[ ११३ ] श्री. १७३०.
श्रीमंत राजश्री पंत अमात्य हुकमतपन्हा स्वामीचे सेवेसी - विनति सेवक द्वारकोजी यादव कृतानेक विज्ञापना विनंती स्वामीचे दयेनें वर्तमान यशास्थित असे विशेष आपण पत्र पाठविलें तें श्रीमंत सकळसौभाग्यादिसंपन्न मातुश्री बाईस हेवांस विदित केलें. त्याचें प्रत्युत्तर पाठविलें आहे. त्यावरून अभिप्राय कळों येईल. मुख्य गोष्ट स्वामी थोर आहेत, आणि आह्मीं सामान्य सेवक, असें असोन आह्मांस खोल पाण्यांत घालावयाचें नव्हतें. यद्यपि ही थोरपणें स्यामींचीच आहेत त्याचें निदर्शन कीं, आपला कोणी भला माणूस कारकून विश्वासूक इमानीइतबारी व विनंतपत्र ऐसें हुजूर पाठवून द्यावें. येथील मर्जीमाफक स्वामींनी वर्तणूक करावी. बोलल्या वचनाप्रमाणें कार्यभाग घडोन हें यश स्वामींनीं आह्मांस द्यावें, नाहीं तरी वारंवार स्वामीकडील पत्रे येतच आहेत. एकवेळ मल्हारी आला. दुसरे खेपेस दुसरा माणून पाठविला, असे असतां धन्यास तरी कोणप्रकारें अर्ज करावे ? मुख्य गोष्ट, धन्याचे पायाशीं निष्ठा धरून आणि आपलेंसें करून घ्यावें यांतच उत्तम, लौकिकही बराच आहे. याउपरि स्वामींनी दुसरें तिसरें कांहीं ह्मणों नये. धन्याचे पायाशी दृढ निश्चयें मिठी घालावीं. त्याणीं तुमचे सर्वप्रकारें चालवावें. येणेकरून उभयपक्षींही बरें दिसतें नाहींतरी तुमचें विनंतिपत्र हुजूर येणें तें आह्मां लघु मनुष्यास स्वामींनीं गौरव दिल्ह्यासारिखा आह्मांस यश द्यावें कारकून विश्वासू इमानीइतबारी ऐसा सत्वर पाठवावा विलंबावरी घातल्यानें एक प्रकारें दिसतें. इतके दिवस झालें तें झालें याउपरि स्वामींनी विलंबावरी घालावें ऐसें नाहीं. स्वामीचें वचन ह्मणजे शापादपि. शरादपि ऐसे आहे. आह्मांस यश देऊन धन्याची तुमची गोडी होय तो अर्थ करावा. विशेष लिहावें तरी स्वामीस मानमार्ग न कळेसा काय आहे ? जेणेंकरून लोकोत्तर यशकीर्ति आह्मां लघु मनुष्यास सांगितल्यास सागितल्यासारिखें घडावें हे उत्कठा आहे. यश दिल्हें पाहिजे हे विज्ञापना याउपरी जे पूर्वी झालें तें उत्तमच झालें. जरीकरितां आपले विचारे गोडी करावी असें असले तरी पत्राचें उत्तर व कारकून ऐसें सत्वर पाठवावे. नाहीं तैसें पत्राचें उत्तर पाठवावें, ह्मणजे आह्मासारख्याची स्थित राहील आधींच आमची इजत थोडकी ते रक्षिलियानें बरें यास्तव साफ जाब सत्वर पाठवावा दिवसगत लावावीशी नाहीं. तथापि हा विचार न होय तरी, आपण सरकारकून, हे धनीच आहेत, तेथे आह्मीं काय ल्याहावे ? हे विज्ञापना.