लेखांक १८३
१७३० श्रावणवद्य ९
श्रीशंकर
अनेकश क्तिसघटप्रका शलहरिघनध्वा तध्वसोविजयते विद्याशकरभा ।।रती ।।
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारती
स्वामिकरकमलोद्भवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायण
स्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद वास्तव्य क्षेत्रक-हाटक परमशिष्योत्तम यासी विशेषस्तु अत्रत्य कुशल जाणून स्वकीय लेखनी मानस सतोषवित असीले पाहिजे तदनतर तुह्मा कडून विनतिपत्र येऊन वर्तमान काही च समजत नाही जाणून हें पत्र देऊन वेदमूर्ती राजश्री बापूभट लाटकर मठसबधी यासी पाठविले आहेत तरी हे सागतील त्याचे उत्तर समर्पक पाठवून देणे विशेष लिहिणे ते काय श्रावणबहुल नवमी शके १७३० विभवनामसवछरे महानुशासन वरीवर्ति