Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

वरील निषेधांत स्वतःच्या मालकीच्या स्त्रीशी ती अनुपयुक्त योनी असता दुस-यांच्या मालकीच्या स्त्रीशी व स्वत:च्या किंवा दुस-याच्या कोणाच्याही मालकीची नाही अशा कोणत्याही स्त्रीशी अग्निचयनानंतर समागम करू नये, असे सांगितले आहे. म्हणजे हा निषेध प्रस्थापित होण्याच्या पूर्वी अग्नी सिद्ध केला असताही स्वस्त्रीशी किंवा दुस-याच्या स्त्रीशी किंवा कोणत्याही स्त्रीशी समागम केला असता चाले, असा गर्भितार्थ निघतो. हा निषेध प्रस्थापित होण्याच्या पूर्वी चाल अशी असे की, अग्निकुंडाजवळ प्रजापती स्वस्त्रियांशी समागम करत, किंवा कोणाच्याच मालकीच्या नाहीत अशा दासस्थितीतील दासीशी समागम करीत. एके काली अशी स्थिती होती. पुढे नीतिमत्ता वाढून, स्वपरभाव वृद्धिंगत होऊन काही सज्जनांना असे वाटू लागले की, पवित्र म्हणून मानिलेल्या अग्निकुंडावर स्वस्त्रीशी किंवा दुस-याच्या स्त्रीशी समागम करणे नीतिमत्तेचे नव्हे. तेव्हा काही लोकांनी आपल्या अग्निचयनप्रक्रियेत स्त्रीसमागम निषिद्ध मानला, परंतु हा निषेध समाजातील सर्वच व्यक्तींना पसंत पडला असे नाही. काही लोकांचे असे म्हणणे पडले की, अग्निकुंडावर उबा-याच्या जागी येऊन व स्त्रीसमागम करून आपली प्रजावृद्धी होत्ये व मनुष्यबळ वाढते, तेव्हा अग्निकुंडावर स्त्रीगमन करणे आपल्या समाजाच्या मनुष्यबळाला उपकारक आहे, सबब वरील निषेध अनुपकारक अतएव अमान्य समजावा. येणेप्रमाणे समाजात दोन पक्ष झाले, (१) अगमनपक्ष व (२) गमनपक्ष. गमन-पक्षाची विचारसरणी येणेप्रमाणे होती :-

अथो खलु आहुः अप्रजस्यं तद्
यन्नोपेयादिति, तस्मादुपेयाद्रेतसः

अस्कंदाय (५ कांड, ६ प्रपाठक, ८ अनुवाक) आता यावर असे म्हणतात की, समागम केला नाही तर प्रजा खुंटेल, म्हणून रेत वाया जाऊ देऊ नये याकरिता उपगमन करावे.

येणेप्रमाणे गमन पक्षाचे म्हणणे पडले की, अग्निचयन केल्यावरही स्वस्त्रीशी, दुस-याच्य स्त्रीशी किंवा वाटेल तिशी गमन करण्यास हरकत नाही. या विधिनिषेधरूप मंत्रांचे प्रकृत विषयाला उपयोगी असे तात्पर्य एवढेच घ्यावयाचे आहे की, रानटी ऋषिपूर्वज आगटीच्या उबा-यात प्रजोत्पादन करीत असत.

७. अग्निचयन व प्रजोत्पादन यांचे साहचर्य रानटी ऋषिपूर्वजांत किती पराकाष्ठेचे निकट होते ते तैत्तिरीय संहितेतील एक उतारा देऊन आणिक स्पष्ट करितो.

नाग्निं चित्वा रामां उपेयाद्
अयोनौ रेतो धास्यामीति,
न द्वितीयं चित्वा अन्यस्य स्त्रियं
उपेयान् , न तृतीयं चित्वा
कांचन उपेयाद्, रेतो वा एतन्नि
धत्ते यदग्निं चिनुते, यदुपेयाद्रेतसा व्यृध्येत.
(तैतिरीयसंहिता, ५ कांड, ६ प्रपाठक, ८ अनुवाक)

एका ऋषीचे मत असे होते की, पहिल्यांदा अग्निचयन केले असता, स्त्रीसमागम करू नये, कारण अनुपयुक्त स्त्रीच्या ठायीं रेत स्थापिण्यात काही मतलब नाही, दुस-यांदा अग्निचयन केले असता दुस-यांच्या स्त्रीशी गमन करू नये, आणि तिस-यांदा अग्निचयन केले असता कोणत्याच स्त्रीशी गमन करू नये; निषेधाचे कारण असे आहे की, अग्निचयन करणे म्हणजे रेत साठविणे आहे, तेव्हा स्त्रीसमागम केला असता रेताचा व्यर्थ क्षय होतो.

