पत्रांक २४०
श्रीसांब
१७०१ कार्तिक वद्य ५
पौ कार्तिक वद्य ७ मंगळवार व्यार घटका रात्र.
सेवेसी सां नमस्कार विनंती उपरी. आपण पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला मजकूर सविस्तर कळला. येथील मजकूर आपल्या गृहस्थाची व मुख्याची भेट जाहली. त्यांतील मजकूर पत्रीं लिहितां येत नाहीं. परंतु तिकडील पक्ष मुख्यांनीं भारी धरिला आहे. नकारनामकांचा मजकूर मुक्ततेचा. त्यांत मजकूर की, आम्हांकडे जाबसाल नाहीं. शिलेदारांची पैक्याची निशा करून त्यांणीं सुखरूप जावे व शिलेदारांचा मजकूर तर मनस्वी आहे. तीन लक्ष शाईशिरतेप्रों त्यांणीं बाकी काढिली आहे. त्याही मधें ते मजकूर बोलतात कीं, बक्षीचे हिशेबानें शाईशिरस्तेप्रों देणें निघेल तो ऐवज देणें. त्यांतही पांच रुपये कमी दिल्यास घेऊं, त्याचाही मजकूर, आपल्या गृहस्थास दरम्याने घालून जाबसाल परभारें केले आहेत. येथल्या मुख्यांशीं व तेथील कारभात्याशी कांहीं पेंचही आहेत. त्याचे जाबसाल होतील तेसमईंही शिलेदारांचा पैका दिल्याविना मुक्तता होत नाही. व ते गृहस्थ हातीं लागणें हे गोष्ट तों घडत नाहीं. दोहों चोहों दिवसांमध्ये मागती मुख्याशीं गांठ घालून त्याची ममता आपल्या यजमानावर व याची मुक्तता होय ऐसें करितों. परंतु पैका बहुत पडेल. मागाहून होईल वर्तमान तें लेहून पाठऊं. आपल्या गृहस्थांनी चिठी लिहिली आहे. ती अलाहिदा पाठविली आहे. ती पावेल, वाचून त्यासही उत्तर ल्याहावें. रवाना मिती कार्तिक वा ५. सायंकाळ, चार घटका दिवस. बहुत काय लिहिणे? कृपा लोभ असों द्यावा. हे विनंती. पत्र पाठवाल तें रा देवराव हिंगणे यांचे राहुटीस पाठऊन द्यावें. जो माणूस पाठवाल त्यासही स्थळ हिंगण्याची राहुटी सांगावी. हे विनंती.
रा दादास व दिवाणजीस सां नमस्कार. लिहितार्थ परिसिजे. उत्तर तपशीलवार लिहिणें, लोभ कीजे. हे विनंति.