[ ३७ ]
हकीकत अदकार तपे सोनवळ वतन राजश्री रामचंद्र नीळकंठ भारद्वाज गोत्री याचे मूळपुरुष-
निळो नारायण १ नारोपंताचा पुत्र सोनाजीपंत ३ निळोपंताचे पुत्र राजश्री रामचंद्रपंत ५ |
त्याचा पुत्र नारोपंत २ सोनाजीपंताचा पुत्र निळोपंत ४ |
करीना वतनाचा. बेदरीं पातशाहा होते तेथे निळोपत कयाळनिशी करीत होते त्यांस पातशाहानीं तपेमजकूरची ठाणेदारी व मजम दिल्ही. महालास येऊन वरीस दोन वरसें अंमल केला त्यास, तपे मजकूरचा अदकारी महाद परभू होता. त्यावर कसाळा पडला याकरितां वतन विकावया गेला. मग कोणी न घेत. तेव्हा निळोपतीं शालिवाहन शके १४४५ चवदाशे पचेचाळिसावे शकीं नख्त टक्के १३००० तेरा हजार देऊन वतन खरेदी केलें. वतनाचा अंमल चालविला त्यास, मागती हुजूर मोसबा घेऊन येणें ह्मणून हुजरून हुकूम आला त्यास, येतेसमयीं कळोपंत बिन नागोजीपत भारद्वाज गोत्री ह्मणून ब्राह्मण होता बरा, लिहिणार ह्मणोन यारेदी सांगून ठेविला होता त्यास, आपण हुजूर गेले ते समयीं वतनाची देखरेख यासी सागितली त्याचा वंश पुरुषः-
कळोपंत बिन नागोजीपंत रामांजीचा लेक मुरारपंत |
कळोपंताचा पुत्र सोमाजीपंत २ मुरारीस संतान नाहीं. मग सोमाजी कळो याचा भाऊ गोविंद होता त्याचा पुत्र रामाजी गोविंद, परंतु पिढी १ मुरारीचा लेक भानजी ५ |