अट्णाराचा मुलगा पर, उशिजाचा मुलगा कक्षीवान्, श्रयसाचा मुलगा वीतिहव्य व पुरुकुत्साचा मुलगा त्रसदस्यु यांनी पुत्रसंततीच्या इच्छेने पंचहविर्युक्त चयन केले, त्यामुळे त्या प्रत्येकाला एकेक हजार पुत्र मिळाले, सबब पंचहविर्युक्त चयन जो कोणी करील त्यालाही तीच प्राप्ती होईल.

यज्ञभूमीवर पंचहविर्युक्त चयन करून पर, कक्षीवान् वीतिहव्य व त्रसदस्यु या चौघांना हजार हजार पुत्र कसे मिळाले ? पंचहवि दिल्याबरोबर आकाशातून एकदम एक हजार पोरे पडली की भूमीतून वर आली ? खरा प्रकार असा असे. शत्रूशी लढण्याला व स्वारी शिकारीची कामे करण्याला प्रजापती म्हणून जे यूथपती असत त्यांना तरुण जवानांची पराकाष्ठेची जरूर भासे. यज्ञ करून म्हणजे शेजारच्या जवानांची जमात करून व त्यांचा स्वयूथातील स्त्रियांशी समागम करून देऊन, करवेल तितकी जास्त प्रजा यूथातील स्त्रियांच्या ठायी हे प्रजापती उत्पन्न करून घेत, त्या प्रजेचे संगोपन करीत व आपले मनुष्यबळ वाढवीत. शत्रूंना जिंकून व दास करून मायेची प्रजा वाढावी तितकी वाढत नसे. सबब यज्ञ म्हणजे जमात करून पोरे उत्पन्न करण्याची प्रजापतींची ही पद्धत असे. प्रजापतिर्यज्ञं असृजत, प्रजापतिः प्रजाः असृजत इत्यादी जी वाक्ये तैत्तिरीयसंहितेत येतात त्यांचा अर्थ एवढाच आहे की धुमीभोवती जमात जमवून प्रजापती प्रजा उत्पन्न करून आपले मनुष्यबळ वाढवीत. धुमीभोवती प्रजोत्पादनादिक्रियार्थ एके ठिकाणी जमणे असा यज्ञ या शब्दाचा मूळ अर्थ रानटी ऋषिपूर्वजांच्या भाषेत होता. तोच यज्ञ हा पूर्वपरंपरागत वडिलार्जित शब्द रानटी ऋषिपूर्वजांचे सुधारलेले वेदकालीन वंशज अग्नीत हवी देऊन इष्टकामना सिद्ध्यर्थ देवांना आराधिणे या अर्थाने योजीत. अग्नी व यज्ञ या दोन वस्तूंचा असा हा इतिहास आहे. यज् न् ते जमून प्रजोत्पादन करतात, असा यज्ञ या शब्दाचा जसा मूळार्थ आहे, तसाच यजुस् या शब्दाचाही आहे. यज् या जोड धातूपुढे उस् अथवा उर् हे सर्वनाम येऊन यज् उर् असे रानटी ऋषिपूर्वजांच्या भाषेत वाक्य असे त्या वाक्यापासून यजुर् यजुस् हा शब्द निघाला आहे. न् (अन् , न्त) हे जसे प्रथम पुरुषाच्या अनेकवचनाचे सर्वनाम आहे, तसेच ते च उर् किंवा उस् हे ही प्रथम पुरुषानेकवचनार्थक सर्वनाम आहे. यजुस् म्हणजे ते यजतात. यज्ञ व यजुस् ही वाक्ये मुळातच अनेकवचनी असल्यामुळे अनेक लोकांनी जमून अग्निद्वारा ईश्वरोपासना करणे असा त्यांचा अर्थ आहे. इष्टि हा शब्द इज् (यज्) + ति असा मुळात वाक्यात्मक होता. इज् + ति म्हणजे तो अग्नीजवळ जाऊन प्रजोत्पादन करतो, असा एकवचनार्थक प्रयोग मुळात होता. इज़ + ति या वाक्यापासून ज् चा ष् होऊन इष्टि हा वैदिक शब्द जन्मास आलेला आहे. तात्पर्य यज्ञ यजुष् , इष्टि या तिन्ही शब्दांचा मूलसंबंध आगटीभोवतालील प्रजोत्पादनकर्माशी होता. सबब विवाहादी प्रजोत्पादनसंबंधक विधानात अग्नीची समक्षता वैदिक ऋषींना परंपरागत म्हणजे पूज्य म्हणून अत्यावश्यक वाटे.

