Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक २४२.

श्री.
१७०१ मार्गशीर्ष शुद्ध ३
पौ मार्गशीर्ष वद्य ३ रविवासर शके १७०१

पुा राजश्री बाळाजीपंत नाना स्वामीचे सेवेसीः-

विनंती उपरी. तुह्मी केलेलीं कलमें लिहिलीं त्यांची उत्तरें येणें प्रमाणेः-

सरकारकामाचे बोलणे चालणें                                       हुंडीयाच्या पेटा पाठवणे म्हणुन
च्यार रुपये उणे अधिक नाईकांनी                                 लिा त्यास जाबि हंडिया नाहींत...
बोलून करारांत आणिलें आहे, म्ह-                                 पा आहेत. पाअसतील. कुशल देजून
लिहिले. उत्तम आहे. कलम १                                       वेश्वर यांचे हुंडीची दिक्कत होती.
राजश्री संभाजीबाबा यांणी व                                        म्हणून पेठ पाठविली आहे. ऐवज
धन:शाम नारायण याने प्रयत्न मात्र                                पावेल. चिंता नाहीं. कलम १.
केला, सरकारांत पत्रे गोविंद जोशी                               ऐवजाविशीं ताकीद असावी. त्या-
यांजबराबर पा, परंतु सरकारांत जा-                             स, ताकीद तो आहेच. गडबडीस
वसाल न जालो, म्हणोन लिहिलें तें                                विलाज काय करावा! कलम १.
कळलें, कलम १.                                                     सुरतठाविशीं तील खबरदारी असा
श्रीमंत राजश्री नानाफडनीस यां-                                  वी. त्यास, तेथील बंदोबस्त आहे.
चें हारण व नाईकाचा खलबत्ता ह.                               त्याविशीं चिंता नाहीं. कलम १.
रीपंत जठार यांजसमागमें पाठविला                             बाळ ठाकूर याचे यजमानाचें स
आहे तो पावलाच असेल, उत्तर पा-                              मक्ष बोलणें जालें आहे. त्यांत कांहीं
ठवावे. कलम १                                                       अंतर नाहीं. पक्केपणच आहे. कलम १
अकारयाजविशीं परभारें कांहीं                                    गोपाळराव रामचंद्र यांचा मजकूलिा,
तरी तुझावर चालून ल्याहावे, र                                    त्यास त्याचे चुलते आम्हांपाशी ब-
तरी जें लिहिणें तें तुह्मावरी घालून,                                हूत आग्रह करून पत्र तुम्हावर घेऊलेहूं.
कलम १.                                                                न गेले आहेत की, हे तुमचे मिळ-
सतरा गांवचा मजकूर व गल्हे                                     र्णीत मिळाले. असे असल्यास लेहन
मरोळी, त्यास तूर्त गडबड माजली                               पा उपरांत येथून लिहिणे ते लिहूं, आहे.
तूर्त काय समजावे. पुढे निवळ                                    म्हणून पत्र दिल्हें आहे. तुमच यु-
जाहलियावर तुमचे व नाईकाचे वि.                              क्तीस पडेल ते करावें. कलम १.
चारें ठरेल तें केले जाईल. कलम १.                              सरकारांतून बंदोबस्त कागदपत्रा
निंबाळकर सोयरे याजकडील ले-                                चा वगैरे काय करून द्यावा म्हणून
ग्नाचा मजकूर लिया. त्यास त्यांचहि                               लिा. त्यास, सर्व तुमचे ध्यानांत
पत्रें परभारें येथें आलीं आहेत. तूर्त                               आहे. कनिष्टाचा बंदोबस्त व गृहस्थां
दंगा ! कांहीं सुचत नाही. याचा नि-                              चा यथास्थित रीतीने व गंगातीरीं
श्रय मागाहून करून पाठवितो. त्या-                             एक गांव निर्वेध चांगला बहुत दि.
प्राकरावें. कलम १.                                                  वस चाले असा करून घेणें, वरकड
नारायणराव गोविंद वगैरे शिले-                                  समक्ष सांगितलें आहे, व याद दि
दार यांचा मजकूर लिा, त्यास तुह्मी                              ल्ही आहे, त्याप्रो करावे. इंग्रजाकडे
इकडे यावयाचे सुमार होईल तेव्हां                              माहाल गेले आहेत त्याचा प्रेत्न क
येथून लेहून पाठऊं, त्याप्रा करावें.                               रून घ्यावा. कलम १.
कलम १.                                                               नवापूर द्यावे असे वचन राजश्री
तिगस्तां मोहाल इंग्रेजाचेकडे आ-                                हरी तात्याचे आहे, व यादहि करा
पले गेले आहेत त्याचे मोबदला पंच-                             वयाची आहे. पुण्यास स्वारी गेलिया
महाल वगैरे सरकारांतून देत होते.                              वरी सनदा करून द्याव्या असा करार
त्यास ऐवज थोडा म्हणून न घेतले.                               आहे. तुम्हास वाकफच आहे.
करात्याचा प्रेत्न करून पाहणे. कलम १                         राची याद तुह्मी जातांना तुह्माजवळ
राजश्री नानाफडणीस यांचे पत्र                                   दिलीच असेल. नसली तरी पाठऊन
आलें होते त्याची नक्कल तुह्मास पा-                           देऊ. करारांत आणावें. कलम १.
हुपयास पा आहे. पत्रांत मजकूर
कीं, मसलतीचे काम आहे, तुम्हांकडील
मातबर माणूस पाठऊन द्यावा,
त्यांसीं बोलू. याप्रमाणे पत्र यजमानाचें
नांवें आले होते. त्याचे उत्तर येथून
लेहुन दिल्हें कीं, आझांकडोल
नाईक पहिले पासोन बोलतात. तेच
बोलतील. त्याप्रो लेहून दिल्हे आहे.
तुम्हांस कळावे. कलम १.
येणें प्रमाणें लिहिलें आहे. यांत नाईकांचे विचारें येईल तैसें करावें. मिति मार्गशीर शुध ३. बहुत काय लिहिणें १ कृपा किजे. हे विनंति.

