लेखांक ३९४
१५४४ माघ वद्य ३०
अज रखतखाने राजश्री संभाजी राजे साहेबू दामदौलतहू बजानेबू कारकुनानी देहाये परगणे पांडियापेडगौ व तरफ करडे बिदानद सु॥ सलाम इसरीन अलफ बो। मुदगलभट बिन कृष्णभट सो। पुणे हुजूर एउनु मालूम केले जे आपणास इनाम बदल धर्मादाऊ जमीन चावर एक गज सरायनी १ दर सवाद मौजे बेलवडी ता। मजकूर पेसजी खुर्द खत सादर आहे जे जमीन मेजून हद्द महदूद घालनु देणे यावरी आपण माहालास गेलो माहालाचे कारकुनास साहेबाचे खुर्द खत दाखविले यावरी कारकून जमीन मेजून प्रज बाबाजी मुलाणा मुजेर मौजे मजकूर प्रज नेमून दिधला आहे ए बाबे कारकुनी आपणापासी अर्जदास लेहौनु दिधला आहे तरी स्वामी धर्मपरायण आहेती ऐणेप्रमाणे खुर्द खत दिधले पाहिजे दरी बाब सरंजाम होय मालूम जाहाले तरी भटगोसावियास इनाम बदल धर्मादाऊ जमीन चावर एक १
गज सरानी यास प्रज बा। अर्जदास्त छ ४ माहे रबिलाखर बाबाजी मुलाणा मुजेरी मौजे मजकूर नेमून दिधला असे दुमाले कीजे अवलाद अफलाद चालवीत जाइजे सदर हर साल ताजे खुर्द खताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेऊनु असेली इनामदार मजकुरापासी फिराउनु दीजे तकरार फिर्यादी एऊ न दीजे मोर्तब सूद
रुजू सुरनीस
तेरीख २८ माहे रबिलाखरू
रबिलाखर