लेखांक ४१४
१५५३ आषाढ शुध्द ७
श्रीसके १५५३ प्रजापती नाम संवस्छरे आसाड सुध सप्तमी वार आदितवार बिहुजूर एमाजी व बाबाजी देसमुख किले फतेमंगाल यां विदमाने सभाजी तानदेऊ यास गोदजी बिन माहादजी मोकदम मौजे निरगुडे किलेमजकूर आपण आपल्या आत्मसतोसे लिहून दिधले ऐसे जे आपण दुकळाकरिता बहुत भोईस पडिलो खावयास काही नाहीं दुकाळ मोठा काहार पडिला याकरितां आपणास कोण्ही वाणी वेव्हारा नव्हे मग आपले दुढीने आपली मोकदिमी मौजे- मजकुरीची निमेपैकी तकिसीम निमे तुह्मास किमती होन २२॥ साडेबाविसास तुह्मास विकत दिधली आहे तुह्मी सदर्हू पैकी दिधले आपण आपली मोकदमी पैकी निमे मोकदमी तुह्मास लेकराचे लेकरी मिरासी करून दिधली आहे तुह्मी सुखे मोकदमी खाणे काळी व पांढरी व हक्कलाजिमा कुल बाब सारा गाव मोकदमी याची चौथी तकसीम तुह्मास मिरासी करून दिधली आहे यास कोन्ही आपला बापभाऊ व दाईज गोत्रज उभा राहील त्यास आपणे निवारावे मोकदमी देखील बाजार व कुल बाब हक्क खाणें हे लिहिले सही नागर व तश्रीफ व बाजे वडिलपणाचा मानमोहर कुल बाब तुह्मास दिधले हे लिहिले सही (निशाणी नांगर)
गोही
बिदस्तुर विसाजी रंगनाथ नाईकवाडी चा किले मजकूर
देसकुलकरणी किलेमजकूर दिनकरराऊ लखाजी नाईक
हमशाही मोकदम गावगन्ना
(नि. नांगर) मौजे निरगुडे
जानोजी मोकदम का। कलस रामाजी बिन राजजी निमे
(नि. नांगर) मोकदम
बहीरजी मोकदम मौजे सेलगांव
किले मजकूर (निशाणी नांगर) हरि सोनेदऊ कुलकर्णी
माउजी व बाबाजी मोकदम
मौजे काझड (निशाणी नांगर)
बहीरजी मोकदम मौजे लाकडी
(नि. नांगर)
बालोजी मोकदम मौजे निंबोड
(नि. नांगर)