३६. दमण, नळें, मोरें, मोरकुरण, केरौली, आंधेरी, इत्यादि ग्रामनामां वरून दिसतें कीं आर्यांच्या किंवा आर्यसमांच्या पहिल्या वसाहती उत्तर कोंकणांत दामनीय, नल, मौर्य, कोरव्य, अंधक, इत्यादि लोकांनीं केल्या. त्यांच्या अगोदर वारली, कोळी, ठाकर हे लोक कोंकणांत येऊन स्थिर झाले होते. नंतर बहुश: आंध्रमृत्यांच्या कारकीर्दीच्या आगें मागें मांगेले आले. कातडी पांघरणारे कातवडी सर्वांच्या आधीं येथें वसती करून आहेत. नागलोक कातवड्यांच्या नंतर व वारलीकोळी ह्यांच्या थोडे अगोदर कोंकणांत आले. ह्या सर्व लोकांची कालानुक्रमानें शेजवार परंपरा येणें प्रमाणें लागेल. कालनिर्देशा वांचून कोणता हि ऐतिहासिक प्रसंग हप्तट्टिके वर नीट बिंबत नाहीं. करतां अत्यन्त स्थूल मानानें ह्या लोकांच्या आगमनाचा अंदाजी काल देतों. तो शातवाहनांच्या पर्यंत फक्त अंदाजी आहे, नक्की नाहीं, हें लक्ष्यांत ठेवावें.
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)

