रायाजी मल्हार याचे मनात पश्चात्ताप येऊन सांप्रत त्याचें अनुसंधान आलें कीं, आपणावरी मातुश्री साहेब दया करितील, पूर्ववत् आपल्या हातें सेवा घेतील, तरी आपण सुभानजी आचेले यासहवर्तमान निघोन त्या प्रांतें जातों, आपल्याकडे दिवाणची हमी आहे ते माफ करावी, व वरातदाराचे गैरादे आहेत त्याचें त्वष्ट न लावावें, पुढें मन पूर्वक दया करून सेवा घ्यावी, ये गोष्टीचा निर्वाह जालिया लिहिल्याप्रमाणे कार्य करितों ह्मणून त्यावरून त्याच्या मुद्याप्रमाणें मात्र करून समाधानपत्रें त्याकडे पाठविलीं आहेत. परंतु जाले वर्तमान साहेबास विदित व्हावें ह्मणून लिहिलें आहे, ह्मणून लिहिलें तें विदित जालें. राजश्री रायाजी मल्हार यास समाधान पत्रें पाठविलीं, उत्तम केलें ते आचेले देखील निघोन जाऊन निष्ठेनें सेवा करूं लागले, तरी सर्व प्रकारें त्याचें चालविले जाईल. परंतु आतां येवढ्या आठ चौ दिवसांत गेल्यानें कार्याचें. पुढे छावणीस लष्कर जाईल ते समयीं जातों ऐसे ह्मटलियानें लटिकें अनुसंधान ऐसें दिसोन येतें याकरितां ज्यांणी राजकारणें लाविलीं आहेत त्यांणीं, जोवरी तुह्मीं शाहूराजा रांगणेयाखाले गोऊन पाडिला आहे या संधीमध्ये ज्याणीं निष्ठा धरिली आहे, त्याणीं कार्ये करून द्यावीं, ह्मणजे तुमच्या प्रयोजनाचीं आहेत. पुढे तुह्मीं शाहूस पराभवाते पाविलियावरी कोण येक शरण येईना. याकरितां तुह्मीं ये गोष्टीची चौकशी करून, ज्यास जें सांगून पाठविणें तें पाठवून त्वरा होय तें करणें. परकी माणूस राजकारणास येईल ते गडावरी घेत नच जाणें कोणाचे हुनर कैसे असतात हें कळत नाहीं. याकरितां वरचेवरी गडाखालेच जाबसाल देऊन वजा करीत जाणें वरकड तुह्मी आपल्याविषयीचा अर्थ कितेक राजश्री बाळाजी महादेव यासी लिहिला तो सविस्तर विदित जाला घोड्याकरितां मातुश्रीची दया निदर्शनास आली, ह्मणून लिहिले, तरी आमची दया अगर लोभ तुमचे ठायी आहे तो घोड्यावरून अगर वस्त्रपात्रावरून तुमचे निदर्शनास यावा ऐसी गोष्ट नाहीं. तुह्मापेक्षां घोडी अगर आणखी प्रसंग विशेष आहे ऐसे नाहीं. ऐसें असतां तुह्मी घडी घडी मनांत सदेह करावा, हे गोष्टी उचित नाहीं. येविषयीं साहेबीं उदंड सांगितलें अगर लिहिलें तें तुह्मांस प्रमाण वाटतें ऐसें नाहीं. जे गोष्टी निदर्शनास येईल ते करणें. याउपरि त-ही नि.सदेह होऊन राज्याभिवृद्धीस प्रवर्तले आहा, त्याप्रमाणें प्रवर्तोन संतोष पावणें. आह्मांस तुह्मापेक्षा दुसरें वश्यक आहे ऐसें नाहीं. सर्व राज्यभार तुह्मांवरी टाकिला आहे. श्रीदयेनें तुह्मांस यश येतच आहे जाणिजे छ १९ मोहरम. बहुत लिहिणें तरी तुह्मीं सुज्ञ असा.
लेखन
शुध.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)