श्री.
चैत्र शु. १२ बुधवार शके १७१५.
छ १ ते छ, १० साबान पावेतों नवाबाची मामुली अखबार,
श्री.
चैत्र शु. १२ बुधवार शके १७२५.
श्रीमंत राजश्री-------------रावसाहेब
--स्वामीचे सेवेसीं-------------------
विनंती. सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सां नमस्कार विनंती विज्ञापन ता। छ १० माहे सावानपर्यंत मु। जनवाडा येथे स्वामीचें कृपावलोकनेकरुन सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. सरकारांतुन छ २६ माहे जमादिलावरची पत्रे, नवाबाचे पत्राचा जाब-इंग्रज प्रकर्णी दफातीचा सहित रवानगी जाली. ती पत्रे छ ४ रजब पावली आज्ञेप्रो खरीतापत्र प्रविष्ट करून यासंबंधे मजकुर यांस बोलण्यात आला. सरकारचे थैलीपत्राचा जबाब मागितला. तजवीज ठरून तयार करवून देवितों ऐसे बोलिले. त्यास त्याजवर इकडून जबाबविषई निकड केली नाहीं. जबाब लौकर घेऊन पाठविण्याची आज्ञा आल्यास निकड करून जबाब घेऊन रवाना करीन. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.