Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
स्थलनामव्युत्पत्तिकोश
ब
बऊर - भगपुरं ( = भगुर = बहुर = बऊर).
बाहुपुरं = बाऊर = बऊर. मा
बकडू - बक (रुई ) - बकद्रु. खा व
बकवाड - बकवाटं. खा इ
बग - बकं. खा इ
बगलाणें - बलाकावनं. खा इ
बचेरी - वत्सोद्धरण. सोलापूर, खानदेश. पा. ना.
बडवाणी ऊर्फ शुक्लदेवी - (गांवावरून). खा प
बडवी - वडवा. शहादें. पा. ना.
बडोदा - पद्र म्हणजे खेड़ें, गांव.
भरुपद्र = समुद्रकांठचा, दलदलींतला गांव.
भरुपद्र = भडुअद्र = भडूद्र = बडूद्र = बडोद्र + (क = अ) = बडोद्रा (गुजराथी) = बडोदें (मराठी) वडोदा. वटोदर ही व्युत्पत्ति निराधार आहे. (भडोच पहा)
बडोदें - सं. प्रा. वडपत्रक (वटपद्रक) (शि. ता. )
बदरुखें - बदरवृक्षं. खा व
बदवा - वडवा ( अश्विनी) - वडवा. खा म
बंधारपाडा - वनदारक (लोकनाम) - वनदारक पाटकः खा म
बंधारा - वनदारक ( लोकनाम ) - वनदारकः खा म
बंधारें - वनदारक ( लोकनाम ). खा म
बनशेंद्रें - वनसिंदूरकं. खा व
बनसेवाडी - वनसं. सातारा. पा. ना.
बरडी - वरंड (उंच माळ जमीन) - वरंडिका. खा नि
बलकुवा - बला. खा व
बलदाणें - बलद (बैल ) - बलदवनं. खा इ
बलवाडी - बला. ३ खा व
बलवार - बलावरकं. खा व
बलसाणें - वलाक्ष (व्यक्तिनाम, राजनाम) - वलाक्षवनं. खा म
बल्हाणें - वर्हिवनं. खा इ
बसखेडें - वसु. खा व
बसाणें - वसुवनं. खा व
बहादरपुरें - भद्र (हत्ती) - भाद्रपुरं. खा इ
बहिरपुर - भैरवपुरं. खा म
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सूतगोत [ सूत्रगोत्रं = सूतगोत ]
सून १ [ स्नुषा = सुण्हा = सुना (एकवचन ) ] वस्तुतः सुना हें एकवचन असतां तें अनेकवचनीं समजतात व त्याचें एकवचन सून करतात. (सं. मं.)
-२ [ स्नुषा = सुन्हा = सून ] मुलाची बायको. (भा. इ. १८३३)
-३ [ सूना (मुलगी) = सून ] मुलाची बायको. (भा. इ. १८३३)
-४ [ स्नुषा = सोहणा = सूना = सून ] (स. मं. )
सूनबहिरी [ शूनबधिरता = सूनबहिरी ]
सूबा [ श्वः = सुवो = सूबा ] tomorrow.
सूर [ स्वर = सूर. स्वरवाहनं = सूर वाहणें ] (भा. इ. १८३४)
-सें [ -शी पहा ]
सेजवळ [ शय्यापालः = सेजवळ ]
सेजार [ शय्यागृह ] (शेजार ३ पहा)
सेंदणें [ स्यन्दनं ] ( शेंदणें पहा)
सेली [ शिरि sword, arrow = शिलि = सेली ] बाण.
उ०- हाथि हाला फुलिं । पासिवणें जेवि न घली ।
तैसा नोहोटे दुर्वाक्यसेलीं । सेलिला सांता ॥ ज्ञा. १३-४९५
सैंघ [ शीघ्रं = सिघ्घं = सैघ = सैंघ ] सैघ, सैंघ हा शब्द ज्ञानेश्वरींत येतो.
सैती [ शक्तिः = सत्ती = सइती = सैती ] एक हत्यार आहे.
