लेखांक १७३ श्री
श्रीशिवभक्तपरायण तपोनीध भवानगीर गोसावीयासि प्रती वजश्री राजा शिव छत्रपति उपरि तुह्मी पत्र पाठविले ते प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला मौजे इडमिडे गाव इनाम आहे त्यास पूर्वी ताकीदपत्रे दिल्ही परतु माहालीचे कारकून व इत्यादीक उपसर्ग देता राहात नाही मिरासपटीचे रोखे करिताती यामुले आपणास टका भर सुरलीत चालत नाही तरी येविशी पारपत्य केले पाहिजे ह्मणोन लिहिले ते विदित जाले ऐसीयास हाली तुमच्या लिहिल्यावरून देशाधिकारीयास व पांडवगडकरीयास व लस्करच्या लोकास ताकीदपत्रे पाठविली आहेती व गावास ही आज्ञापत्र दिल्हे आहे देऊन गावीचा वसूल घेऊन गोसावियाच्या मठा जवल अन्नछत्र चालवीत जाणे याउपरी माहालीचे व इत्यादीक काही उपसर्ग होणार नाही आपले समाधान असो दीजे छ २४ रजब जाणिजे बहुत काय लिहिणे
बार