श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. हरबाजी नाईक बिडवई याचे दुकान औरंगाबाद व हैदराबादेंतील व येथील तिन्हींही जप्त करून लोकांच्या ठेव्यासुद्धां रोकड व वरत व जी कापड चिजवस्त सुद्धां यैवज घेऊन मारनिलेचा यैवज ज्याजकडे येणें तो व ह्याचे दाखल्याने निवडून काहाडोन ज्याजकडे यैवज त्याचे मागें चौपदार लाऊन बै मुरवतीनें कितेकांपासोन यैवज घेतला, व घेतात, इतकेंही होऊन हरबाजी नाईक यांचा पुतण्या व स्त्री व त्रिंबक नाईक वगैरे गुमास्ते यांची सुट. का नाहीं. साडेबारा लक्ष माथां आहेत. त्यांपैकीं हा यैवज जो जमा होईल तो घेऊन बाकीचाही फडच्या त्यांनीं करावा. तेव्हां मुक्तता. हैदराबादेतील गुमास्ते वह्यांसुद्धां आणिले आहेत. ह्याची रुजुवात येक येकाची होत आहे. मोठा घोळ घातला. तसेंच लक्ष्मीचंद साहुकार यांजकडे अपराध नसतां वित्तविषय पंधरा सोळा हजार पर्यंत जिंदगी सरकारांत घेतली. हालीं कृष्णमा करोडे याचा यैवज कोणे साहुकारापासीं काये तो सांगणें व मुचलके लेहुन देणें. याप्रा तमाम साहुकारांस तगादा केला. याचें काय होतें तें पाहावें. सर्वांवर गजब जाला आहे. निर्व्हा नाहीं. र॥ छ. २४ जावल हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)