सैपाक, सैंपाक [ हा शब्द स्वयंपाक या शब्दापासून अडाणी लोक व्युत्पादितात, परंतु ती व्युत्पति अशास्त्र आहे. खरा संस्कृत शब्द सूदपाक असा आहे. सूद म्हणजे शिजवणें व पाक म्हणजे हि शिजवणें. सूदपाक हा जोड शब्द आहे. जोडींतील दोन्ही अवयवांचा अर्थ एक च. सूद याचा अर्थ मसाला असा हि होतो. पण मसाला ज्यांत नाहीं अशा भाकरीच्या भाजण्याला हि सैपाक च म्हणतात, सबब मसाला हा अर्थ येथें अनिष्ट आहे.
सूदपाक = सूअपाक = सोपाक = सैपाक, सैंपाक. अनुनासिक वैकल्पिक ] (भा. इ. १८३७)
सैपाकी, सैपाक्या [ सूदपाकिन् = सोपाकी, सैपाकी, सैपाक्या ] (भा. इ. १८३७)
सैराट [ स्वैराटक = सैराट ] vagrant at will.
सैरावैरा [ स्वैरंस्वैरं = सैरावैरा. ईर् गतौ, कंपने. प्रथम स्वचा स, व द्वितीय स्वचा व झाला आहे. ] (धा. सा. श.)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सुर्गाठ [ सुग्रंथि ] (निर्गांठ पहा)
सुर्गांठ [ सूद्ग्रंथिः ] (सुरगांठ पहा)
सुलटपालट [सुश्लिष्टं प्रश्छिष्टं = सुलटपालट (गाण्यांतील) श्लिष् ४ आलिंगने ]
सुवाण [ सुपण्यं = सुवाण ] Plentiful commodities
सुवारा [ सूपकार: = सुआरा, सुवारा ] cook.
सुसटणें [ सुसाटणें पहा ]
सुसाटणें [सम् + उत् + सट्ट to be powerful = सुसाटणें, सुसटणें, सोसाटणें, सोसटणें, सुटणें ] to be powerfully blowing.
सुस्कारा-री-र [ श्वसकारः = सुस्कारा. रिः = री ]
सुस्त [ श्वस्त = सुस्त. श्वस् २ निश्वसने, धापा टाकणें ] सुस्त म्हणजे धापा टाकीत निर्जीव होऊन बसलेला.
सुळकन् [श्लंक्, श्लंग् १ गतौ ] ( धातुकोश-सुळक २ पहा)
सुळकी [श्लंका = सुळकी ] ,,
सुळकुंबा [ शूलकुंबः = सुळकुंबा ]
सुळावरची पोळी [ शूलस्य उपरिष्ठा पोलिका = सुळावरची पोळी ] शाल म्हणजे मांसादि भाजावयाचा लालभडक लोखंडी खिळा. त्यावरची पोळी काढावयाची म्हणजे हात व तोंड भाजावयाचें. वध करण्याचा सूळ निराळा. (भा. इ. १८३७)
सं [ शु (शैघर्ये) = सू= सूं ] (भा. इ. १८३४)
सूक [ शुक्र ] ( सूख पहा)
सुख [ शुक्र = सुक्क = सूक, सूख ] तिला नवर्याचें सूख नाहीं म्हणजे शुक्र नाहीं.
सूजणें [ असूया ११. असूयनं = (अलोप) सूजणें ] त्याचें बरें झालें तर तुझें काय सूजतें ? तस्य कल्याणेन तव किं असूय्यते (भावे). ( धा. सा. श. )
सुट १ [ सूदाति )
-२ [ सृष्टिः = सूट ]
सूड १ [ सूद् to destroy = सूड ]
-२ [ असूयतिः (noun from असूया) = सूड ] सूड उगवणें to take revenge.
-३ [ षूद् क्षरणे । सूद: = सूड ] सूड म्हणजे खरड, वैरनिर्यातन. निषूदनः म्हणजे मारणारा.