                                                                                लेखांक ३९४

                                                                                                                                                    १५४४ माघ वद्य ३०

                                                                                                                 68 2

अज रखतखाने राजश्री संभाजी राजे साहेबू दामदौलतहू बजानेबू कारकुनानी देहाये परगणे पांडियापेडगौ व तरफ करडे बिदानद सु॥ सलाम इसरीन अलफ बो। मुदगलभट बिन कृष्णभट सो। पुणे हुजूर एउनु मालूम केले जे आपणास इनाम बदल धर्मादाऊ जमीन चावर एक गज सरायनी १68 दर सवाद मौजे बेलवडी ता। मजकूर पेसजी खुर्द खत सादर आहे जे जमीन मेजून हद्द महदूद घालनु देणे यावरी आपण माहालास गेलो माहालाचे कारकुनास साहेबाचे खुर्द खत दाखविले यावरी कारकून जमीन मेजून प्रज बाबाजी मुलाणा मुजेर मौजे मजकूर प्रज नेमून दिधला आहे ए बाबे कारकुनी आपणापासी अर्जदास लेहौनु दिधला आहे तरी स्वामी धर्मपरायण आहेती ऐणेप्रमाणे खुर्द खत दिधले पाहिजे दरी बाब सरंजाम होय मालूम जाहाले तरी भटगोसावियास इनाम बदल धर्मादाऊ जमीन चावर एक १68 गज सरानी यास प्रज बा। अर्जदास्त छ ४ माहे रबिलाखर बाबाजी मुलाणा मुजेरी मौजे मजकूर नेमून दिधला असे दुमाले कीजे अवलाद अफलाद चालवीत जाइजे सदर हर साल ताजे खुर्द खताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेऊनु असेली इनामदार मजकुरापासी फिराउनु दीजे तकरार फिर्यादी एऊ न दीजे मोर्तब सूद

रुजू सुरनीस

तेरीख २८ माहे रबिलाखरू
रबिलाखर

पत्रांक २४१

श्री.
१७०१ आश्विन वद्य अखेर.

