानुरोधविधयानि तु भवंति देवतानां मनांसि । (बाण - हर्षचरित - चतुर्थोच्छ्वास - पृष्ठ १२३ - निर्णयसागरप्रत ). देवतांचीं मनें भक्तजनांवर वेडीं होतात. तो तिच्यावर वेडा झाला = स तद्विधेयो बभूव । (भा. इ. १८३५)
वेडें-डा-डी [वैधिक-की (dogmatic)=वेडें-डी-डा] वेडी समजूत = dogmatic, unreasonable idea.
वेणा [ वेदना = वेअणा = वेणा (प्रसूतीच्या ) ] ( भा. इ. १८३४)
वेणी [ वेणी = वेणी ] ( स. मं.)
वेणीफणी [ वेणीप्रवेणी = वेणीफणी. ( संस्कृतमहाराष्ट्री-अपभ्रंश ) ] (स. मं.)
वेत [ वी २ गर्भधारणे. वीति = वेत] वेत म्हणजे गर्भधारणा. ( धा. सा. श. )
वेताळ [ वितालं = वेताल, वेताळ. वैतालः = वेतालः = वेताळ ]
वेथा [ व्यथा = वेथा ] वेल [ वेल्लः (वेल् हलणें) =वेल. वेल्लि = वेल. ] (ज्ञा. अ. ९ पृ. ६७, ६९)
वेलबुटी १ [ वल्लिव्यूति. वि +वे १ तंतुसंताने ] ( धातुकोश-वेलबुट पहा )
-२ [ व्ये १ संवरणे. वल्लिव्यूति = वेलवुटी] व्यूति म्हणजे विणणें. ( धा. सा. श. )
वेल्हाळ १ [ वेल्लहल a libertine, a lover = वेल्हाळ ] a lover dear to a woman. वेल्लहला = वेल्हाळी a woman dear to her husband.
-२ [ वेह् गतौ : वेहालु = वेल्हाळ. वेह् to walk gracefully ] a woman who walks gracefully.
-३ [ वेल्लहला a sensual woman =वेल्हाळ, वेल्हाळा ] a young amorcus woman.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
वेखंड [वचाखंडं = वेखंड ]
वेगळा १ [ विकल: = वेगळा ]
-२ [ वैगल्य (विगलत्व) = वेग्गल = वेगळ = वेगळँ = वेगळें, ळा-ळी ] ( ग्रंथमाला)
वेगाढ [ वेगाढ्य = वेगाढ (ढा-ढी-ढें) (एकनाथ- रुक्मिणीस्वयंवर ) ]
वेंघ १ [ अंघ् १ गत्याक्षेपे. वेंघ] उ०-त्यानें पर्वत वेंघला ( धा. सा. श. )
-२ [ धातुकोश-वेंग २ पहा ] वेच [ व्ययः = वेच ] (वेचणें पहा)
वेचणें १ [ व्यय् १० वित्तसमुत्सर्गे. व्यय्= वेचणें.
व्ययः =वेच ] खर्चवेच (खर्च फारसी + वेच प्राकृत) द्रव्य वेचणें म्हणजे खर्चणें. ( धा. सा. श. )
-२ [ विज ३ पृथग्भावे = वेचणें ] तांदुळांतून खडे वेचणें म्ह० पृथक् करणें. ( धा. सा. श. )
वेचणें बेचणें [ वेचनं विवेचनं = वेचणें बेचणें ] (भा. इ. १८३४)
वेज [ वेधः = वेज ] वेज म्हणजे मोत्याचें भोंक.
वेझ [ व्यध् to pierce ]
वेटोळ्या [ पट्टोलिकाः = वट्टेळिआ = विटोळिआ =वेटोळ्या (सनदापत्रें) अ = ए] खांकेंत वेटोळ्या घेऊन कोर्टात जातो म्हणजे पट्टोलिका ऊर्फ सनदापत्रे घेऊन कोर्टात जातो.
वेड १ [ (पुं.) वेधः = वेड (न.)] त्याला दारूचें इतकें वेड लागलें = म्हणजे वेध लागला.
