पत्रांक २४१
श्री.
१७०१ आश्विन वद्य अखेर.
पुा श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक स्वामींचे सेवेसीं:-
विनंती. आपण आश्वीन शुद्ध १४ चें पत्र पाठविलें तें पावोन परम संतोष जाहला. पत्रीं मजकूर कीं, तुह्मी येजमान बहुत सावध असावें ! इ. कडील काळजी न करावी. काळूबराबर पत्रें पाठविलीं आहेत तीं समक्ष द्यावीं. व राजश्री बाळोबानाना बहुत उपयोगीं पडले. पाहिले पासोन यजमानाचे पदरीं. यांचें यजमानांनी चालवावें. कैलासवासीयांनीं गांव दिल्हे आहेत ते चालविले पाहिजेत. व ऐवज जलदीनें पाठवावा म्हणून तपासिलें लिा त्यास, यजमानापाशीं निष्ठेनेंच वागत असों. दुसरा विचार नाहीं, दरबारची काळजी आह्मीं कशास्तव करावी ? आपण प्रसंगीं. त्याअर्थी आम्ही बेफिकर असों. ऐवजाचा मजकूर तरी तरतूद करीत आहों. इकडे राजाराम गोविंद यांची गडबड व दुसरी चंद्रराव पवार यांची जाहली. यामुळें सावकार धीर पुरून काम होत नव्हतें. आतां तरतूद लवकरच करित असों. राजश्री बाळोबानाना बहुत उपयोगी पडले. त्यास यांतील काय भाव आहे तो समजलियांत येत नाहीं. तरी सविस्तर लिहिलें पाहिजे. म्हणजे समजण्यांत येईल. बहुत काय लिहिणें? कृपालोभ करावा हे विज्ञप्ति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)