Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
महिकावती (माहीम)ची बखर
४४. येणें प्रमाणें उत्तरकोंकणांतील हिंदी लोक ऊर्फ कायमची वसती करून राहिलेले नाना वंशांचे, नाना वर्णांचे, नाना देवधर्मांचे, नाना आचारांचे व नाना भाषांचे सर्व लोक जे इतके राजकारणपराङमुख, राष्ट्रपराङमुख, समाजपराङमुख, मुक्तद्वारी, तुटक, संन्यस्त व व्यक्तितंत्र दिसतात त्याचें एक च एक आदिमूळ आर्थिक आहे. अन्नाचें वैपुल्य व सौलभ्य हें ह्या एकसमाजविन्मुखतेचें कारण आहे. अश्या परिस्थतींत मानवांचा कोणता हि वंश अशा च स्वभावाचा बनला असता. पश्चिम यूरोपांतील ख्रिस्ती लोक बद्धद्वार, एकजूट, समाजनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ जे दिसतात त्याचें हि मूळ व मुख्य कारण आर्थिक च आहे. अन्नाचें दौर्लक्ष्य व दौर्लभ्य हें ह्या एकसमाजसन्मुखतेचें कारण आहे. संघविहीन लोकां वर घाला घालून अन्न मिळविण्या करितां एकसंघ व एकसमाज केल्या विना त्यांना तरुणोपाय नव्हता. ह्या वरून असें विधान करणें शक्य होतें कीं उत्तरर्कोकणांतील व हिंदुस्थानांतील समाजपराङमुख व राष्ट्रपराड्मुख लोकांना एकसमाजनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ करावयाचें असल्यास, त्यांच्यांत अन्नदौर्भिक्ष्य व अन्नदौर्लभ्य उत्पन्न झालें किंवा केलें पाहिजे. नाना जाती करून रहाणें घातक आहे, नाना भाषा वापरणें ऐक्यसाधक नाहीं, नाना धर्मांना कवटाळून बसणें राष्ट्रनाशक आहे, वगैरे कोरड्या व कच्च्या उपदेशानें हें कार्य साधणार नाही. अनन्नत्वाचा जेव्हां पेंच लागेल तेव्हां हे लोक जगावयाचें असल्यास, एकसमाजनिष्ठ व एकराष्ट्रनिष्ठ झाल्या वाचून रहाणार नाहींत. नाना भाषा, नाना वंश, नाना धर्म व नाना जाती ह्यांच्या मुळें हिंदू लोक दुर्बल झाले आहेत, हें म्हणणें खोटें आहे. हिंदुस्थानांतील, मुसुलमान लोकांत नाना जाती, नाना वंश, नाना धर्म व नाना भाषा नाहींत, एक वंश, एक जात, एक भाषा व एक धर्म आहे. तत्रापि ते हि हिंदू लोकां प्रमाणें च तुटक, उदासीन, समाजविन्मुख व राष्ट्रपराङमुख आहेत. तेव्हां हिंदूमुसुलमानांच्या राष्ट्रपराङमुखतेचे कारण वंश, धर्म, जाती व भाषा ह्या चार राशींत हुडकीत बसणें युक्तिसिद्ध नाहीं. पराङमुखतेचें मुख्य व एक च एक कारण सुलभ व विपुल अन्नसंपत्ति आहे. ही संपत्ति अपुरी भासण्यास हिंदूस्थानांत आहे ती हून लोकसंख्या तिप्पटचौपट वाढली तरी पाहिजे किंवा आहे त्या लोकसंख्येच्या रहाणीची इयत्ता दसपटीनें वाढली तरी पाहिजे किंवा बहि:स्थ राजकर्त्यांनी अन्नशोषण करून तें अत्यन्त दुर्मीळ तरी करून टाकिलें पाहिजे. ह्या आर्थिक, सामाजिक व राजकीय विषयाचा खल इत्थंभूत व सविस्तर होण्यास एखादा स्वतंत्र ग्रंथ रचिला पाहिजे, बखरीच्या पडवींतील तुटपुंज्या जागेंत त्याचा निर्वाह होणार नाहीं.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
१३. वास्तव व भ्रांत कलांचा विकास