-२ [ मेट्, मेड् to be mad = वेड ]
-३ [ वैधेय (मूर्ख) =वेढे अ=वेढ=वेड (डा-डी-डें) ] येडझवा असा शब्द कवितेंत येतो. ( भा. इ. १८३५)
वेडगळ [ विधेयकल्पः = वेडकळ = वेडगळ ] किंचित् कमी वेडा तो वेडगळ. ईषदसमाप्तौ कल्पं ( ५-३-६७)
वेडझवा [ एडधव: (बहिरा नवरा) = एडझवा = वेडझवा ] (भा. इ. १८३४)
स्थलनामव्युत्पत्तिकोश
देऊळगांव - देव (राजाचें बहुमानदर्शक नांव). खा म
देगांव - देव (राजाचें बहुमानदर्शक नांव) - देवग्रामं. २ खा म
देडर - डिंडोर (समुदफेण) - दिंडीरकं. २. खा इ
देडरगांव - डिंडीर (समुद्रफेण) - दिंडरग्रामं. खा इ
देवगांव - देव (राजाचें बहुमानदर्शकनांव) - देवग्रामं. ५ खा म
देवघर - देवगृहं (राजाचें ठाणें ). मा
देवठाण - देव (राजाचें बहुमानदर्शक नांव) - देवस्थानं. खा म
देवधरपाडा - देव (राजाचें बहुमानदर्शक नांव). देवधरपाटकः खा म
देवपट - देव (राजाचें बहुमानदर्शक नांव) - देवपट्टं. खा म
देवपिंपरी - देव (राजाचें बहुमानदर्शक नांव). खा म
देवपुर - देव (राजाचें बहुमानदर्शक नांव) - देवपुरं २ खा म
देवभाणें - (देव राजाचें बहुमानदर्शक नांव) देवभांडं. खा म
देवराष्ट्रें- सं. प्रा. देवराष्ट्र. सातारा. (शि. ता.)
देवळ - देवल (पुजारी) - देवालिकं. खा म
देवळसगांव - देवलाक्ष (राक्षसनाम) - देवलाक्षग्रामं खा म
देवळी - देवल (पुजारी) - देवलिका. ३ खा म
देवळीपाडा - देवल (पुजारी). खा म
देवळें - देवल (पुजारी). खा म
देवळें - देवपल्लं, देवालयं, दैवलं (पूजा करणार्या देवलाचें गांव. देवलः म्हणजे पुजारी) मा
देव्हारी - देहिका (उधई-उद्देहिका) - देहिकागारिका. ४ खा इ
देव्हाळें - देहिका (उधई - उद्देहिका)- देहिकापल्लं. खा इ
देशमुखवाडी - देशमुख. खा म
देसराणे - देशराजन्यकं. खा म
देहेर - देहिका (उधई-उद्देज्ञिका) - देहिकावेरं. खा म
दोड़ी - } दोडि. खा व
दोडें - }
दोण - द्रोण. (डोण पहा)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
वीसदेओ - मानभावांच्या (लीलाचरित्र या नांवाच्या) ज्या ग्रंथाचा परिचय गेल्या सभेस सभासदांस झाला त्या ग्रंथांतील दहा पांच चरित्रांत वीसदेओ हा शब्द एकाहून जास्त वेळां आला आहे. असें एक चरित्र संकेत लिपींतून एथें उतरून घेतों :-
रात्रीं वीहीरणीं ओंवीया आरोगणें ॥
= करमणूक = खाणें
चक्रधरा रात्रीचाः पूजाअवसरुः (= वेळ) जालाः गंगे पैलाडी सेत तेथः आले: धनूवाटी ( = क्षेत्रनाम.) येकी चंद्रमा होता असे: ओंबीयां देखीलीयां: भटीः म्हटलें: ओंबीया घेओजी: चक्रधरः उगे ची: मागोतें: म्हटलें: जी जि ओबीयां जालीया असती तरि घेओं: उत्तर केलें जालीया नसती कीं गाः जीः जिः जालीया असतिः तरि घेयाः मग: भटोबास घेओं लागले: म्हटलें: चीरूनी घेयाः मगः भट चिरुनीं जालीया जालीया घेतिः चक्रधरः पूढारें मळेया वरी: आलें: श्रीकरीं गोफणं घेतली: थै भोरडीयें: थै भोरडीयेः म्हणोनिः सोंकरिलें:(=ओरडणें:) तवं चंद्रमा मालवलाः आणि चक्रधरः आलेः तवं वारा सूटलाः तें थोर वावधान (= वावटळ आलें: ) तेव्हळिः चक्रधरः मेरूचां ( = डोंगर ) कोहकिं: = (गुहा) आसन जालें: लुखदेओ बा येः चक्रधराः आड पसवडी (=पासोडी) धरीली: तवं भटोबा बोबाउं लागले: लुखदेया: लुखदेयाः लुखदेयाः सबदु दीघलां: नागदेया येः