श्री. चैत्र शु. १२ बुधवार शके १७१५
श्रीमंत राजश्री-------------------राव
माहेब स्वामीचे सेवेसीं......................
विनंती. सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती विज्ञापना. तो छ १० माहे षाबान मुकाम जनवडी येथे स्वामीचे कृपावलोकनेकन सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. सरकारांतुन छ १६ माहे रजबचें पत्र सादर जालें तें छ २६ माहे मारीं पावले. त्यांत माहादजी सिंदे यांस आठ दहा दिवस पर येत होता. नंतर वायूची भावना होऊन माघ शुदः प्रयोदशी प्रहर रात्री देवाज्ञा जाली. सरकारचे पदरचे मातबर सरदार होते, ईश्वरी इच्छेस उपाय नाही. ह्मणोन आज्ञा. ऐसियास यासंबंधे नवाबास सरकारचे थैलीपत्र होते ते नवाबांकडे मी जाऊन प्रविष्ट केले. पत्र वाचून पाहिल्यानंतर नवाबांचे बोलण्यांत आलें कीं ६ माहादजी राव सिंद राव पंत प्रधान यांचे सरकारचे मातबर उमदा सरदार, हिंदुस्थान प्रांत कामेही मोठी मोठीच अंमलांत येऊन बंदोबस्त खातरखा केला. असे मनुष होणे दुर्लभ ! याप्रो बोलले. सिंदे यांचे नातु दौलतराव, त्यांस त्यांचे दौलतीची बाहाल सर्फराजी सरकारांतून होउ! याचा मार नवाबांचे पत्र होता, तो पाहून बोलले की बाहाली सर्फराजी होणे उचित आहे. सिंयांची बहुत तारीफ नवाबन के, नंतर बोलले की “ नजर घेतल्याशिवाय सर्फराजा केली हे मोठी गोष्ट केली. याजवर मी उत्तर केलें नोकर खाविंदाचे कामावर ज्याफिषानी करुन चाकरी करत त्या नोकराचे मुलाची सर्फराजी खाविंदांनीं न केलीयास मग खाविंदी ती काय? दुसरे नोकराचा दिल साहेबचाकरीस कसा वोदेल! वावि (द) आपले नोकरास लेंकराप्रमाणे संरक्षण करितात ही नजर आहे। अणोनच नौकर ज्याफिषानी करावयास हजर आहे. श्रीमंताचे सरकारची हमेषापासून ही चाल आहे ऐसे खचून बोलिलों, याजवर नवाब थोडेसे कळत न कळत बसून बोलिले की तुह्मीं बोलती हैं दुरुस्त आहे. रा छ, मार सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.