कातवडी हें शकपूर्व पांच सहा हजार वर्षां पासून आज पर्यंत येथें स्वयंभू आहेत. नाग, वारली, कोळी व ठाकर शकपूर्व दोन हजार पासून पाणिनिकाला पर्यंत हे रान धरून आहेत. शकपूर्व नऊ शें पासून शकोत्तर चार शें पर्यंत म्हणजे पाणिनीय व बौद्ध कालाच्या -हासा पर्यंत दामनीय, माहाराष्ट्रिक, आंध्र, मांगेले, नल व मौर्य कोकणांत शिरले. शक चार शें पासून त्रैकूटक, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बिंब, नागरशादि राजे, वगैरे जुन्या मराठ्यांनीं शक बारा शें सत्तर पर्यंत आठ शें सत्तर वर्षे राज्य केलें. मुसुलमानांचा अंमल शक बारा शें सत्तर पासून शक चौदा शें साठ पर्यंतचीं दोन शें वर्षे होता. नंतर दोन शें वर्षे पोर्तुगीजांनीं हा प्रांत आक्रमण केला. तदनंतर नव्या मराठ्यांनीं साठ वर्षे स्वराज्य भोगिलें. आणि अलीकडे सवा शें वर्षे इंग्रजाच्या पंजा खालीं उत्तर कोंकण आहे. मुसुलमानांचीं दोन शें वर्षे, पोर्तुगिजांचीं दोन शें वर्षे व इंग्रजाचीं सवा शें वर्षे मिळून पांच सवापांच शें वर्षे कोंकण परकीय अंमला खालीं खितपत पडलें आहे. जुन्या व नव्या मराठ्यांच्या ताब्यांत उत्तर कोंकण साडे नऊ शें वर्षे होतें आणि शातवाहननलमौर्यादींच्या अंमला खालीं तेरा शें वर्षे होतें. मिळून साडे बावीस शें वर्षे उत्तर कोंकण हिंदूंच्या अंमला खालीं होतें व सवा पांचशें वर्षे अहिंदूंच्या अंमला खालीं आहे. कातवड्यांना नागांनीं व वारल्यांनीं रेटलें, नागांना आंध्र मौर्य व महाराष्ट्रिक यांनीं जिंकिलें, ह्यांची जागा शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट व यादव ह्यांनीं घेतली, ह्यांच्या उरा वर मुसुलमान बसले, मुसुलमानांना पोर्तुगीजांनीं उखाडलें, पोर्तुगीजांना मराठ्यांनीं टांग मारिली व मराठ्यांना इंग्रजांनीं खो दिला. हा खेळ गेल्या तीन हजार वर्षे चालला. येथें असा प्रश्न उद्भवतो कीं नवे नवे सत्ताधीश पूर्व पूर्व सत्ताधीशांची उचलबांगडी करीत असतां, कातवडी, नाग, महाराष्ट्रिक, जुने मराठे, मुसुलमान, पोर्तुगीज अस्सल व बाटे, नवे मराठे, हे कोंकणांत कायमची वसती करून राहिलेले लोक निमूटपणें नव्या सत्तेला कितपत राजी होत गेले व नव्या सत्तेला कितपत प्रतिरोध करते झाले ? ह्या भानगडीच्या प्रश्नाचें स्थूल उत्तर थोडेंबहुत देण्याचा प्रयत्न प्रस्तुत प्रकरणाला व इतिहासाभ्यासाला उपकारक म्हणून केला असतां वावग होणार नाहीं.

यज् हा क्रियाशब्द दोन क्रियापदांचा जोड आहे. यज्, इज् या जोडक्रिया शब्दांत इ किंवा य या क्रियाशब्दाचा अर्थ गमन करणे, जाणे, जमणे असा होता व या क्रियाशब्दाचा अर्थ जन्मविणे, यभनक्रिया करणे असा होता. एका ठिकाणी जमून यभनक्रिया किंवा जननक्रिया करणे या जोडक्रियेला यज् किंवा इज् हा जोड क्रियाशब्द त्यांच्या भाषेत होता. तात्पर्य यज्ञ म्हणजे ते जमतात व यभनक्रिया करतात असा यज् न् या वाक्याचा अर्थ त्या रानटी लोकांत होता. ह्या यज् न् वाक्याचा उच्चार असा कालांतराने झाला व रानटी लोकांची प्राथमिक भाषा मेल्यावर यज्ञ हे वाक्य नाम म्हणून पुढील भाषेत प्रचलित झाले. कालांतराने रानटी ऋषिपूर्वजांचे वंशज उत्तरोत्तर सुधारत गेले, घरेदारे करून राहू लागले व मैथुनक्रिया यज्ञभूमीवर म्हणजे जमातीच्या उघड्या जागेवर लोकान्तांत न करता एकान्तांत करू लागले. त्या सुधारलेल्या वंशजात इंद्र, वरुण, सूर्य यांची आराधना अग्नीत हवि टाकून करण्याची पद्धती निर्माण झाली. अग्नी व अग्निकुंड हे आर्यसंस्कृतीचा मूळ उगम, सबब देवांची आराधना ही अग्नीच्या व अग्निकुंडाच्या सान्निध्याने व द्वारा सहज होऊ लागली व पूज्य बापजादे जी जी कार्ये अग्नीभोवती उरकीत ती ती सर्व कार्ये तशीची तशीच अग्नीसमक्ष उरकण्याने इष्टकाम सिद्धी बापजाद्यांना जशी पूर्वी मिळाली तशी सध्याही आपणाला मिळेल अशी भावना सहजच चालू राहिली. बापजादे आगटीभोवती एकत्र जमत, अभद्र शब्द उच्चारीत व तेथेच यभनक्रिया उरकीत, सबब त्यांचे सुधारलेले वंशजही यज्ञप्रक्रियेत अग्नीजवळ जमण्याची, अभद्र शब्द उच्चारण्याची व यभनक्रिया करण्याची नक्कल अश्वमेधयज्ञात जशीच्या तशी उठवून देत. रानटी बापजाद्यांना आगटीभोवती यभनक्रिया करून खरीच पुत्रसंतति मिळे, तशीच पुत्रसंतती बापजाद्यांची यज्ञभूमीवर नुसती नक्कल केल्याने आपणास मिळेल अशी भावना वैदिक ब्राह्मणक्षत्रियांची असे. अश्वमेध यज्ञ केला म्हणजे वीरप्रजा हटकून मिळेल किंवा पंचहविरुपेतचयन केले म्हणजे हजार पुत्र मिळतील, अशी श्रद्धायुक्त भावना वैदिक ऋषींची असे. पूर्वजांनी अग्नीची अशी अशी उपासना करून अशी अशी इष्टसिद्धि करून घेतली, सबब ज्याला ज्याला तशी इष्टसिद्धी हवी असेल त्याने त्याने तशी आराधना करावी असा उपदेश यजुर्वेदात बहुतेक प्रत्येक इष्टीच्या व यज्ञाच्या मंत्रात केलेला आढळतो. एतत्संबंधाने तैत्तिरीयसंहितेच्या पाचव्या कांडातील सहाव्या प्रपाठकाच्या पाचव्या अनुवाकातील खालील वाक्य मासल्याकरता देतो :-
एतं वै पर आट्णार : कक्षीवाँ
औशिजो वीतिहव्यः श्रायसस्त्रसदस्युः
पौरुकुत्स्यः प्रजाकामा अचिन्वत ततो
बै ते सहस्त्रँ सहस्त्रं पुत्रानविन्दंत । इ.

