तकरीरकर्दे बो। नारायेणभट अध्यापक समस्त सभानाईक यासि लेहून दिल्ही तकरीर ऐसी जे भानभट गिजरे व मोरभट गिजरे उभयेता बोलिले की पत्रे आह्मास पावलीं भानभट बोलिले की मोरेश्वरभटी आपणापासी कागद मागितले मोरेश्वरभट बोलिले की आपणास पत्रे पावलीं पत्रे कशाची हे आपणास ठावकी नाहीत आपण स्वदस्तुरे काही गोही लिहिली नाही हे सत्य शोभकृत नाम सवछरे जेष्ट शुध प्रतिपदा भगुवासरे हे गोस्टी ईश्वर नाम सवछरीं जाहली उभयेता बोलिले मात्र पत्रे आपणादेखत भानभटी मोरेश्वरभटापासी दिल्ही नाहीत हे सत्य
येणेप्रमाणे उभयेतानी साक्षी दिल्ही बाकी दोघे निवर्तले त्याच्या साक्षी बहिरभट आफले याच्या अक्षरे दोघाची साक्ष आहे त्याचा पुत्र आहे तो रुजू करून देईल ह्मणऊन सदासिवभटी करार केला त्यावरून बहिरभट आफले याचा पुत्र मुकुंदभट आफले यासि सत्य घालूत करीना विचारिला ते बोलिले की हें वर्तमान आपणास काही विदित नाही परतु हे अक्षर आपल्या तीर्थरूपाचे ह्यणऊन श्रीकृष्णेमधे निघोन खरे करून देऊ ऐसे प्रथमचि बोलिले त्यास पचाइतानी विचार केला की हे साक्षी आणि येकायेकीच श्री त निघो ह्यणताती त्याचा विचार काये आपले बापाचे अक्षर जाहले तरी त्याचे हातीचे पुस्तक अगर आणखी कागद गावातील आणून रुजू करून ऐक्यता करून दाखवावे ऐसे न करिता श्री मधे निघो ऐसे बोलिले तेव्हा अप्रमाणतेची गोस्टी दोघे जिवत साक्षी आहेत त्या पैकी एकाने तो आपणास काही च ठाऊक नाही दस्तूर आपले नव्हे काहीच स्मरत नाही ऐसी साक्षी दिल्ही दुसरियाने साक्षी दिल्ही की कागद दिल्हे परतु कशाचे दिल्हे हे ठाऊक नाही आपणादेखत हि दिल्हे नाहीत साक्ष हि आपले अक्षरे घातली नाही ऐसे बोलिला त्यास दोघे जिवत साक्षी त्याचा विचार या प्रकारीचा याच्या तो तीर्थरूपाच्या अक्षराची साक्षी ऐसे आसोन प्रमाण करीन ह्मणऊन वदला तेव्हा पचाझ्तानी अप्रमाण करून निरोप दिल्हा ऐसे तिघे साक्षी याची बोलीचाली लेहून त्या उपरी त्रिवर्ग वधूचा शोध पाहिला तुह्मास आज्ञा केली की तुह्मापासी भाऊपणाचे कागद आहेत ते पचाइतास वाचून दाखवणे त्यावरून तुह्मी ती पत्रे बजिनस आसले आणून दिल्ही त्यात वाईकरभटाची समापत्रे तीन बितपसील
आनंदभटाचे नावाचे बाळंभटाचे नावाचे नारायेणभाटाचे नावाचे
पत्र येक १ पत्र येक १ पत्र १