पत्रांक २५२
श्री.
१७०१ पौष वद्य १४
राजश्री फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर गोसावी यांसी.:--
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो महादजी शिंदे रामराम विनंति. उपरी. येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहित अतिलें पाहिजे विशेष. आपणाकडून राजश्री नारायण गोविंद जामगांवचे मुकामीं आले. यांणीं कित्येक आपणाकडील घरोब्याचे अर्थ सांगितले. त्याजवरून कळलें. ऐशास पूर्वीपासून आपला आमचा स्नेह चालत आला आहे. त्याच प्रों पुढें चालावा, हेंच आमचें मानस आहे. त्यास, सांप्रत गुजराथप्रांतें इंग्रज यांणीं दंगा केला आहे. त्यांचें पारिपत्य करणें प्राप्त आहे. येविशीं मुजरत आपणाकडे पत्र पाठविलें आहे. व हालीं मारनिलेस सांगितलें आहे ते आपणांस लिहितील, आह्मीही दरमजल येत असों. आम्ही येऊ तोपर्यंत आपण दम धरून, ठाणीं जतन करून, शत्रूचे पारिपत्यास शेह द्यावा. त्याचा पराश्रम होऊ देऊं नये. आपणास सामील व्हावें, ह्मणून चिरंजीव राजश्री भनिरथराव शिंदे यांस लिहून पाठविलें आहे. आजपर्यंत आपण सरकारचें लक्ष राखिलेंच आहे. त्याचप्रों पुढें सरकारउपयोग करून दाखवावा. वरकड इकडील अर्थ आपणासीं दुसरा नाहीं, हें मारनिले लिहितील. पन्नाससाठ तोफा समागमें आहेत. ह्या दरकुचांत लांब मजलींत चालत नाहींत, याकरितां पंचवीस तोफा समागमें घेऊन, वरकड तोफा मागें ठेविल्या. मागाहून येतील. तूर्त पंसवीस तोफा थोर लहान बराबर घेतल्या. त्यासुद्धां जलदच येऊन पोहचतों. तों पावेतों इंग्रजांस ठासून राखावें. वर्तमान वरचेवरी कळवीत जावें. रा छ २७ मोहोरम. बहुत काय लिहिणें? लोभ किजे हे विनंती. मोर्तबसूद.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)