पुा श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक स्वामींचे सेवेसीं:-

विनंती. आपण आश्वीन शुद्ध १४ चें पत्र पाठविलें तें पावोन परम संतोष जाहला. पत्रीं मजकूर कीं, तुह्मी येजमान बहुत सावध असावें ! इ. कडील काळजी न करावी. काळूबराबर पत्रें पाठविलीं आहेत तीं समक्ष द्यावीं. व राजश्री बाळोबानाना बहुत उपयोगीं पडले. पाहिले पासोन यजमानाचे पदरीं. यांचें यजमानांनी चालवावें. कैलासवासीयांनीं गांव दिल्हे आहेत ते चालविले पाहिजेत. व ऐवज जलदीनें पाठवावा म्हणून तपासिलें लिा त्यास, यजमानापाशीं निष्ठेनेंच वागत असों. दुसरा विचार नाहीं, दरबारची काळजी आह्मीं कशास्तव करावी ? आपण प्रसंगीं. त्याअर्थी आम्ही बेफिकर असों. ऐवजाचा मजकूर तरी तरतूद करीत आहों. इकडे राजाराम गोविंद यांची गडबड व दुसरी चंद्रराव पवार यांची जाहली. यामुळें सावकार धीर पुरून काम होत नव्हतें. आतां तरतूद लवकरच करित असों. राजश्री बाळोबानाना बहुत उपयोगी पडले. त्यास यांतील काय भाव आहे तो समजलियांत येत नाहीं. तरी सविस्तर लिहिलें पाहिजे. म्हणजे समजण्यांत येईल. बहुत काय लिहिणें? कृपालोभ करावा हे विज्ञप्ति.

पत्रांक २४०

श्रीसांब
१७०१ कार्तिक वद्य ५

पौ कार्तिक वद्य ७ मंगळवार व्यार घटका रात्र.

सेवेसी सां नमस्कार विनंती उपरी. आपण पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला मजकूर सविस्तर कळला. येथील मजकूर आपल्या गृहस्थाची व मुख्याची भेट जाहली. त्यांतील मजकूर पत्रीं लिहितां येत नाहीं. परंतु तिकडील पक्ष मुख्यांनीं भारी धरिला आहे. नकारनामकांचा मजकूर मुक्ततेचा. त्यांत मजकूर की, आम्हांकडे जाबसाल नाहीं. शिलेदारांची पैक्याची निशा करून त्यांणीं सुखरूप जावे व शिलेदारांचा मजकूर तर मनस्वी आहे. तीन लक्ष शाईशिरतेप्रों त्यांणीं बाकी काढिली आहे. त्याही मधें ते मजकूर बोलतात कीं, बक्षीचे हिशेबानें शाईशिरस्तेप्रों देणें निघेल तो ऐवज देणें. त्यांतही पांच रुपये कमी दिल्यास घेऊं, त्याचाही मजकूर, आपल्या गृहस्थास दरम्याने घालून जाबसाल परभारें केले आहेत. येथल्या मुख्यांशीं व तेथील कारभात्याशी कांहीं पेंचही आहेत. त्याचे जाबसाल होतील तेसमईंही शिलेदारांचा पैका दिल्याविना मुक्तता होत नाही. व ते गृहस्थ हातीं लागणें हे गोष्ट तों घडत नाहीं. दोहों चोहों दिवसांमध्ये मागती मुख्याशीं गांठ घालून त्याची ममता आपल्या यजमानावर व याची मुक्तता होय ऐसें करितों. परंतु पैका बहुत पडेल. मागाहून होईल वर्तमान तें लेहून पाठऊं. आपल्या गृहस्थांनी चिठी लिहिली आहे. ती अलाहिदा पाठविली आहे. ती पावेल, वाचून त्यासही उत्तर ल्याहावें. रवाना मिती कार्तिक वा ५. सायंकाळ, चार घटका दिवस. बहुत काय लिहिणे? कृपा लोभ असों द्यावा. हे विनंती. पत्र पाठवाल तें रा देवराव हिंगणे यांचे राहुटीस पाठऊन द्यावें. जो माणूस पाठवाल त्यासही स्थळ हिंगण्याची राहुटी सांगावी. हे विनंती.

