श्री.
चैत्र शु. १३ गुरुवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. अदवानीस नवाबांनी मुस्तकीमजंग यांस मोजदाद कन पाठविण्याकरितां रवाना केले. त्यांनी जाऊन मोजदाद खजाना व नगदी, जवाहीर, सोने, रुपें, हाथी, घोडे, पागा, रथ, हत्यारे सुधां मोजदाद करुन याद पाठिवली. चौपन्न लक्ष रोकड, सिवाय साने, रुपें व जवाहिर दागिने, घाइ। पागेचीं येकंदर चौदासे; पैकी सातसें सरस व सातसे निरस, हाथी पस्तास, तोफा वगैरे कुल आसबाब अदवानी व रायचूर संस्थानचा तीन करोडीचा मालयत लिहिली आली. रायचूर येथे सिबंदी मोहबतजंगाकडील स्वार व पागेचे बारगीर व गाडद व प्यादे यांनी रायचुरचे किल्याचे दरवाजे बंद करुन गोळी वाजवितात. तलबेचे ऐवजाचा फडशा जाल्यासिवाय किल्याचा दखल देऊ नये, अस अटा बांधिला आहे. हे वर्तमान आल्यावरून येथून यांनी असद आलिखान यास त्यांचे जमियत सुधां व बराबर मुसारेहमुकडील गाडद येके हजार देऊन रवानगी छ ११ साबानी केली आहे. व्यंकट सुरापुरकर यांस ताकीद गेली आहे की तुह्मीं अमद अलीखान यांस सामिल होणे. खान मार कुच करुन येथुन छ मारी गेले. रा छ १ १ हे विज्ञापना.