पत्रांक ६०६
श्री.
१७२४ आश्विन वय २
राजश्री नारायणराव गोसावी यांसी:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाबूराव आंगरे वजारतमाब सवाई सरखेल रामराम विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असावें, विशेष, तुह्मीं पत्र राजश्री ज्यगंनाथपंत यांजबराबर छ ५ राखरचें पाठविलें तें छ १३ जमादिलोखरीं पावलें, गांव व मडीविसीं मार लिहिला त्यावरून व राजश्री बळवंतराव नेने यांणीं पत्र पाठविलें त्यावरून, कळों आला. ऐशास तुम्हांकडून बहुत दिवस पत्रें येऊन कांहींच मजकूर समजल्यांत नव्हता. त्यास हाल्लीं मारनिल्हेनीं मुखोत्तर सांगितलें, त्यावरून अवगत जालें, ऐसेंच हमेषा पत्र पाठऊन आनंदवीत असावें. गांव व मडीविसी लिहिल्यांत, त्यांस तुमच्या स्नेहापुरता दुसरा अर्थ काय आहे ? घडोन येईल. वरकड मार मशारनिल्हे लिहितील त्यावरून कळेल. रा छ १५ माहे। जमादिलोखर बहुत काय लिहिणें ? लाभ कीजे. हे विनंति. श्री मोर्तबसुद.
श्री ९ राजा शाहु नरपती चरणीं सादर येसाजीसुत बाबूराव आंगरे वजारतमाब सवाई सरखेल निरंतर.