-४ [ सूद् murder, kill, destroy = सूड ] सूड घेणें o retaliate murder.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सुना-नी-नें [ सून (रिकामा ) = सुना-नी-नें ]
सुनावणी [ संज्ञापना = सण्णावणा = सनावणी = सुनावणी अ बद्दल उ]
सुपडें [ शूर्पपुटं ] ( सुपलें पहा)
सुपली [ शर्पपुटिका = सुपली ] (सुपलें पहा)
सुपलें [ शर्पपुटं = सुपड़ें, सुपलें. शूर्पपुटिका = सुपली ]
सुफराट, सुफराटें [ सुस्फारयत् ] (उपराट पहा )
सुंब [ शुल्ब ] (सुंभ पहा)
सुबक [ सुभगं = सुवक ]
सुभगं उक्तं त्वया = तूं सुबक बोललास.
सुंभ [ शुल्बं वराटकं स्त्री तु रज्जु स्त्रिषु वटी गुणः ॥ २७ ॥
( अमर-द्वितीय कांड-शद्रवर्ग).
शुल्ब = सुब्ब = सुंब = सुंभ ( दोर ) अनुनासिक आगंतुक ] (भा. इ. १८३३)
सुमार १ [ स्मृ १ स्मृतौ, to recollect = सुमार ]
त्याला सुमार राहिला नाहीं म्हणजे आठवण राहिली नाही.
-२ [ सुकुमार = सुउमार = सुमार ] पाहिली, मुलगी सुमार आहे, येथें सुमार म्हणजे सुकुमार, अल्पतनु, लहान मुलाच्या मानानें कोवळी असा अर्थ आहे.
सुर् (sur-round) [ सम्परि = सुर्. circharge. sub पासून सर काढणें अयुक्त. ]
सुरगांठ [ सूद्ग्रंथिः = सुर्गांठ. निर्ग्रंथिः = निर्गाठ.]
सुरपाटी [सृपाटी = सुरपाटी ] सृपाटी म्हणजे माप, मर्यादा. सुरपाटी म्हणजे मापाची, मर्यादेची रेघ.
आट्यापाट्यांतील मधली मेजाची मुख्य पाटी.
सुरवाड [ सुवृद्धिः = सुरवाड ] (ज्ञा. अ. ९ पृ. १८२)
सुरवाडणें [ सुवर्धनं = सुवङ्ढण = सुरवाडणें ] निर्वर्धनं = निर्वङ्ढण = निरवाडणें. निरच्या धर्तीवर सुर् ] (भा. इ. १८३२)
सुरवाडु [ श्रुतिवादः ] (ज्ञा. अ. ९ पृ. ४०)
सुरसुरणें [ शूर् १० विक्रान्तौ. शूरशूरयं = सुरसुर सुरसुरणें = आंगीं पराक्रम येण्याची धमक येणें. ( धा. सा. श. )
सुरा [ सुरा चषकमद्ययोः (मेदिनी)] पाणी प्यायचा. (भा. इ. १८३३)
सुरू [सुर (द्रुम) = सुरू ] वृक्षविशेष, देवदाराचा प्रकार
सुरू करणें [श्रु १ श्रवणे. श्रुकरणं = सुरू करणें] काल व्याकरण सुरू केलें. ( धा. सा. श.)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सुटसुटित १ [ सुट्ट अल्पीभावे द्वित्त = सुटसुटित ] not fat, moderately lean.
-२ [ स्था १ स्थाने. सुस्थसुस्थित = सुटसुटित ]
-३ [ सूत्थसूत्थित = सुटसुटित ]
-४ [ चुट्, चुट्ट अल्पीभावे लहान होणें = सुटसुटित, सुट्टा ]
-५ [ श्वठ् to be accurate द्विरुक्त = सुटसुटित accurate, measured.
-६ [ सुत्थ ११. सुत्थसुत्थित = सुटसुटित ] (धा. सा. श.)
-७ [ सुट्ट १ अनादरे, अल्पीभावे-सुट्टसुट्टित ]
सुटसुटित म्हणजे लठ्ठ नव्हे तो, सडपातळ.
( धातुकोश-सुट १६ पहा)
-८ [ सु + युट्ट १ अल्पीभावे = सुटसुटित ] ( धातुकोश-सुट १७ पहा)
-९ [ सुष्ठुसुघटित = सुटसुटित ]
सुट्टा [ चुट्, चुट्ट अल्पीभावे ] (सुटसुटित ४ पहा )
सुडगें [ समुद्र a covered box, casket = सुडगे ] an eartben vessal at the संक्रांति.
