पत्रांक २३०
श्री.
१७०१ आश्विन शुद्ध.
पुा श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे सेवेसीं:-
सां नमस्कार विनंती. राजश्री राजाराम गोविंद योगीराजापाशीं होता. त्याजसमागमें सरंजाम देऊन अंकळेश्वरास मुकाम आला. हे वर्तमान आह्मांस कळतांच फौजेची तयारी करून सिद्ध जाहलों, राजाराम गोविंद इंग्रजांचे परवानगीनें नर्मदा उतरून उत्तरतीरास येऊं लागले. त्यास अधिकच लोकांचा गवगवा. आण इकडे आपली फौज. पुर्तेपणें आपला परिणाम लागत नाहीं हें समजोन, रात्रीं वीस पंचवीस स्वारांनिशीं डबईपलीकडोन हालोलकाकेलेस गेला. तेथेंहि न राहतां पुढें माळव्याकडे गेले. सरंजाम बराबर होता तो अंकळेश्वरीचं राहिला. कांहीं उठोन माघारा सुरतेस गेला. तूर्त इंग्रजांचा सरंजाम पोख्त तयार जाहाला आहे. पुढें काय मसलत हें कळत नाहीं. येथून राजश्री लक्ष्मणराव चिटणीस यांजकडे पत्रें लिहून बामी वरचेवर आणवीत असों. तेथें जो निश्चय ठरेल तो वरचेवर लिहित असावें. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ कीजे. हे विनंती.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)