लेखांक २०१ श्री १६७५ कार्तिक शुध्द १
वेदमूर्ती राजश्री गोविंद जोशी बीन रामजोशी बोरगांवकर गोत्र शांडिल्य सूत्र आश्वलायन वास्तव्य को। कल्याण गोसावी यांसि:-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सुहुरसन अर्बा खमसैन मया व अलफ तुह्मी हुजूर को। पुण्याचे मुकामी येऊन विनंति केली की आपणास अंगारकाने१ जमीन इनाम दिल्ही आहे गावगना बीघे
६ मौजे बार्हावे ता। अंबरनाथ प्रांत कल्याण येथे राजश्री मानाजी
आंगरे वजारतमाब याणी करार करून दिल्ही बीघे५ मौजे गोवेली ता। बार्हेटीवोले प्रांत भिवंडी येथें कैलासवासी सेखोजी
आंगरे याणी करार करून दिल्ही बीघे
-------११
एकूण अकरा बीघे जमीन इनाम करार करून देऊन पत्रे करून दिल्ही आहेत. सांप्रती अंगारकाकडील मुलूक सरकारांत आला आहे. तरी स्वामीनी अंगारकाच्या पत्राप्रमाणें चालवावें इ. इ. इ. छ ९ मोहरम. आज्ञाप्रमाण