रा दादास व दिवाणजीस सां नमस्कार. लिहितार्थ परिसिजे. उत्तर तपशीलवार लिहिणें, लोभ कीजे. हे विनंति.

पत्रांक. २३९

श्रीसांव.
१७०१ कार्तिक शुद्ध १ नंतर.
पौ कार्तिक वद्य ४ शनवार रात्रौ.

शेवेसी सां नमस्कार विनंती उपरी. आपली आज्ञा घेऊन स्वार जहालों, ते सोमवारीं दोन प्रहरां लष्करांत सुखरूप पावलों. त्या ग्रहस्थाची रात्रीस भेट जाहली. राजश्री चिमणाजी पंत येथें नव्हते. प्रतिपदेस आले. त्यांची आमची भेट होऊन मजकूर ध्यानास आला. या मजकुरांत कांहीं जीव नाहीं. मनस्वी जाबसाल. तुम्हांस पूर्वी लिहिला होता. त्या प्रों आहे. आपल्या ग्रहस्थाची व मुख्याची भेट जाहली. कार्याचा खुलासा समजला. त्याचा तपसील तेथील पत्रें आलीं होतीं त्यांजवरून शिलेदाराचे हवाला गृहस्थ केले, तुम्हीं जाणा, व हे जाणा ऐसे लौकिकांत जहाले, आंतून जावसाल, तुम्हीं आपला पैका घेणें, कोणाचें भय न धरणें, ऐसा खुलासा समजल्यानंतर आपल्या गृहस्थाकडून शिलेदाराकडे जाबसाल लावला आहे. त्याजवरून रा नकारनामकास उपद्रव बहुत जाहला होता तो शम करविला आहे. शिलेदाराचे मते, आमचा पैका द्यावा. त्यास, आम्हीं उत्तर केलें की शाई शिरस्तप्रों पैका देउं. ऐसें बोलल्यानंतर, त्यांतहि सोय पडत नाहीं. त्याचे हजार राऊत दुसाला चाकरी आणि पावती चाळीस हजार रुपये बहात्तर हजारांच्या चिठ्या सावकारावरे आहेत. त्याही बजिन्नस चिठ्या त्याजपाशी आहेत. चिठ्या पो कांहीं रुपाया पावला आहे. त्याचा कारकून रा नारोपंत नांदुरकर चिमणाजीपंताचे विद्यमानें आम्हांस भेटले. येथील प्रकार ऐसा आहे. मुख्याकडील जाबसाल तर परिछिन्न शिलेदाराचें नांव घेत नाहीं. तुह्मी जाणत व शिलेदार जाणत, ऐसें स्पष्ट उत्तर जाहलें, मुख्याचा जाबसाल शोध करतां गांवचे गांव सुरक्षित चालवावे व मुख्याचा व दरबार खर्च सव्वालक्ष पर्यंत पडतील, आणि गृहस्थाची मुक्तता होईल. परंतु शिलेदाराचा जाबसाल राहतो, जहालें वर्तमान सेवेसीं लिहिलें आहे. शिलेदाराचा जाबसाल हिशेब देणें. शाईशिरस्तेप्रों पुढें वर्तणूक करूं, आह्यांस ज्या गृहस्थाकडे पाठविला त्याचा मनसबा की, शिलेदाराची तोड पाडावी. हें खरें. यास कारण मुख्याचा जाबसालाचा विश्वास पटत नाहीं. याला कारण बकारनामक याजकडे अकार नामकाचे ग्रहस्थांनीं पक्का जाबसाल केला आहे कीं नारोबाची सुटका न होय ऐसें पक्केपणें कित्तेक जाबसाल त्यांनी पक्के करून घेतले आहेत. या अर्थी मुख्याचा जाबसालाचा भरंवसा नाहीं. सविस्तर अर्थ ध्यानास आणून उत्तर लिहावें, व रावसाहेब भास्करपंतांस खर्चाविशीं त्यांनी चिठी लिहिली आहे, त्याप्रों त्यांची बेगमी करावी. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असों द्यावा. हे विनंती.

