लेखांक २७८ श्री १४६६ फाल्गुन वद्य ११
१/७
नकल अर्वाचीनीकृत
स्वस्ति श्री शके १४६६ क्रोधी संवछरे फालगुण वदि ११ सोमे तदीनी हरबाजी परचुरे याचे पुत्र बेबुल माहाजनी व हरबा व विठल हे त्रिवर्ग परस्परे विभक्त जाले याचे विभाग स्थित ऐसी हे त्रिवर्ग एकवट आसता गोहागरच्या व्यापारानिमित्य दिवाणे धरिले दंड घेतला व गावची बाकी घेतली व गाव उंटास वाटप लाविला तेणेनिमित्य द्रव्य व सोन रूप व उदकप्रवृती जितुका अर्थ होता तितुका विकून दिवाणास दिल्हा हे इतुके हि देऊन नपर दिवाण न फिटे च रूप आह्मास बहुसाल जाले व गाव उस आह्मासी घातला या गावाचा व रुणाचा वाटा विठलासी विवाह जाला नाही आणि लेकरू व अप्राप्त ह्मणुन गाव व रूणाचा वाटा घातला नाही रूणासी व गावासी संमंध नाही म्हणून तांबे व कासे व गुरे याचा व मासे विठलासी दिल्हे नाही तांबे कासे जे होते ते दुवर्गास मासे वाटून घेतले विठलासी तांब्या गडू एक वाटी एक इतुके विठलासी दिल्हे आता गुरांचे वाटे बैल काजू व चिचोरा व पोकळा व मुढा व गाय काली व तिचे वासरू व रेडिया दोन इतुके बेबुल माहाजनीयाचा वाटा दिल्हा चपनवटिका व रोट व गुणा व व ह्मैस १ एक व गाय मोठी व कालीचे वासरू १ एक इतुका वाटा हरीस दिल्हा विठलासी बैल तांबवे झडुं व कसरा व तांबी पाडी १ इतुका विठलासी दिल्हा कण जे काही होत ते त्रिवर्गास कोश वाटून घेतले अता वाडियाचे वाटे लक्षणेलकडेचा वाटा बाळ जोसी याच्या उतरेकडेचा वाटा तो हरबासी दिल्हा त्या वाटियाचे उतरलता वाटा बेबुल माहाजनी यासि दिल्हा गोविंदभट देवलयाचे सेजारीचा असे वाडियाचे विभाग जाला आता मोठी बावी ती राहाटाची ते तिन्ही राहाट तिही वर्गाचे व विठलाचे वाटियातून साल बावी ते विठलाची व दिल्ही बेबुल माहाजनी याचे वाटियातून राहाट एकाची बावी दुवर्ग खणोन बाधून द्यावी सेरी धरणे बावी वाटिलिया आता घरे बेबुल मानीयाचे विटिया वलेघर ते बेबुल मानीयास च दिल्हे हरबाचे विटियावले घर ते हरबास च दिल्हे विठलाचे वाटियावरील घर नाही ह्मणून विठल वेगला रिघो लागले तेव्हा घर त्रिवर्ग बांधोन द्यावे ऐसे रीति घराचे वाटे धरिले जुने घरची सारी सुसरी मादूस मोठी व अतुक व याचा हा बेबुल (अपूर्ण)