लेखांक ४४२
१५८० पौष शुध्द ४
मशहुरल हजरती राजश्री गोजो बापूजी हुदेदार व मोकदम मौजे कल्हेट पा। चाकण सु॥ समान खमसैन अलफ कृष्णभट ब्रह्मे का। चाकण ठाण एउनु मालूम केले जे आपले जोतीस मौजेमजकुरीचे मिरासी ऐसीयास आपण खंडोबा ब्राह्मण मौजे माहाळुंगे पा। मा। त्याचे सांभाळी केले होते त्याने बानुभट सेरखुंडीकर याचे हवाला केले ऐसीयास त्याने जोतीस व कुलकर्ण हि केले साल मजकुराकारणे आपण चालवीन या कारणे गावास जाउनु बाबाजी नारायण गावी ठेऊन आलो त्यास बानुभट हरकती करितो ह्मणौनु तपसीलवार मालूम केले तरी कृस्णभट आपली मिरास आहे जो ब्राह्मण ठेवितील त्यापासुनु कुलकर्ण व जोतीस घेणे बानुभट हरकती करीकरील तरी ठाणेयास पाठविजे छ २ रबिलाखर व याचे घरवाव आहे पहिले ब्राह्मणी यास दिधला आहे तो यास दुमाले कीजे मोर्तब सुद ता। घेउनु असेली फिराउनु दीजे मोर्तब