सुडसुडीत [ श्वठ् to be accurate द्विरुक्त = सुडसुडीत ) accurate, measurad, stiff.
सुडाचा ( कागद) [ सुदायः = सुडाजा = सुडाचा ] सुदाय म्हणजे मुद्दाम खास देणगी. सुडाचा कागद म्हणजे राजाकरितां खास तयार केलेला कागद.
सुत [ सुप्तः + ल ] ( धातुकोश-सुव ४ पहा)
सुतक [ सूत्रक = सूतक = सुतक ] (स. मं.)
सुताडा [ सूत्रपटः = सुताडा ] कापसाचीं सुतें विणून केलेलें जाडेंभरडें बसावयाचें वस्त्र.
सुंद १ [ शौंड = सुंद ] दारूनें सुंद म्हणजे शिथिलगात्र झाला आहे.
-२ [ सुमंद = सुविंद = सुंद ]
सुदट [ सुदृढं = सुद्ट, सूदट ]
सुंदर [ सूनर = सुंदर. यो वाद्यते ददाति सूनरं वसु ( १-८-४०-४) सूनरं = सुंदरं नरं ] संस्कृत सुंदर शब्द वैदिक सूनर शब्दापासून निघाला आहे.
सुद्धां [ सार्धं = सद्धिँ (जैनमहाराष्ट्री)=सद्धँ (महाराष्ट्री)= सुद्धँ = सुद्धां ] येथें महाराष्ट्री किंवा अपभ्रंश अ चा उ झाला आहे. ( भा. इ. १८३२)
सुधा १ [सुधी (चांगल्या मनाचा) = सुधा ] honest.
-२ [ शुद्धधीः = सुधा ] तो सुधा मनुष्य नाहीं म्हणजे शुद्धधी नाहीं.
-३ [ सुधी (विद्वान्, जाणता) = सुधा ] well-disposed
सुनबहिरी [ शूनबधिरता = सुनबहिरी ] शून म्हणजे सुजलेलें. (भा. इ. १८३४)
सुना [ स्नुषा ] (सून पहा)
स्थलनामव्युत्पत्तिकोश
फ
फकांडें - फल्गु (बोखाडा) - फल्गुवंटं. खा व
फतेपुर - ३ खा मु
फरकांटें - फल (गेळा) - फलकंथं. खा व
फरकांटें - फलकंटका. खा व
फलई - फलही ( सांवर). खा व
फलकडी - फलक (वृक्षविशेष) फलकवादिका. खा व
फलटण - फलस्थान. (पैठण पहा)
फळणें - फुलवनं (फळें पुष्कळ आहेत ज्या वनांत तेथील गांव). मा
फळी - फलिका ( वाघांटी ). खा व
फळी - फली ( वाघांटी ). खा व
फागणें - फाल्गुन ( अर्जन ) - फाल्गुनकं. खा म
फाटा - स्फटिक - स्फटिक: खा नि
फाटा अंबा - स्फटिक - स्फटिकांबिक: खा नि
फापराळें - पर्परीकं (तळें) - पर्परीकपल्लं. खा नि
फापुरकी - पर्परीकं (तळें) - पर्परीकिका. खा नि
फापोरें - पर्परीकं (तळे) - पर्परीकं. २. खा नि
फुपगांव - पुष्पग्रामं. खा व
फुपणी - पुष्पवनी. खा व
फुलपाटें - फुल्लपट्टं. खा व
फुलवाडी - फुल्लवाटिका. खा व
फुलसरें - फुल्लसरस्. खा व
फेस - फेंचक (पक्षिविशेष) - फेंचकं. खा इ
फेसर्डी - फेंचक (पक्षिविशेष) - फेंचकपद्रा. खा इ
फैजपुर - खा मु
फोपरें - पुष्पपुरं. खा व
फोपादें - पुष्प - पुष्पकपद्रं. खा व
फोपिर - पुष्प - पुष्पवेर = पुप्फएर = फुप्पिर = फोपिर. खा व
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सुगंधी [ सुवासिक तेलें विकणार्याला आपण सध्यां मराठींत सुगंधी म्हणतों. कात्यायनकालीं त्याला सुगंध म्हणत-सुगंध: आपणिकः । परंतु, कात्यायनकालीं सुगंधि हा शब्द फुलें वगैरेंना लावीत. सुगांधि पुष्पं, सलिलं । ] (भा. इ. १८३६)
सुगावा [ सम् + अव + गम् - समवगमः] (धातुकोश-सुगाव ४ पहा)
सुगी [ सुपति = सुगई = सुगी ] चांगल्या पिकाचे दिवस ( स. मं. )
सुगीदुगी १ [ सुगतिदुर्गति = सुगइदुग्गइ = सुगीदुगी ]
-२ [ सुग-ता दुर्ग-ता = सुगीदुगी ] Opulence and famine. good and bad times.
