लेखांक ३९३
१५४४ मार्गशीर्ष वद्य १२
रुजू निगाबान
अज दिवाण ठाणे देहाये पा। पाडियापेडिगौ व तरफ कर्डिई समत जुनेर ता। हुदेदारानी व मोकदमानी मौजे बेलवडी ता। कर्डिया समत मजकूर सु॥ सलास इसरैन अलफ बा। खु॥ रा। छ २९ माहे मोहरम सादर जाले तेथे रजा जे बेस्मी मुदगलभट व कृष्णभट बिन बाबदेभट सेकीन पुणे-चाकण यास बदल धर्मादाऊ इनाम अजरामर्हामती बदल दान सूर्यग्रहण जमीन काळी कीर्द चावर १ गज सरायनी दर सवाद मौजे बेलवडी ता। कर्डिई देखील नखतयाती ता। ठाणे व ता। देहाये व बाजे बाबा व पायपोसी व खर्चपटी व वेठीबेगारी व बाजेपटी कुल बाब कुल कानू दिधले असे बाब महसुलेसी दुमाले कीजे सदरहू जमीन नेमून हद्दमहदूद घालून प्रज नेमून देऊन हुजुरु खबर लिहिणे अवलाद अफलाद चालवीत जाइजे दर हर साल ताज्ये खुर्द खताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेऊन असेली फिराऊन दीजे ह्मणौन रजा रजे बा। सदरहू प्रमाणे अमल कीजे तुह्मी तालीक घेऊन असेली इनामदार मजकुरापासी दीजे मोर्तबु
तेरीख २६ माहे सफर
सफर