पत्रांक. २३८

श्री.
१७०१ आश्विन वद्य १४

श्रीमंत राजश्री बाळाजीनाईकनाना स्वामीचे सेवेसीं:-

सेवक गोविंद गोपाळ सा नमस्कार विनंति येथील कुशल ता अश्विन वद्य १४ मुा लष्कर व्यासेश्वर नजीक जाणून यथास्थित असे. विशेष. बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. आज पंधरा रोज. त्यास वरचेवर पत्र पाठऊन परामर्ष करीत जावें. यानंतर आपण मल्हारजी फडके यांजबर पत्र पाठविलें तें पावलें. पत्र आज्ञा कीं, त्याचा हिशेब पाहून पुन्हां यांसच पाटऊन देणें. तेथील कामाचे हेच उपयोगी ह्मणोन आज्ञा. त्याज वरून त्यांचा हिशेबाचा मागील फडशा करून, पुढील बंदोबस्त यांजकडे सांगोन पा आहे. तरी तेथील सर्व बंदोबस्त करून द्यावयाचा तो आपण करून द्यावा. वरकड इकडील मजकुर पेशजी कासीदा समागमें लिहिला आहे. व रा बाळ ठाकूर जाऊन पोंहचलेच असतील. त्यांचे जबानीवरून ध्यानास येईल. सारांश यंदाचें वर्ष कठिण आलें आहे. यांत ईश्वर अबरू राखील तर व आपली कृपा पूर्ण, नाहीं तर कळतच आहे. तूर्त येथील प्रसंग बहुत विलक्षण. यांत करतांही न करतांही दोष. चहूंकडून संकट. असो. जे काळीं जें घडावयाचे तें तों ईश्वरसतेनें घडतें. परंतु निमित्य मात्र येते. असो. आपणास कोणते समईं कोणी आह्मांविशीं विकल्पाची गोष्ट भासवील ते मात्र आपण ध्यानांत न आणावी. आह्मीं येथें ते आपणच आहां ऐसें समजोन, जें काम मसलत लहान मोठी करणें ते करावी. येविशींची खातरजमा शेवटपावेतों एकत्र रीतीची असों द्यावी. आमची निष्ठा चित्तापासून हेच आहे. यांत, अंतर कधींच पडावयाचें नाहीं. याजवर श्रीसत्ता ! परंतु निश्चय तों याप्रमाणें आहे. येथील सविस्तर मल्हार फडके जबानीं सांगतां कळों येईल. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ करावा हे विज्ञप्ति.

पत्रांक. २३७

पौ मित्ती कार्तिक शुद्ध १५ मंगळवार.
श्री. १७०१ आश्विन वद्य १३

राजश्री बाळाजी नाईक नाना गोसावी यांसी:-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राज्यमान्ये स्ने। फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहाद्दर दंडवत विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत गेलें पाहिजे, विशेष. इकडील सविस्तर वर्तमान पेशजीं एक दोन पत्रें पाठविलीं, त्यांजवरूनं कळेल. प्रस्तुत सुरतेकडील वगैरे कित्तेक मजकूर राजश्री गोविंद गोपाळ यांचे पत्रीं लिहिला आहे, त्याजवरोन ध्यानास येईल. वरकड मागाहून साद्यंत लिहून पाठऊं, रा छ २६ माहे सवाल. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंती. मोर्तबसुद. ( शिक्का मागें दिल्याप्रमाणें ).

पत्रांक २३६.

श्री.
सदरहू प्रमाणें हरीपंत यांचे नावें पत्र पाठविले त्याचीं नक्कल.