सुग्रण [ सुग्रहिणी = सुग्रण ] ती, बाई, सुग्रण आहे हो म्हणजे ती सुग्रहिणी आहे, संसार दक्षतेनें पाहणारी आहे. (भा. इ. १८३४)
सुघड [सुघटं = सुघड ]
सुचित [ सुचित = सुचित ]
सुजणें [ श्वज् (गतिकर्म) = सुज. ] माझें काय सुजतें आहे ? = जातें आहे. (भा. इ. १८३३)
सुजाण [ सुजज्ञान = सुजाण. ज्ञा ९ ज्ञाने. जानत् = जाणता ज्ञात = जाणलेला. सर्वज्ञ = सर्वजाण.
ज्ञानप्रज्ञान = जानपछाण-न ] ( धा. सा. श. )
सुजे [ शुचिर् पूतीभावे । शुच्यते = सुज्जए = सुजे ] (भा. इ. १८३३)
सुट (टा-टी-टें) [ स्वस्थ = सुठ्ठ = सुट ] सुटा मनुष्य, सुटी बाई, सुटें मूल. सुटी बाई सैंपाकाला हवी = स्वस्था स्री स्वयंपाकाय भाव्या. (भा. इ. १८३४)
सुटणें १ [ सम् + उत् + सट्ट ] (सुसाटणें पहा)
-२ [ श्वठ् (संपणें ) = सुठ = सुट ] शाळा सुटते = शाला श्वठति (भा. इ. १८३३)
-३ [ श्वठ = सुठ = सुट ] जाणें, निघणें.
गाडी सुटते = गंत्री श्वठति (चालू होते)
श्वठ (गतिकर्म). (भा. इ. १८३३)
-४ [ सृष्ट = सुट्ट = सुटणें ] वाण सुटला = वाणः सृष्टः ( भा. इ. १८३६)
स्थलनामव्युत्पत्तिकोश
पेण - प्रकीर्ण याचें प्राकृत पइण्ण. प्रकीर्णग्राम = पइण्णगाम = पेण्णगांव = पेण. जेथील घरें मूळचीं दूर दूर होतीं तें पेण गांव. (महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)
पेथापूर - पीथि (घोडा) - पीथिपुरं. खा इ
पेंबरें - पतिंवरा = पइंबरा = पेंबरा. पेंबरा ज्या गांवांत होती तें पेंबरें. खेडोबाची स्त्री ज्या गांवांत होती तें गांव.
पेशावर - ह्या शहराच्या नांवाचा उच्चार तत्रस्थ लोक पिसाऊर असा करतात व तो च शुद्ध आहे. पिशाच, पिसाच भाषा ज्या प्रांतांत बोलत तो पिसाच देश व तेथील मुख्य शहर तें पिसाचपुर. पिसाचपुर = पिसाअउर = पिसाउर = पेशावर. पुरुषपुर या संस्कृत शब्दापासून पेशावर हा शब्द कित्येक लोक व्युत्पादितात; परंतु तें प्रमाण दिसत नाही. (भा. इ. १८३३)
पैठण - फलस्थान = फलठाण = फलटण. मल्लस्थान = मालठण = मलठण.
बिंबस्थान - बिंबठाण = ठाणें. प्रतिस्थान = पइठाण = पैठण.
