लेखाक १२९
१७२२ आश्विन वद्य ७
श्री
श्री धूतपापेश्वरी जयति
श्रीमत् राजश्री रामकृष्णपत सुभेदार विजयदुर्ग स्वामीप्रति
आश्रित साग्निचित् सोमयाजी महेश्वरोपाध्याय तथा धोडदीक्षित ज्योतिषी व धर्माधिकारी व देशोपाध्ये अष्टाधिकारी तर्फ राजापूर कृतानेक आशिर्वाद विनती विशेष आपण पत्र पाठविले त्यात लिहिले कि केशव मोडक वस्ती सोलगाव याचा बापास कुणबी याणी मारिले हे केशव मजकूर यास पूर्वी समजले अस्ता बापास कळविले नाही सबब सर्कारात अटकेस ठेविला होता त्याची मोकळिक करून तुह्माकडेस पाठविला आहे तरि शास्त्रमते पक्तिपावन होय तो शास्त्रार्थ निवडून उत्तर पाठवावे आपले पत्राप्रमाणे उपाध्ये ज्योतिषी व
धर्माधिकारी याशि पत्र द्यावयास होयील ह्मणोन लिहिले त्यास शास्त्रमते करून केशव यास व्यवहारज्ञता आलि नाही षोडश वर्षांनतर व्यवहारज्ञता शास्त्रमते करून होत्ये तत्पूर्वी त्याचा व्यवहार अज्ञानकृत जाणावा मुख्य ब्रह्महत्या दोष मारणाराकडेस आहे केशव याजकडेस अनुमति दोष आहे तोहि अज्ञानत्वेकरून जाणावा यास्तव केशव यास सकल्पपूर्वक कृष्णायात्रेस पाठवावा तदुत्तरकाळी स्वग्रामी येउन सार्ध चतुरब्द प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची शुत्धता होयील याप्रमाणे शास्त्रसमत आहे ग्रामस्छ सर्व ब्राह्मणाचे समते करून करवावे बहुत काय लिहावे हे विनती सदरहू असल पत्र रो। बालाजी विश्वनाथ आपटे याचे घरास केशव मोडक पत्र घेउन आला त्याची नकल लेहून घेतली शके १७२२ आश्वीन वा। ७ मु।। कराड
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57