चक्रधर येथ असतिः भटोबास आले: तवं वावधान नावेक समलें: मगः म्हटलें: कां गां ओंबीयां बाजा नां कां: जी जि: वीसदओ नाहिं: म्हटलें: गुफे हुनी घेउनी या: हा घेया पैल दीवाः दीसतु असेः मगः भट गेलेः वीसदेओ घेउनी आले: तव भटां सरीसीं आउसें ( = विशेषनाम आलीः ) तवः चतुर्धराः मर्गज- (विशेषनाम) सी आसन जालें: तवं भट ओबीयां भाजुनी घेउनी आले: मगः चक्रधर: गुफे सी: आले: मग: जी: ओंबीयां चोखटा केलीयां: कोवळीया नीवडीलीया: आतु साखर घालौनी ओळगावीलीयाः (= घोळल्या) यरी (= इतरांस) वाटे वाटौनि दीधलीयाः चक्रधरः प्रसादु केलाः मगः आवघेयां भगतजनां देववीलीयीः चक्रधरें: आरोगीलीयाः गुळळ (= गरळ) जाला: वीडा ओळगवीलां: (= दिला) मगः पहुडु (= निद्रा) स्वीकरींलः ॥ ११ ॥
वरील चरित्रांत वीसदेओ हा शब्द दोनदां आला आहे. ओंब्या भाजण्याकरितां वीसदेवो पाहिजे होता. या शब्दाचा अर्थ वाचकांच्या ध्यानांत सहज आल्यावांचून राहणार नाहीं. वीसदेओ म्हणजे ज्याला सध्यां आपण वर्तमान मराठींत विस्तव म्हणतो, तो मूळ संस्कृत शब्द वैश्वदेव. भोजनापूर्वी विश्वे देवांकरितां ज्या अग्नींत आहूती टाकतात, त्याला वैश्वदेव म्हणतात. वैधदेव पेटला, वैश्वदेवांत आहूती टाकल्या, इत्यादि लौकिक उक्तींत वैश्वदेव म्हणजे अग्नि असा लौकिक अर्थ अद्याप हि प्रतीतीस येतो. ह्या वैश्वदेव शब्दाचे अपभ्रंश येणेंप्रमाणें होत आले-
वैश्वदेवः वीसदेओ
= वीसदो
= वीस्तो = विस्तू
= विस्तव
पैकीं विस्तो, विस्तू हा अपभ्रंश कांहीं लोक योजतात. कांहीं लोक विस्तव असा उच्चार करतात. वस्तुतः अशिष्टांचा विस्तू, विस्तो हा उच्चार मूळाच्या अधिक जवळ आहे. हें सांगणें नलगे. कित्येक वर्षी पूर्वी विष्णू या शब्दापासून विष्टु, विस्तु, अशा परंपरेनें विस्तव ही शब्द मीं व्युत्पादिला होता. परंतु त्याला ऐतिहासिक आधार कांहीं एक नव्हता. प्रस्तुतच्या व्युत्पत्तीला ज्या अर्थी ऐतिहासिक आधार सांपडला आहे त्या अर्थी वैश्वदेवः = वीसदेओ = विस्तो = विस्तव ही परंपरा मान्य करणें अपरिहार्य व सयुक्तिक आहे. (भा. इ. १८३७)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
विळखणें [ विलक्षणं = विळखणें ] मी त्याला विळखणें असा प्रयोग आढळतो. (भा. इ. १८३४)
विळखा ५ [(स्त्री) विश्लिक्षा = विळिखा = विळखा (पु.) (भा. इ. १८३४)
-२ [ विल् ६ संवरणे = विळखा ] विळखा म्हणजे वेष्टणें. ( धा. सा. श.)
विळखां [विल्]
विळा १ [ वि + लू to cut (लावः) = विळा ]
-२ [ लू ९ छेदने. वि + लवः = विळा
वि + लविः = विळी ] (धा. सा. श.)
-३ [ इली (शस्त्रविशेष ) = विळी, इळी, (पुल्लिंग) इळा, विळा ] (भा. इ. १८३६)
विळी १ [वि + लविः ] (विळा २ पहा)
-२ [ इली ] (विळा ३ पहा)
-३ [ (वि) लू. विलाविका = विळी]
वीट १ [ द्विष् २ अप्रीतौ. द्विट = वीट ] ( धा. सा. श. )
-२ [ इष् ९ भृशार्थे. इष्= वीट ] गोडाचा वाट आला म्हणजे अतिशय प्राप्त झाला. ( धा. सा. श.)
-३ [ विष् ९ विप्रयोगे. विष्टि = वीट ] त्या वस्तूवरून माझें मन विटलें म्हणजे त्या वस्तूची गरज मला भासत नाहींशी झाली. (धा. सा. श. )
वीत १ [ वितरित = वीत ] (स. मं.)
-२ [ वी २ प्रजने. वीतं = वीत ] वीत म्हणजे वेत, वीण. ( धा. सा. श. )
वीस [ विंशति ] (विंशति पहा)