लेखांक २०२ श्री १६८२ भाद्रपद वद्य ९
चिरंजीव राजमान्य राजश्री सदाशिव चिमणाजी यासि बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत गेले पाहिजे विशेष वो। राजश्री गोविंद जोशी बोरगावकर याणी हुजूर येऊन विदीत केले की मौजे गधारे ता। अंबरनाथ हा गाव निमे व मौजे गोवेली ता। बरे प्रात कल्याण पौ। जमीन बिघे ५ पाच येणेप्रमाणे जविधनकर मोगल याणी आपणास इनाम दिल्हा त्यास, जीवधनकराकडील जागीर सरकारात जपत जाहाली होती, तेव्हा सरकारचे पत्र सुदामतप्रमाणे चालवणे ह्मणोन कल्याणास सादर जाहाले त्याजवर सरकारातून जागीर जीवनधनकराकडे दिल्ही मोगलाने सुदामतप्रमाणे चालविले फिरोन जीवधनकिल्ला व जागीर सरकारात घेतली, तेव्हा सन समानामध्ये सुभाहून मागील कागदपत्र भोगवटा पाहून एकसाल चालविले त्याउपरि सन तिसापासून वसुलाचा तगादा चालविला आहे इ इ रा। छ २३ सफर, सु॥ इहिदे सितैन मया अलफ बहुत काय लिहिणे ? हे आशिर्वाद.