[ १२६ ] श्रीरघुवीर. १७३१.
राजश्री रघुनाथ देव यांसी आज्ञा केली ऐसी जेः-
शिवराम नामकासमागमें येथून रकारनामक व मकारनामक पाठविलें आहे याबरोबर कितेक लग्ननिश्चयाचा निर्वाह सागोन पाठविला आहे. तो चित्तांत ऐकोन त्याप्रमाणें तुह्मीं निर्वाहरूप याबराबरी सांगोन पाठविणें. रकार व मकारनामक येथें येऊन सांगतील ह्मणजे आह्मांस शरीरसंबध जाला ऐसें कळेल. मकारनामकाबरोबर बिल्वपत्र पाठविलें आहे तें घेणें. माणूस पाठविलें आहे हें सागतां कळेल. बहुत काय लिहिणें. आपण सुज्ञ असत १११११.