श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५, ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. चेनापटणाहुन व्यंकटराम दिला याजकडील दोन अखबारां आल्या,त्या पा।। आहेत. राजश्री गोविंदराव भगवंत सेवेसीं प्रविष्ट करतील, अवलोकनें मा।।र ध्यानांत येर्ईल. उत्तराविषीं आज्ञा व्हावी, र॥छ. माहे जावल हे विज्ञापना.
श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. राजश्री माहादजी सिंदे यांस नवाबांनी पेशजी देन च्यार वेळां यैवज येथुन हुंड्या वरचेवर पाठविल्या. येविषींची विनंती राजश्री नाना यांनी सेवेसीं केलीच असेल, बाबाराव गोविंद इकडुन गेले ते समईंही दाहा लाखाच्या हुंड्या त्यांचे बराबर र।। जाल्या. सांप्रत पांच लक्षांच्या हुंड्या राव सिंदे यांजकडे पाठवावयाकरितां यांनीं तयार केल्या आहेत. लौकरच रवाना होतील. यैसें वर्तमान यैकण्यांत आलें, मागती याची तहकीक करून लिहुन पाठवितों. र॥ छ. २४ जावल हे विज्ञापना.