पत्रांक ६३७
श्री.
१७२५ चैत्र वद्य ६
रायाविराजित राजमान्य रा गगाधरपंत तात्या यांप्रति शुभचिंतक परशराम बापू धर्माधिकारी आशीर्वाद उपरी. तुह्मांकारणें खरबुजें दिलीं मण, व धडे, शेवद वे डांगेर, ऐसीं तरकारी गाडा एक भरून पाठविली आहे. ते घेऊन पावलियाचें उत्तर पाठवावें, बेलापुरीहून यशवंतराव होळकर यांचे कूच होऊन पुणतांब्यास गेले, ह्मणून वाटसरांनी सांगितले. खचीत बातमी आलियावर मुजरद लिहून पाठऊं. गांवचे वर्तमान आज ता यथास्थित कडवल लोकसुद्धां. असें बाजारवदंता ऐकितों कीं, माने वगैरेंस फिरंगियानें अडविलें, सबब होळकर माघारा जाणार, ह्मणून ऐकिली वार्ता लिहिली. सत्यमिथ्या देव जाणे, खरबुज वगैरे तुह्मीं आपले घरींहि कांहीं द्यावी. वरकड सरकारांत द्यावीं. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद. चैत्र वा ६
सेवेसी राणूजी हवालदार याचे रामराम, लिा परिसोन कृपा निरंतर असों द्यावी. हे विनंति.
स्नो रामचंद्र रावजी सां नमस्कार विज्ञापना ऐसिजे: लष्करची गडबड अमळशी स्वस्थ जाली ह्मणजे, चिरंजीव शेवेसीं येतील. पुणतांब्याहून कूच जाहलें, ह्मणजे घोर वारेल, तों पावेतों तिरस्थळीचे लोक भयामितच आहेत. श्रीकृपेनें सर्व उत्तमच घडेल. कळावें हे विनंति. ता। कलम, कागद कोरा अगदी येथें मिळत नाहीं. अर्धा दस्ता तरी अगत्य पाठवावा. हे विनंती.
श्रीमंत मातुश्रीस सां नमस्कार.