होलाका म्हणून एक संस्था रानटी ऋषिपूर्वजांत असे. या संस्थेत ते रानटी पुरुष लिंग व योनी यांना अनुलक्षून टोळींतील सर्व स्त्रीपुरुषांची व्यंगे उघड स्पष्टपणे पुकारीत हे अनुमान दुस-या चालीवरून निघते. कुणबी वगैरे गावंढ्यांच्या पूर्वजात तरुण कुमारिका एकमेकीच्या उखाळ्यापाखाळ्या काढून अभद्र भाषण करीत, असे अनुमान तिस-या चालीपासून उद्भवते. हाच न्याय शिष्ट व संभावित अशा वैदिक ब्राह्मण-क्षत्रियाच्या रानटी पूर्वजांना लावावयाचा आहे. रानटी ऋषिपूर्वज यज्ञभूमीवर म्हणजे अग्निकुंडाभोवती म्हणजे धगधगीत धुमीच्याभोवती उबा-याला जमत, लिंग व योनी यांचे वाचक शब्द एकमेकांना उद्देशून हरहमेश बोलत आणि नाकाडोळ्यांप्रमाणेच हे दोन्ही अवयव त्या रानटी लोकात उघडे असल्याने तत्संबंधाने गुह्य व गुह्योत्पन्न लज्जा उत्पन्न झालेल्या नसल्यामुळे या अवयवांचे वाचक शब्द उच्चारण्यात कोणताच विपरीतपणा नाही असे समजून आपण सध्याचे लोक ज्यांना अश्लील म्हणतो ते शब्द सहजासहजी उच्चारीत. लिंग व योनी यांचे वाचक असे बीभत्स शब्द सध्याही पृथ्वीवरील कितीतरी रानटी लोकांच्या नित्याच्या बोलण्यात हरघडी येतात, हे समाजशास्त्राच्या अभ्यासकांना नवीन सांगावयास पाहिजे असे नाही फार दूर जावयास नको, सध्या ज्या स्थली बसून मी लिहीत आहे, त्या स्थलाशेजारून भिल्ल, वडार, वंजारी, कुणबी इत्यादी कनिष्ठ दर्जाचे रानटाऊ लोक गाड्या हाकताना, बाजार करताना, लावण्या म्हणताना व शिळोप्याच्या गप्पा गोष्टी करताना मी पाहात व ऐकत आहे. दर वाक्यास एकतरी अश्लील शब्द त्यांच्या बोलण्यात आला नाही, असे फारसे घडत नाही. ब्राह्मणादि उच्च व सभ्य लोकांशी बोलताना अश्लील भाषा तोंडातून काढावयास ते किंचित् भितात, परंतु आपापसात बोलताना त्या बोलण्यात ताळतंत्र फारच थोडा असतो आणि हा असा प्रकार होणे अगदी स्वाभाविक आहे. उपजीविकेकरिता काबाडकष्ट करणे आणि करमणुकीकरिता जननेंद्रियांची आराधना करणे, या दोन विषयांइतका तिसरा विषय रानटी लोकांच्या परिचयाचा नसतो. हाच प्रकार रानटी ऋषिपूर्वजांचा असे. ह्या रानटी ऋषिपूर्वजांच्या बोलण्यांत जननेंद्रियांना अनुलक्षून फार शब्द सहजासहजी येत. हे रानटी ऋषिपूर्वज धुमीभोवती जमत, जननेंद्रियांसंबंधाने ज्या अडचणी येत त्याचसंबंधाने संभाषण करीत, तेथेच गर्भाधानही उरकीत आणि या तिन्ही क्रियांना मिळून ते यज्ञ हा शब्द लावीत. अग्नीत टाकिलेल्या हविर्द्वारा देवांची आराधना करणे हा यज्ञाचा जो अर्थ वैदिक लोक करीत, तो अर्थ रानटी ऋषिपूर्वजांना माहीत नव्हता. यज्ञ म्हणजे आगटीभोवती जमणे, काटक्या व मारलेल्या जनावरांची चरबी टाकून ती आगटी चेतवणे, सोमाची दारू पिणे, जननेंद्रियासंबंधाने बोलणे करणे व मैथुन करणे, या क्रियासंततीला ते रानटी लोक यज्ञ हा शब्द लावीत. मूळ यज्ञ हा शब्द यज़ + न् असा होता, यज् न् हे वाक्य होते. न् किंवा न्त हे अनेकवचनी प्रथमपुरुषवाचक सर्वनाम रानटी ऋषिपूर्वंजांच्या भाषेत असे, क्रियाशब्दाच्या पुढे ते सर्वनामे योजीत. यज् न् या त्यांच्या वाक्याचा अर्थ ते यजतात, असा होता.

