श्री
भाद्रपद शु. ८ शुक्रवार शके १७१५.
श्रीमंत राजश्री----- रावसाहेब स्वामीचे
सेवेसीं----
विनंति सेवक गोविंदराव कृष्ण कृतामेक सा नमस्कार विनंति, विज्ञापना. ता छ २६ माहे सफरपर्यत मु बेदर येथें स्वामीचे कृपावलोकनेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान पेशजी डांकेवर ता बार विनंति लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल. सांप्रत येथील वर्तमान अलाहिदा पुरवणी पत्रीं सेवेसीं विनंति लेहून पत्राची रवानगी केली असे, त्यावरून अवलोकनांत येईल. उत्तरें रवाना करावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.