लेखांक ४१३
१५५२ आश्विन शुध्द १३
(फारसी मजकूर)
महजर बतारीख ११ माहे रबिलोवल हाजीर मजालसी किले
फतेमंगल
मसरुल अनाम राजश्री अला फतुला सर + बत
दतो बाबाजी हवालदार चा। रा। खास
व कारकून किले मजकूर
एमाजी व बाबाजी बिदस्तूर विसाजी रगनाथ देसकुळ-
देसमुख किले मजकूर करणी किले मजकूर
(शिक्के षटकोनी दोन)
सु॥ इहिदे सलासीन अलफ कारणे महजर जाला ऐसा जे सभाजी तानतेऊ यासि गोदजी मोकदम व रामजी बिन राजजी मोकदम मौजे निरगुडे किले मजकूर लिहून दिधले ऐसे जें आपत व फिरती जाली याकरिता उपवासीं मरो लागलो भोई पडिलो घरबूड हो लागली मग आपण तुह्मास आपली मोकदमी निमे चावर ३१ निमे मोकदमी बिता।
बा। गोदजी मोकदम रामजी बिन राजजी मोकदम
१५ खासा चावर पैकी चावर ६ एकूण किमती
१० एमाजी बा। होन १०
एकून चावर २५
एकून किमती देखील
मान होन ३५
एकून चावर ३१ मौजे मजकुरीची निमे मोकदमी एकून होन ४५ पचेतालीस धारण करून तुह्मी सदर्हू प्रमाणे पैके आपणास दिधले आपण तुह्मास निमे मोकदमी आपले खुसीने दिधली आधी मान तुमचा व नागर निशान तुमचे व हरएक मान आधीं तुमचा व बाजाराचा हक्कलाजिमा व काळीपाढरी व हरएक मान तुह्मास निमे मोकदमी लेकराचे लेकरीं मिरासी करून दिधली आहे ते लेकराचे लेकरी खाऊन सुखे असिजे यास जो कोन्ही बिलाहरकती करील अगर आपला भाईबिरा जर कोन्ही उभा राहील त्यास आपण निवारीन सदरहू प्रमाणे निमे मोकदमी लेकराचे लेकरीं मिरासी करन दिधली आहे ते खाऊन सुखे असिजे हा महजर सही