[ १७१ ] श्री. २६ जानेवारी १७४५.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ७१ रक्ताक्षी नाम संवत्सरे माघ शु।। ५ मंदवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहूछत्रपति स्वामी याणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री भगवंतराव पंडित अमात्य हुकमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसी जेः -
जिरंजीव राजश्री रामराजे बावडेयासी तुह्मांजवळ आहेत ह्मणून तीर्थस्वरूप महाराज मातु श्री काकी साहेबांनीं स्वामीजवळ सागितलें. त्याजवरून आह्मीं राजश्री भगवंतराऊ नहरही दफ्तरदार दी ।। मजमू यासी पाठविलें. त्याणीं तुमची भेट घेऊन चिरंजीवास पाहून आले. सकलअर्थ कळविला. त्याचें तुमचें बोलणें होऊन राश्री सदाशिवराम पंडित यास गुप्तरूपें तेथें तुह्मीं पाठविलें आहे. त्यास तीर्थस्वरूप मातु:श्रीसाहेबांचें विद्यमानें राजश्री गोविंदराव खंडेराव चिटणीस याणें भेटोन दोन तीन वेळां त्यांशी बोलणें ठरविलें त्याप्रमाणें चिरंजीवास पानगांवीं पाठवून द्यावें. तिकडेही सूचनेस भगवंतराव पाठविले जातील येथून तुह्मांकडे शिवराम पंडित यासी व मग गोविंदराव यासी पाठवावे असें ठरलें आहे. त्यास मागाहून पाठविले जातील. भगवंतराव दप्तरदार यासी पानगांवीहून नेहमी इकडे व तुम्हांकडे येण्यास जाण्यास आज्ञा केली आहे शिवराम पंडित यांणीं स्वामीसन्निध विनंति केली कीं, आमचा जिल्हा जातीचा सरंजाम व वतनें व इनामगांव व कुलअकत्यार लिहिण्याचा दरख पूर्वी चालत आल्याप्रमाणें चालविला जाईल, याप्रमाणें स्वामीचें वचन आलें, परंतु आमचा जिल्हा स्वामीनीं प्रतिनिधीस दिल्हा, प्रधान पंडिताकडे मोठे मोठे गांव गुंतले , व दरकाचें लिहिणें ठाई ठाई होतें, महादाजी गदाधर यासी स्वामीनीं मजमू सांगितली आहे, त्याणें दरख राहिला नाहीं, आह्मीं पेशजी आलों ते समयीं स्वामीनीं मजमू व छंदोग्य अमात्यपद आह्मास देऊन ठेविलें, इतक्यांत श्रीमंत राजश्री आबासाहेबीं येऊन स्वामीस विनति केली, तेव्हां स्वामीनीं त्याजपासून शपथ घेऊन त्याचे स्वाधीन केलें, त्याप्रमाणें त्याणीं पुन्हा आह्मांस इकडे येऊदेखील दिल्हें नाहीं, असे पुढें जाहलें, तरी आमचा सेवकाचा परिणाम काय ? त्याजवरून मातु श्रीसाहेबांचे पायावर हात ठेऊन श्रीबालकृष्णजीचीं व श्रीअंबाबाईचीं फुलें तुळसी शिवराम पंडित अमात्य याचे हातीं दिल्हीं तीं तुह्मीं घेणे. त्याचीही शपथ स्वामीनी घेतली आहे प्रतिनिधीकडे तुमचा जिल्हा उत्तम आहे त्याचे मुबदला मिरज तालुका व चिरजीव कुसाजी व येसोजी भोसले याचा तालुका व गाव खेडीही मोबदला दिल्हीं जातील जुनेरचें सरदेशमुखीचें वतन तुमचें तुह्माकडे चालविलें जाईल. व शिवराम पंडिताची स्त्री सौभाग्यवती दुर्गाबाई याणीं रामराजे यासी फार फार जपून संरक्षण केलें ह्मणून कळलें त्यास दुर्गाबाईस साडीचोळीबद्दल प्रांत क-हाड येथील सरदेशमुखीचें वतन, स्वामीचें आहे तें , तिजला इनाम करून देऊन चालविलें जाईल तुमचे पूर्वी लाख रकम मजमू व मजमूकडील मुतालकी, फडणिसी व सरदप्तरदारी वतनी आहे, त्याप्रमाणें करून दिल्हे जातील. महादाजी गदाधर याणीं दरबाराची जुनी राहटी राखिली नाहीं यामजुळे पायमाली आहे, तशी पुढें होणार नाहीं स्वामीनीं शपथपूर्वक मारनिल्हेजवळ दिल्ही आहे तुह्मीं कोणेविशीं संशय न धरणें. तुमचें उर्जित स्वामी करितील संपूर्ण राज्यांतील मजमूं व फडणिशा व दप्तरदा-या व किल्लेच्या जिल्हेच्या सबनिशा पेशजीपासून वतनीं तुह्मांस दिले आहेत, त्याप्रमाणें स्वामी चालवितील जाणिजे छ ३ जिल्काद सु।। खसम अर्बैन मया व अलफ.
मोर्तबसूद.