पट्टन ह्या शब्दाशीं पैठणाचा कांहींएक संबंध नाही. ('महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)
पैठाण - सं. प्रा. प्रतिष्ठान. (शि. ता.)
पोखरी - पुष्कर (तीर्थविशेष) - पुष्करिका. ३ खा म
पोहण - पयोष्णि (नदीनाम ) - पयोष्णिकं. खा म
पोहर - पयोहर - पयोहरकं. खा नि
पोहाळा - पृथुकपल्ल: खा नि
पोहोरी - पयोहर - पयोहरिका. खा नि
पौडखोरें - प्रवत् कुहरकं = पौडखोरें. प्रवत् म्हणजे सखल प्रदेश. पौड खोरें म्हणजे सखल खोरें.
पौढाणं - पुंड्र ( लोकनाम ) - पौंड्रवनं. खा म
प्रकाशें - प्रकाशकं. खा नि
प्रतापपुर - } प्रताप. खा नि
प्रतापपुरें - }
प्रस्थ = पत - सोनपत, पानपत, बागपत या दिलांच्या उत्तरेस असणार्या शहरांच्या नांवाचें उत्तरपद जें पत तें प्रस्थ ह्या पाणिनिकालीन शब्दाचा अपभ्रंश आहे.
सोनपत = सुवर्णप्रस्थ किंवा शोणप्रस्थ. पानपत = पणप्रस्थ.
पर्ण हें जनपद व तत्रस्थ लोक यांचें नांव असावें. आपर्णानि कुलानि ( गाथासप्तशती ) बागपत = वर्कप्रस्थ.
तसें च इंद्रप्रस्थ ह्या शब्दाचा अपभ्रंश इंदपत असें व्हावें; परंतु हा अपभ्रंश सध्यां प्रचलित नाहीं. कां कीं, तें शहर बुडून नामशेष झालें. दिल्लीला इंद्रप्रस्थ केवळ लक्षणेनें म्हणतात. सोनपत, पानपत, बागपत व इंद्रप्रस्थ हीं चार नगरें कुरुक्षेत्रांत होतीं.
प्रस्थपुरवहान्ताच्च (४-२-१२२) (भा. इ. १८३२)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
साळी १ [ शालिक = सळिअ = साळी ] (भा. इ. १८३७)
-२ [ शालिनी (उत्तम स्त्री ) = साळी ]
साळोत्री [ शल्यतांत्रिकः = साळिअंत्री = साळोत्री ] प्रथम शल्यतंत्र या शब्दाचा अर्थ फक्त शस्त्रक्रिया असा होता. नंतर घोड्याच्या रोगचिकित्सेला तो शब्द लागूं लागला.
शल्यतंत्र = साळोत्र. शालिहोत्र ऋषि होता व तो अविवैद्य होता आणि त्याच्या नांवावरून शालिहोत्रं हा शब्द निघाला, वगैरे नंतरच्या गप्पा आहेत.
सिठी [ सृष्टिः = सिठी ] creation.
सिरे [ क्षीरं ] (शिरें १ पहा )
सी-स [ आसात् इति अंतिकनाम (निघंटु) आस ह्याची पंचमी आसात्. आस ह्याची सप्तमी आसे.
गृहस्य आसे = घरा + आसीं = घरासीं = घरास. त्या घरास परसूं आहे म्हणजे त्या घराजवळ परसूं आहे.
हें स-सी प्रवचनीय मराठींत वैदिक आसात् या अव्ययापासून आलेलें आहे.] (भा. इ. १८३४)
सीधा [ सिध्रः ( साधुः, भट्टोजी, उणादि १७९ ) सिध्र = सिध्ध = सीध (धा-धी-धें ) ] ( भा. इ. १८३३) सीयारें [ सात्कारः ] ( शहारा पहा)
सुआरा [ सूपकार: ] ( सुवारा पहा)
सुई [ सूचि = सुइ = सुई ] (भा. इ. १८३२)
सुईण [ सूतिशा = सुइण्णा = सुईण ]
सुकट [ शुष्कल = सुक्कल = सुकल=सुकड = सुकट, ड = ल ] सुकट म्हणजे एका प्रकारचे मासे.
