श्री.
भाद्रपद व. ९ शनिवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. तमाम मुतसदी मंडळी यांस दौलांनीं तगादा लावला आहे कीं सिलेदार लोकांची हजरी गणती करार वालाह नाहीं. ज्याचे शंभर स्वार त्याचीं घोडी पन्नास साठ असतां शंभराची तलब रोजमुरे वगैरे सरकारातून घेतले. त्यांत सिलेदारास जितकीं घोडीं तितकाज यैवज दिल्हा. बाकी मुतसदी व हाजरीचे चोपदार यांनीं मिळोन तफावत केली याचा येकदोन पतालाऊन इ आपण कारभार करीत आल्या दिवसापासोन याचा हिसेब समजावणें, या प्रा तसदी केली. हिसेबास पाहातां कशास कांहीं मिळेना. लाखोंचाच पेंच. सबब याची नजर ठरऊन घ्यावी यैसें बोलणें मुतसदी मंडळीचें पडलें. त्यावरून साडेबावीस लाखाची तफरीक ठरली. राज्याजी व भारमल छटुलाल अदिकरून सर्वांवर हिसेरसीद प्रा वांटणी जाली आहे. परंतु याचाही निश्चय नाही. याजवर आणिक काय ठरतें ते समजल्यानंतर याची विनंती मागाहून लिहिण्यांत येईल, रा छ. २१ सफर हे विज्ञापना,
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)