लेखांक २०० श्री १६५५ कार्तिक शुध्द २
मा। देशमुख व देशपांडे व समस्त जमीदार तर्फ पाल प्रांत चेऊल यांसि
बाजीराऊ बलाल प्रधान सुहुरसन अर्बा सलासीन मया अलफ राजश्री बाळाजी माहादेऊ व राजश्री कृष्णराऊ माहादेऊ व राजश्री रामचंद्र माहादेऊ याचे पुत्र नारो रामचंद्र जोशी शांडिल गोत्री याचे पिते माहादाजी कृष्ण यासि रा। शंकराजी पंडित सचिव याणी चदीस वेढा पडिला होता त्या समई फौजा देऊन पाटविले कष्टमशागत बहुत केली याजकरिता चंदीचे मुकामी मौजे खवली तर्फ मजकूर हा गाव पुत्रपौत्री जलतरुपाषाणसहित इनाम दिल्हा आणि पत्रे सादर केली त्यास, आजिपर्यंत मौजे खवली मशारनिलेकडे कुलबाब कुलकानू ऐवज पावत आहे तेथे खलेल करावे ऐसे नाही शामळ व सरखेल याचा गाव यासि सुरक्षित चालवितात, वसूलसारा गावचा याजकडे पावत आहे त्याप्रमाणे याजकडे पावेल तुह्मी त्या गावास वसुलाविसी अथवा वेठबेगारीकरिता उपद्रव न लावणे पुढे मशारनिलेस मौजेमजकूर सुरळित चालवणे दुसरा कोण्ही उपद्रव देईल त्यास ताकीद करीत जाणे सालदरसाल ताज्या सदेचा उजूर न करणे जाणिजे छ ३० जमादिलावल पा। हुजूर