अजम नबाब हदैरअल्लीखां बाहादूर सलमहुताला साहेब मेहेरबान करम फर्माय मुखलिसान बाद इस्तियाक मुलाकात जाणून बहज्यत समाद मशहद जमीर इत्तीहाहत नवीरबाद येथील खैर सल्ला जाणून साहेबीं आपली खैर खुषी कलमीं करीत असिलें पाहिजे. दिगर, आं मेहेरबांकडून छ मोहरमचें खत आलें ते नेक वख्तीं पोंहचून खुषी व खुरमी जाली. नरसिंगराव वकील व येकलाह दस्तगाह कृष्णराव नारायण व सिंदे यांजकडील त्रिंबकराव व राव रास्ते यांजकडील गोविंदराव व गणपतराव पोहचून मुफसल मजमून मालूम जाला. श्रीमंतांकडील करारनामा व आपलें निभावणीचें खत मशारनिले यांनीं दाखविलें. त्यांत एक दोन कलमांची तकरार होती. सबब श्रीमंतांकडील पाठवण्याचा करारनामा व निभावणीचे पत्राचे मसविदे मशारनिले यांजपाशी दिल्हे. त्याप्रमाणें करारनामा व खतें येऊन पोंचतांच सावकाराकडे पैसे पोंचवीत असों. आणि इंग्रजाकडील मोहिमेस कूच करून जात असों. आज दोन सालांपासून चेनापटणकरांचा दोस्ती करण्याचा इरादा. एक पालखी व दाहा जवानांनसीं येण्यास अर्जू. लेकीन, जात मकरी. त्यांची चाल खुषकींत न व्हावी. सबव श्रीमंतांसीं सलुख केला. आम्ही चेनापटणाकडे गुंतल्यावर इंग्रज साष्टी जंबुसर वगैरे मकाने घेऊन मुद्देमाफक कबूल करतील. त्यास इ. कडलि मसलत व इतक्याखेरीज सलूख न करावा म्हणोन आंसाहेबीं कलमीं केलें, चुनाचे आंमेहरवांकडील नरसिंगराब वकील श्रीमंत खुदावंत न्यायत यांचे हुजूर असतां सलुखाचा सवाल जबाव करू लागले. ते वख्तीं सरकारांतून करार करण्याचे कलमांची याद लेहून दिल्ही कीं, हे पटनास नवाबबहादूर यांजकडे पाठवावी. त्यावरून मशारनिले यांनीं याद रवाना केली. त्या पैकीं आंसाहेबीं बंगल्यास फौज पाठवण्याचे वगैरे एक दोन कलमें बाद घालून आपणाकडून दुसरीं बाद कबूल करून पाठविली. त्या यादीबरहुकूम करारनामा सरकारांतून ठरविला. एक आदवानी वगैरेस इजा न द्यावी इतकें कलम जास्त. वरकड आंसाहेबीं कबूल केल्या बमोजिब कलमें असतां, हालीं दुसरा मसावदा ठरावून पाठविंला, यांत व त्यांत तफावत भारीच आहे. तेव्हां कराशिवाय नवी गोष्ट जाली. सरकारचे वचनाची कायमी कशी हें आइंदे जहुरांत येईल. एकवख्ती सलूख व सफाई जाली, त्याबरहुकूम निभावणींत यावें हे सरकारची खेश आहे. आणि ज्या दौलतींत आहादशर्त व वचनाची मजबुती तेच दौलत कायम व खजानाही तोच जाणावा. दौलत आहे तेथें आमदही आहे व खिसाराही आहे. लेकीन, करारांत अंतर इकडून येणार नाहीं. श्रीमंत खुदावंत न्यामत व नबाब बहादुर यांची दोस्ती व पक्का सलूख जाहला. याचा लौकिक बहुत जाला. त्यांत झुंजकामावर नजर राखणें हें। खानदानास व उमदेपणास लाजम नाहीं, ऐसें मदारुलमाहाम यांणी दिलांत आणोन आंमेहेरबांनीं मसविदे पाठविले. त्याबरहुकूम करारनामा व निभावणीचीं खतें पाठविलीं आहेत. राव मेहेरबां महादजीराव शिंदे फौजेसह गुजराथ प्रांतीं दरकुच गेलें. त्याजकडून निभावणीचे खत येणें. सबब मसविदा मुजरत त्यांजकडे रवाना केला. जलदच येईल. बाद आंसाहेबांकडे रवाना होईल, अवलचे करारास व हाल्लींचे करारास तफावत बहुत आहे. सरकारांतही पांच साहा सालांचा खिसारा. आपली दोस्ती व भाईचारा जाला. तेव्हां इकडील खिसारीयाची फिकीर आंसाहेबांस आहेच. ऐसें मदारुलमाहाम याणीं दिलांत आणोन तफावतीचे कलमांचा येख्त्यार आंसाहेबांवर व्हा, आपण लाजम तेच करतील. कराराप्रमाणे पैक्याचा भरणा आसाहेब करतीलच. सरकारांत खिसारा, मसलत भारी, सबब आपल्याशी कांहीं बोलयाविश रावमेहेरवान कृष्णराव यांस कलमी केले आहे. त्या बमोजीब अमनांत यावें. आजीबात चेनापट्टणाकडे जाण्यास दिवसगत न लागावी. अरसा तहत कमी राहिला. इंग्रजांची जात बेइमान. दक्षणचा दाइया ठेऊन न होण्याचे मनसबे बांधितात. व खूब मकरही जाणितात. आंसाहेबांकडे पटणास येण्याचें राज्यकारण तसेंच कर्नेल गाडर सुरतकर यांची पुणियास येण्याची आर्जु. लेकीन, त्यांचे चालीचा नक्ष पक्का समजोन साफ जाब मदारुल माहाम यांणीं दिल्हा. साष्टी जंबूसर वगैरे देऊन बजीदी केल्यास सरकारांतून इंग्रजांचा अर्ज ऐकणें, हें होवायाचें नाहीं. येविशीं खातरजमा असावी. आंसाहेबही खूब त्यांचे मकरास वाकफ. राज्यकारण न ऐकतां कायमीनें तंवीच अमलांत यावी. जें होणें तें तर फैनच्या इतल्यानें व सलाहतदबिरीनें व्हावें. एकासी गोड बोलून, एकास जक द्यावी, फोडाफोड करावी, हे हुन्नर टोपीकर बहुत जाणतात. या भुलथापीवर न जावें. बाजे मरातव राव मेहेरबान कृष्णराव यांस कलमीं केलें त्यावरून वाजे होईल. हामेश खत पाठवून दोस्तदार यांची खुषी करीत जावी.

