[ १७ ] अलीफ . २४ फेब्रुवारी १६७०.
आपले बराबरीचे राजांत श्रेष्ठ, सर्व उमरावांत थोर, श्रेह व विश्वास यांस योग्य, महत्कृपेस पात्र, पूर्ण लोभांत घेतलेले, राजे शिवाजी याणीं जाणावें की :- आमचा बहुत लोभ तुह्मांवर आहे. याजकरितां तुमचा सर्व मजकूर हुजूर लिहिल्यावरुन तुह्मांस राजेपणाचा किताब दिल्हा असे. या गोष्टीचा सत्कार मानून, पेशजीपेक्षां अधिक काम करुन दाखवावें. ह्मणजे सर्व मनोरथ पूर्ण होतील तुमचे कार्याविशीं विनंति लिहिली आहे तोही बंदोबस्त यथास्थित घडोन येईन खातरजमा ठेवावी आणि बादशाही लोभ आपणावरी आहे असे समजावें. छ ५ माहे सवाल सन ११ जुलूस, मु ।। सन १०८० हिजरी.