ध्वनी, रेघा, हावभाव व आकृती यांना भाषा, अक्षर, अभिनय व भांडी यांचे रूप देऊन या चारी नैसर्गिक व अनुकारक शक्त्यांचा उपयोग रोजच्या व्यवहारातील विचारप्रदर्शनाच्या कामी मनुष्याने केला. साध्या, सरळ, पोटभरू व्यवहाराला ही भाषादी साधने साळसूदपणे पुरी पडतात, हे खरे आहे. परंतु विचारांचे किंवा विकारांचे जेव्हा काहूर उठते आणि सुखदुःखादींचा जेव्हा कल्होळ माजतो, तेव्हा साधी बोलणी आणि सुधी लिहिणी कुचकामाची ठरतात आणि तीव्रतर साधनांचा आश्रय केल्यावाचून वादळाची शांती होत नाही. विचारांचा व विकारांचा हा तीव्र आवेग दर्शविण्यास मनुष्याने अगदी अज्ञातपूर्व अशी नवीन साधने शोधून काढली असे नाही. पूर्वीचा पाया ज्याला बिलकूल नाही, असे नवीन काहीच शोधून काढणे शक्य नाही. पाया पूर्वीचाच, साधने तीच, फक्त भरदारीत फरक. साध्या बोलण्याला जो ध्वनी लागतो त्यालाच दीर्घ व भरदार करून कोणत्याही आवेगाचे प्रदर्शन तीव्रपणे करणे म्हणजेच गाणे. साध्या मूळाबरहुकूम चित्ररेखांना आवेगाचे तीव्र रूप भरदार, काल्पनिक व नाजूक रंगांनी देणे म्हणजेच चित्र काढणे. साध्या हावभावांचा अतिशय करणे म्हणजेच नाचणे. आणि साध्या नित्याच्या घन आकृतींना तीव्र आवेग दाखवावयास लावणे म्हणजे मूर्ती करणे. एणेप्रमाणे ध्वनी, रेखा, हावभाव व आकृती या प्रत्येकापासून मनुष्याने साधेपणा व अतिशायन ह्या ऐयत्तिक भेदांवर दोन दोन निरनिराळ्या कला उत्पन्न केल्या. त्यांचा नकाशा असा मांडता येईल :--
गुण साधेपणा ऊर्फ व्यवहार अतिशायन ऊर्फ तीव्रता
१ ध्वनी भाषा गान
२ रेखा अक्षर चित्रण
३ हावभाव अभिनय नृत्य
४ आकृती भांडे मूर्तिकरण
महिकावती (माहीम)ची बखर
४३. सामान्यतः सर्वसाधारण लोकांना जबरदस्त व भपकेबाज किंवा सालस व शिष्ट अश्या कोणत्या हि सरकाराची, राज्ययंत्राची व राष्ट्रत्वाची जरूरी यत्किंचित् हि भासत नव्हती हें जरी खरें आहे; तत्रापि भारतवर्षांत सदा असा एक अल्पसंख्याक वर्ग वेळोवेळीं विद्यमान असे कीं त्याला राष्ट्रत्वाची व राज्ययंत्राची मालकी आपल्या हातांत राखण्याची आवश्यकता उत्कटत्वानें भासे. हा अल्पसंख्याक वर्ग म्हणजे ज्यांच्या हातचें राज्ययंत्र नवीन आलेल्या राज्यकर्त्यांनीं काढून घेतलें त्यांचा व नवीन आलेल्या राज्यकर्त्यांच्या हातचें राज्ययंत्र स्वहस्तगत करूं इच्छिणा-या देशी किंवा विदेशी बुभुक्षितांचा. नामोहरम झालेले पूर्वीच्या राशियतींतील असंतुष्ट लोक व ताज्या दमानें राज्ययंत्र बळकविण्याची इच्छा करणारे नवीन बुभुक्षित लोक हिंदुस्थानांतील राजकारणाचा धागा गेल्या तीन हजार वर्षे बिनतूट चालवीत आलेले आहेत. तत्रापि हे हि बुभुक्षित लोक अन्नसंतृप्त होऊन अल्पावधीनें मुक्तद्वारी, तुटक, संन्यस्त व उदासीन नत. हे भारतबाह्य व भारतांतर्गत बुभुक्षित व असंतुष्ट लोक जर नसते तर राजकारण हा पदार्थ हिंदुस्थानांत औषधाला हि न मिळता. ज्यांनीं ज्यांनी म्हणून राज्ययंत्राचें ओझें अन्ना करितां आपल्या शिरा वर