(६) असे हे एकंदर नाटक व नक्कल आहे. ही नक्कल क्षुद्र व बीभत्स आहे हे अश्वमेध करणारे राजे व ऋत्विज जाणीत. दधिक्राव्णो अकारिषम् या मंत्रात आपण केले ते नाटक बीभत्स होते असे ते स्पष्टच कबूल करतात. परंतु हा बीभत्सपणा पूर्वपरंपरेला अनुसरून करणे अवश्य असल्यामुळे यज्ञपुरुष आपले बरेच करील, वाईट करणार नाही, अशी त्यांची खात्री होती. बीभत्स भाषणे केल्याबद्दल यज्ञ याजकाचा काय फायदा करीत असेल तो असो, समाजशास्त्रज्ञांचा मात्र या बीभत्स नाटकापासून एक निश्चित फायदा होतो. त्यांना वैदिक ऋषींच्या रानटी पूर्वजांच्या चालीरीतींचे ज्ञान होते व ही बीभत्स भाषणे नमूद करून ठेवल्याबद्दल संहिताकाराचे ते ऋणी बनतात. यज्ञभूमीवर मैथुनविषयक बीभत्स नाटक पूर्वजापासून चालत आलेली परंपरा म्हणून वैदिक ब्राह्मण, क्षत्रिय करीत, नित्यव्यवहारातील परिपाठ म्हणून करीत नसत. वेदकालांत राजे व ब्राह्मण संभावित शिष्ट असत व असभ्य भाषा वापरण्याला भीत असत, परंतु यज्ञ प्रकरणात धार्मिक परंपरा म्हणून बीभत्स शब्द, हावभाव व वागणूक करणे त्यांना श्रेयस्कर व इष्ट वाटत असे. परंपरा म्हणून समाजात हे असले प्रकार अवशिष्ट राहतात व खपतात. उदाहरणार्थ, विवाहसमयी नव-या मुलाच्या अंगावर पायतणे फेकण्याची कित्येक युरोपियनांची चाल, किंवा होळीत अचकट विचकट शब्द उच्चारण्याची ब्राह्मणादी हिंदूंतील चाल, किंवा लगतच्या दोन गावातील मुलींनी गावशिवेवर जाऊन एकमेकीचे बापजादे व आया माया उद्धंरण्याची गावंढ्याची चाल. ह्या चाली परंपरा म्हणून चालत आलेल्या आहेत व समाजाला खपतात इतकेच. या चाली काय दाखवितात ? पुरातन युरोपियनांच्या एका टोळींतील पुरुष दुस-या टोळीतील रत्रीला बळजबरीने पळवून नेत असता, हिचे भाऊबंद त्या धर्षक पुरुषाला बडवीत, असे अनुमान पहिल्या चालीवरून आपण काढितो.