(नङ्वलाभ्यः शौष्कलं (मा. वा. सं. ३०-१६)
शुष्कल म्हणजे सुकें मत्स्यमांस. (भा. इ. १८३३)
सुकरि-री [ शुकृत्य quickly = सुकरि ] quickly, promptly. उ०-ज्ञा. १५-३५७ माडगांवकर पोथी.
सुकलेले [ शुष्कशुष्कं ] (ओलेलें पहा)
सुकाळ [ सौकल्य = सुकाळ ] अन्नस्य सौकल्यं = अन्नाचा सुकाळ. सौकल्य म्हणजे औदार्य, चंगळ.
सुकेळें [ शुष्ककदलं = सुकेळें ]
सुखाटणें [ सुखाटनं = सुखाडणें - सुखाटणें ] (भा. इ. १८३६ )
सुंगट [ चिंगेटः = सुंगट ] a kind of fish.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सांवळा गोंधळ [ शांभलिक: गौंदला = सांवळा गोंधळ ] ज्यांत दुराचारी रांडा गातात असा गोंधळ.
गोंधळ वस्तुतः सदाचारी देवदासी ऊर्फ मुरळ्या यांनीं घालावयाचा असतो. त्याच्या ऐवजीं चाहाटळ मुरळ्या ज्या गोंधळांत आढळतात, त्याला सांवळा गोंधळ म्हणतात. त्यावरून लक्षणेनें कोणत्या हि चाहाटळ, अपेक्षणीय व असाधु कृत्याला सांवळा गोंधळ म्हणण्याची चाल महाराष्ट्रांत आहे. (भा. इ. १८३७)
सावळें [शबलं=सावळे] सावळे परब्रह्म म्हणजे शबलं ब्रह्म. तुकारामाच्या अभंगांत हा शब्द येतो.
सांवळ्या [ शामलकः = सांवळ्या. पंचतंत्र-चतुर्थतंत्र-कथा ६. ]
सावाय १ [ समवाय multitude = सावाय ] multitude, समुदाय.
उ०-ऐसा स्वयंभु जो जीव लाटु । सावायें विण उद्भटु ।
तो शौर्य गा श्रेष्ठु । पहिला गुणु ॥ ज्ञा. १८-८५४
समुदायाखेरीज जो एकटा असून शूर.
-२ [ साहाय्य = सावाय (मदत) ज्ञानेश्वर, सावाव (वो)]
सावावा (वो) [ साहाय्य ] (सावाय २ पहा)
सावावो [ समवायः ] ( धातुकोश-साव पहा)
सावेरी [शतपर्विका=सअपेरी=सावेरी (वनस्पतिविशेष) दूर्वा ] (ज्ञा. अ. ९ पृ. ८५)
सासरा [श्वशुरक = ससुरअ = सासरा ] (स. मं.)
सासरें [ श्वश्रूग्रह = सासुघर = सासुर = सासरें (नवरीचें) (सासुरवासी-शी ) ] (स. मं. )
सांसिनल [ संसिन्व् म्हणजे चांगलें भिजणें. संसिन्वित = साँसिन्नअ + ल = साँसिन्नल, सॉसिनल ] सांसिनले (ज्ञा. अ. ९ ओं. ४ ) निष्ठा बहुवचन. साँसिनले म्हणजे चांगले भिजलेले. (ज्ञा. अ. ९ पृ. ५ )
सासुर्डी [ साश्रुधी = सासुर्डी ] सासूचें निंदाव्यंजक रूप. (भा. इ. १८३३)
सासुरवाडी [ श्वशुरवाटी = सासुरवाडी (नवर्याची ) ] (स. मं. )
साहाण १ [ शान ] (साण पहा )
-२ [ शानिका = साण = साहाण ] सोनें घासण्याचा, तेजण्याचा दगड. निशानं तेजनं.
साहू [ साधु (वार्धषिक, व्याजबट्टा करणारा) = साहू] सवकर
साळढाळ [ शालाशिथिल = साळढाळ ]
साळसुध [ शालाशुद्ध] (ठाणसुध पहा)