लेखांक ३९०
१५४४ वैशाख
राजश्री कुमाजी पाटील अजहती विठोजी राजे भोसले मोकदम कसबे वावि पा।संगमनेर यासि भुज मेहतरी व सोन मेहतरीया व समस्त तेली कसबे मजकूर सु॥ इसने असरिन अलफ लेहौनु दिधले ऐसे जे बाउजी मोकदम कसबे मजकूर माजी होता तो धानबुडी आपणापासूनु घर घानियासी टके ३६ परमाने खात होता तरी त्याप्रमाने तुह्मी आपले घेणे खेरीज जिराती प्रजास नाही पेसजीचे आपणासी माफ करून सन सलासा कारणे घेणे हे लिहिले सही
नि॥ पाबार
गोही
बाब जिसधान गोपाळ वणजारा
मुजेरी
बालू जगधणी एमाजी घरबुडा मुजेरी
मुजेरी
मेउजी करानदेऊ अत पाटील साकरपेटी
आपाजी सेटिया