त्याला उद्धाता सांगतो की, ह्या वावातेला दगडावर टेकून जशी मोळी उचलतात तशी उचल म्हणजे हिची योनी वा-यात धान्य पाखडताना जशी सुपली पुढे येते, तशी पुढे येईल. यावर यज्ञभूमीवर एक स्त्री उभी होती, तिला वावाता म्हणाली, या उद्धात्याला दगडावर टेकून जशी मोळी उचलतात तसा उचल म्हणजे याचे लिंग वा-यात धान्य पाखडताना सूप जसे वर उचलले जाते तसे वर उचलेल. नंतर चौथा जोडा होता नामक ऋत्विज व परिवृक्ता नामक राजपत्नी यांचा रंगभूमीवर येतो. होता म्हणतो, हिच्या आखूड योनीत ठोले लिंग जेव्हा हा मनुष्य ठासतो, तेव्हा गाईच्या पावलांभर पाण्यातील जशी माश्यांची जोडी न बुडता बाहेर राहते तशी याच्या अंडांची जोडी हिच्या योनीबाहेर लोंबकळत रहाते. याला उत्तर म्हणून परिवृक्ता म्हणते, अहो तुम्ही शहाणे लिंगपूजक हो! तुम्ही जेव्हा योनीत बुळबुळीत लिंग सारता, तेव्हा खरेच तुम्हाला सांगते की, तुमच्या मांड्याखालून योनी लिकलिकते. पाचवी जोडी क्षत्ता व पालागली यांची. क्षत्ता पालागलीला म्हणतो, हरीण रानातले गवत टाकून शेतातले जव जेव्हा चोरून खाते तेव्हा त्याला पोट भरलेसे वाटत नाही. शूद्रीण जेव्हा वैश्याशी चोरून रत होते तेव्हा तिचे समाधान होत नाही. पालागली क्षत्त्याला उत्तर करते, खरेच आहे. हरीण चोरून जव खाते तेव्हा त्याला पोट भरलेले वाटत नाही. शूद्र पुरुष वैश्य स्त्रीशी जेव्हा रममाण होतो तेव्हा त्याची तरी तृप्ती कोठे होते ?