पत्रांक २३५

श्री.
१७०१ आश्विन वद्य १०

कृष्णराव बल्लाळ यांचे नांवें हैदरखानास पत्र छ २३ शवाल अलकाब सदरहू-प्रमाणेंच-सुा समानीन, आश्वीन, कागद बुट्टीदार.

अजम नबाब हैदरअल्लीखान-बहादूर सलमतुताला साहेब मेहेरबान करम फर्माय मुखलिसान बाद इस्तियाक मुलाकात बहउयत समात मुकषुफा जमीर इतिहादत नवीरबाद येथील खैर सला जाणून खैर आपली खैर खुषी कलमी करून दिलताजगी करीत असिलें पाहिजे. खुदावंत-न्यामत रावसाहेब पंडित प्रधान यांचा व आंमोहिबांचा सलूख पक्का व मजबूत होऊन करारनामा अहदर्शतीनसीं जाला तो सरकारचे मातबर-षाहामत व अवालीपन्हां कृष्णराव नारायण व नरसिंगराव वकील मोहिंबाकडील यांजबराबर देऊन रवाना केले असेत. मारनिले नुमा-ज्यलद् व षिताव आं-मोहिंवाकडे पोंहचतील. बिल-फैल अजरुये अखबार जाहीर जालें कीं, मोहिंवाकडील फौज आदवानी व मुदगल वगैरे नबाब निजाम-अल्ली-खान-बहादूर यांचे तालुक्यांत येऊन, हरकत पेष आणून, तमाम प्रांत वैराण केले. मकानास मोहसिरा करणार. एैशास, व लिन्यामत रावसाहेब पंडित-प्रधान यांचा व नवाव निजाम अल्ली-खान बहादूर यांचा तरीका एकलासीचा कदीमापासोन चालत आला. हरबाबें त्यासी ज्युदागी नाहीं. हालीं मोहिबांचाही सलूख होऊन दोस्तीची मजबूती जाली. तेव्हां तिन्ही दौलती एक व बेहबुदी व मसलत एक जुदाई राहिली नाहीं. इंग्रजांस तंबी पोंचवण्याची मसलत मातबर, सर्वांचे एकदिलीनें मुखालिफांची तंबी व्हावी. दरम्यान असे सिगुफेमुळें मोठे मसलतींत कमती येते. आपआपल्यांत पेच येतात. हे सलाह दौलत नाहीं. बिनाबारा आपले फौजेस ताकीद करून वापस आणवावी. नबाब मवसूफ यांचे तालुकियास इंग्रज येऊन मकानांत आपला कबजा करणार, तेव्हां मोठे मसलतीस पायबंद बसेल. सवव अव्वल हा बंदोबस्त करावा, हें मोहिबांचे दिलांत आलें असेल, त्यास, येविसीचे कुलमरात-व नबाब-मवसूफ यांस कलमी केलें अतोन, त्याचा तेविसींचा बंदोबस्त जलदच करतील. इंग्रजांचे तंबीचे मसलतीस नबाब-मवसूफ एक-दिल आहेत. शिकाकोल-राजबंदरीकडे चालून जाण्यास लवकरच खेमेदाखल होणार. मोहिवांनी आदवानींकडील हंगामा जलद मना करवावा. सर्व मसलती व दूरंदेशी आपले दिल निषीन आहेतच, मुसफल बयान नरसिंगराव पोंचल्यानंतर करतील, त्याजवरून मालूम होईल. *

