पत्रांक ५९१
श्री म्हाळसाकांत. ( नकल. )
१७२४ श्रावण शुद्ध १३
वेदशास्त्रसंपन्न राजश्री रामचंद्र दीक्षित व लक्ष्मीनारायण दीक्षित गोसावी यांसीः-
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो येशवंतराव होळकर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. खानदेशप्रांतीं खांसा स्वारी आल्यावर, पुढें राजश्री फत्तेसिंगराव माने वगैरे फौजा याप्रांतीं रवाना जाल्या. जनवार्ता सैन्याचा उपद्रव ! यामुळें कायगांव, टोंकें, प्रवरासंगम तिरस्थळी क्षेत्रांची जागां ब्राम्हणांस भय उत्पन्न जालें. सालगुा। क्षेत्र कायगांव पेंढारी यांनी लुटलें. त्यामुळें भय अधिक उत्पन्न जालें. त्यावरून क्षेत्रस्थ ब्राम्हण श्रीफल घेऊन मान्याच्या भेटीस पुण्यस्तंभी गेले. त्यांनींहि अभय दिल्हें जे, आम्हांस येविशीं सुभेदार साहेबांची आज्ञा आहे जे, क्षेत्रास उपसर्ग देऊ नये. त्यावरून सर्वांस संतोष जाला. हाली राजश्री नबाब अमीरउद्दोले फौजेसुद्धां कसबे गांडापूर येथें आले. आंबडाकडे स्वारी जाणार. त्यांजकडील उपसर्ग क्षेत्रास किमपि लागला नाहीं. माने थांणीं खातरी केली, त्याप्रों अनुभवास सर्वांच्या आलें. पूर्वापार कैलासवासी थोरले सुभेदारांपासून या स्थळाचा अभिमान आहेच, त्याप्रमाणें सांभाळ करालच. आम्हांकडील गांडापूर परगण्यातील तीन गाव व नेवास परगण्यातील एक गांव, ऐ। च्यार गांव आहेत. आज पांचसाहा वर्षे पायमालीनें खराब जालीं. त्यांस, त्यांचें व तिरस्थळीचें संरक्षण घडावें, याकरितां नवाबास पत्र दिल्हें पाहिजे, म्हणोन विस्तारें लिहिलें तें कळलें, ऐशियास, तुम्हांकडील लक्ष्मण उमाजी यांजबराबर राजश्री अमीरुद्दौले यांजला पत्र पाठविलें आहे. हें त्यांजकडे पावतें करावें. गांवांस उपद्रव देणार नाहींत. सर्वदा पत्र पाठवन संतोषवीत जावें. रा। छ ११ रबिलाखर, सु। सलास मयातैन व अल्लफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति मोर्तबसुद. सिक्का.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)