५. कृष्णयजुर्वेदसंहितेतील नाटकाचा तपशील हा असा आहे. आता शुक्लयजुःसंहितेतील ह्याच नाटकाचा तपशील देतो. संज्ञापित घोड्यापाशी सर्व राजपत्न्या आल्यानंतर एकमेकींना म्हणतात की, बाई गे, मला कोणीच की गे धरून नेत नाही. हा घोडा देखील माझ्याशी न निजता कांपील नगरातील त्या सुभद्रीटलीशी रममाण झाला आहे. इतके म्हणून सर्व राजपत्न्या घोड्याचे येणेप्रमाणे आवाहन करतात : तू स्त्रीगणांचा पती आहेस. तू प्रियकरांतला प्रियकर आहेस, तू सुखनिधी आहेस, तेव्हा हे माझ्या वसो, मी तुझ्यापाशी येऊन गर्भ धारण करते. तू मजपाशी येऊन गर्भ घाल. आपण दोघेजण चारी पाय पसरून व पांघरूण घेऊन, या स्वर्गासारख्या सुखकर स्थली निजू, तू रेतःसंपन्न आहेस, तू माझ्या ठायी रेत घाल. राजपत्न्यांनी घोड्याची ही अशी प्रार्थना केल्यावर पत्न्यांचा पती जो राजा तो स्वतः घोड्याला कानगोष्ट सांगतो की, ह्या माझ्या पट्टराणीच्या मांड्या वर उचलून त्यांच्यावर तू आपल्या मांड्याच्या पाठीमागील भाग ठेव आणि हिच्या योनीत आपले शिश्न ढकल, कारण शिश्नावर स्त्रियांचा सर्व जीव व भोग अवलंबून असतो. यजमान जो राजा त्याचे स्वतःचे हे भाषण झाल्यावर यज्ञाचा मुख्य ऋत्विज जो अध्वर्यु तो राजपत्न्यांपैकी कुमारी म्हणून जी पत्नी तिच्या योनीकडे बोट करून म्हणतो, चांगले आहळ, चांगले आहळ, म्हणून ही तुझी योनी वसवसती आहे. सबब लिंग तुझ्या भोकात हाणतो म्हणजे तुझी योनी रेताने भरून जाऊन गलगल शब्द करील. अध्वर्यूच्या ह्या वक्तृत्वाला उत्तर म्हणून कुमारी म्हणते, आहळ, आहळ, म्हणून हे तुझे लिंग हलते आहे, ते तुझे सच्छिद्र लिंग तुझ्या तोंडासारखे दिसत आहे, सबब फार तोंड करू नकोस. अध्वर्यु व कुमारी यांचे हे संभाषण झाल्यावर ब्रह्मा नामक याजक राजमहिषीला म्हणतो, तुझे आईबाप झाडावर चढत आणि मग तुझा बाप तुझ्या आईला म्हणे की, तुझी योनी माखून टाकतो आणि नंतर तिच्या योनीत आपले लिंग ठाशी. यावर महिषी ब्रह्माला म्हणते, तुझी आईबापे झाडावर चढूनच क्रीडा करीत. तेव्हा फार तोंड वासू नकोस, गप्प बैस. ब्रह्मा व महिषी यांच्यानंतर उदात्त नामक ऋत्विज व वावाता नामक राजपत्नी यांची सोंगे यज्ञभूमीवर येतात. यज्ञभूमीवर एक जवान होता.

मग, राणी इतर बायांना पुनः म्हणाली, बायांनो ! मला कोणीच झवत नाही, सबब घोड्याजवळ मी निजत्ये. त्यावर एका बाईने खालील टीका केली : हरणी रोजचे रानातले गवत टाकून शेतातले चोरून जव खाते, परंतु त्याने तिचे पोट भरलेले तिला वाटत नाही. शूद्र स्त्री वैश्याशी चोरून रमते, परंतु त्या रमण्याने तिचे समाधान होत नाही.

ह्या टीकेला राणी उत्तर देते की, घोडा माझ्याशी संग करतो, त्याचे कारण एवढे की, दुसरा कोणीच मला झवत नाही. त्यावर दुसरी एक स्त्री टीका करते की तुझी ही योनी एखाद्या पाखरिणीसारखी हुळहुळून हलते आहे, तिच्यात रेत पडले आहे व ती गुलगुल वाजत आहे, मग तक्रारीला जागा कोठे राहिली ? ह्याही टीकेला राणी उत्तर करते की, तक्रार करू नको तर काय करू ? मला कोणीच पुरुष झवत नाही. सबब मी घोड्यापाशी जात्ये. यावर तिसरी एक म्हणते, तुला घोडा सापडला हे नशीबच समज. तुझ्या आईला तोही लाभला नाही. तुझी आई व तुझा बाप झाडावर चढत आणि नंतर तुझा बाप, योनी सोलून काढितो म्हणून, तुझ्या आईच्या योनीत आपल्या हाताची मूठच ठाशी, त्याहून घोडा बरा नव्हे ? तैत्तिरीय संहितेतील मंत्रांचा तपशील हा असा आहे. सायणाला ह्या मंत्राचा अर्थ व पूर्वापारसंबंध व शब्द बिलकुल काहीच कळले नव्हते.