पत्रांक २३४

१७०१ आश्विन.
मुबईकर इंग्रजास पत्र रा छ.

इजहार आंकी मुदत मुदत आं शहामतपन्हांकडील किताबत येऊन दिलखुषी होत नाहीं, तर हमेषा मोहबतनामा इबलाग करोन मसरूर करीत जावें. दिगर सरकारांतून वकील लाला सेवकराम याजला कलकत्यास रवाना केलें. व सरकारचे मदारुलमहाम यांनी खतृत गरसूल केलें. त्याचा दरजबाब कोसल कलान कलकत्तेकर यांनी निगारप केला. त्या खात्यांतील फिकरा पारसी व त्याचा तरजमा हिंदवी करून पाठविला आहे त्याजवरोन मुफसल मुषहुद होईल. व कोसल कलान कलकत्तेकर यांनी कलमी केलें आहे कीं, या बमेजिव खत अशामतपन्हांस व तेथील कोसलदारांम कलकत्त्याहून पर भारें मुंबईस इरसाल केलें आहे. येकीन कीं तें खत रसीद होऊन मतलब जाहीर झाला असेल. त्यास कविले माही दादा साहेबाबाबें व चिखली वगैरे रो फत्तेसिंगराव गायकवाड यांचे मुलखाबाबद मजकूर मरकूम केला आहे. त्याचा दर जबाब इजानेवास लिहून पाठवावा. व चिखली वगैरे मुलुख मये वसूल दुसाला सरकारचे अमलदारांचे सुपूर्द करावा. वे बमोजिम करारनामा तीन लाखांचा मुलुख आशामतपन्हां ज्यांस देवितील त्यांचे सुपूर्द सरकारांतून करविलें जाईल, दिगर मनाफ करारनामा बारा लाखांचे वसुलांत पो जंबूसरचा ऐवज देविला आहे. त्यास परगणे मजकूरची ऐवज वसूल करोन आंशाहामतपन्हांकडील लोकांचे पदरीं घालावा ह्मणोन सरकारांतून रा महादजी रामचंद्र यांजला पाठविलें आहे. मशारनिलेरा जाऊन कमकसर एक साल गुजरलें, हानोज आंशाहामतपन्हांकडील अमलदार पो मजकुरांत दाखल देत नाहीं. तर येबाबें आंशाहामतपन्हांनी आपलेकडील लोकांस निगारष करावें कीं, सरकारचा का महादजी रामचंद्र पो मजकूरचा वसूल करोन ऐवज पदरीं घालीत जाईल, त्यांची कबजें देत जाणें. याहून पेशजीं साल गुदस्तां व सालहालचा पो मजकूरचा वसून घेतला असेल त्याची रसीद देणें, म्हणोन निगारष करावें. जो करार ठरला आहे त्यास सरकारांतून तफावत होत नाहीं व आंशाहामतपन्हांकडून तफावत अमलांत न यावा.