पत्रांक २०७.
श्री.
१७०१ अधिक श्रावण वद्य ३
राजश्री वेंकटपती तिमया नायडू संस्थानक गोंदी गोसावी यांसीः-
अखंडीतलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माधवराव नारायण प्रघान आशीर्वाद. सुा समानीन मया व अलफ. राजश्री बाजी गोविंद यांचें कर्ज सुभाणा गिरमाजी व पांडुरंग गिरमाजी हरकारे यांजकडे त्रिंबकराव विश्वनाथ यांचे विद्यमानचे स्वारीचें येणें आहे. त्यास, सने अर्बासबैनांत सुभाणा गिरमाजी यास आणिलें. तें समईं त्यांणीं करार केला कीं महिन्याभरानें अर्कोटहून हंर्ड करून ऐवज पाठवितों. असें असतां अद्याप हुंडी आली नाहीं व जाबसाल देखील पाठविला नाहीं, ह्मणोन हुजूर विदित जालें. ऐशियास, येविशीचें काम रा बनाजी गोविंद कारकून यांस सांगोन पाठविलें आहे. तरी, तुह्मीं सुभाणा गिरमाजी व पांडुरंग गिरमाजी यांस बरे वजेनें ताकीद करून, मार, निल्हेचा वाजबी खताप्रमाणें व्याजसुद्धां हिशेब होईल तो ऐवज अर्काटचे सराफांत भरून, हुंडी करून, पुणियास जलद पाठऊन देणें. या कामास दिवसगत न लावणें. जाणिजे, छ १७ रजब. अज्ञाप्रमाण लेखनसीमा.