घेतलें ते ते एकोनएक लोक अन्नसंतृप्त होऊन शिरा वरील ओझें खालीं ठेवण्याला उत्सुक झालेले दिसले आहेत. तारुण्यांत राज्यभार वाहणारा जनकराजा वार्धक्यांत वेदान्ताचीं प्रवचनें करतांना दृष्टीस पडतो. तारुण्याच्या पहिल्या तडफेंत रक्तपात व लांडीलबाडी करून राज्य आक्रमणाच्या चंद्रगुप्ताचा मुलगा जो अशोकराजा तो भर तारुण्यांत अहिंसेची शपथ घेतो. खुनांचा सडा पाडणारा अवरंगझेब कुराणाच्या नकला करून व रमजानचे उपास करून पापनिर्मुक्त होण्याची खटपट करतो. सर्व हिंदुस्थान भर हुतूतू घालणा-या पहिल्या बाजीरावाचा नातू जो दुसरा बाजीराव तो राज्यभाराची दगदग विसरण्या करितां स्नानसंध्येत विश्रांति घेण्याचा रस्ता धरतो, आणि पूर्ववयांत राजकारणी दंग झालेला महादजी शिंद्या उत्तरवयांत रडके अभंग रचीत बसतो. ह्या सर्व दाखल्यांचा अर्थ इतका च कीं हिंदुस्थानांत राजकारण, तदंगभूत मारामा-या व राज्ययंत्र ह्यांची वास्तविक जरूरी नव्हती. कृत्रिमपणें राज्ययंत्र निर्माण करतांना व मारामा-यांत दंग होतांना कांहीं अर्धपोटी अल्पसंख्याक लोक हिंदुस्थानांत दिसत. परंतु बाकीच्या सर्व अन्नसंतृप्त लोकांस त्यांच्या ह्या धांगडधिंग्याचा व रानटीपणाचा पूर्ण तिटकारा वाटे. एका च वाक्यांत सांगावयाचें म्हणजे हिंदुस्थानांत इतकें मुबलक अन्न असे कीं येथें तल्लब्ध्यर्थ राज्ययंत्र, राष्ट्र, मारामा-या व मुत्सद्देगिरी पैदा करण्याची जरूरी नसे. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनें येईल त्याला येथें मुक्तद्वार असे, मज्जाव नसे. मज्जाव, अडथळा व प्रतिबंध जो होई तो अल्पसंख्याक भुकेबंगाल राज्यकर्त्या कडून होई.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
१२. भाषा, वर्ण इत्यादींची दैवी उपपत्ती
एणेप्रमाणे (१) ध्वनीपासून भाषा, (२) रंगीत किंवा साध्या रेखाचित्रापासून अक्षरमालिका, (३) नैसर्गिक हावभावापासून कृत्रिम अभिनय, व (४) पाहिलेल्या आकृतींपासून बनावट भांडी, अशा चार कृत्रिम व्यावहारिक कला मनुष्याने आपल्या अकलेने संपादन केल्या. शेकडो टक्केटोणपे खाऊन व हजारो प्रयोगात फसून मनुष्याला ह्या चार नित्योपयोगी कला परम कष्टाने व निढळाच्या घामाने साध्य झाल्या. कोण्या काल्पनिक स्वर्गात किंवा नरकात राहणा-या देवासुरांनी दिल्या अश्यातला बिलकुल भाग नाही. शंकराच्या डमरूतून ध्वनी निघाले, चित्रलेखानामक गंधर्वकन्येने चित्रे काढण्याचे कसब शिकविले, कोण्या किन्नराने अभिनय पढविला किंवा विश्वकर्म्याने भांडी बनविण्याचा धडा घालून दिला वगैरे बोलणी केवळ भाकडकथा होत. ह्या सर्व भाकडकथांचा अर्थ इतकाच आहे की भाषा, अक्षरमालिका, अभिनय व भांडी निर्माण करण्याची परंपरा काय आहे याचा ऐतिहासिक उलगडा करण्याचे ज्ञान परवापरवापर्यंत भारतीय मनुष्यात नव्हते. ज्या बाबींचा उगम, घटना, वृद्धी व परिणती कळत नव्हत्या त्या बाबी कोण्यातरी दैवी शक्तीच्या प्रसादाने प्राप्त झाल्या, असा अर्थ अज्ञ मनुष्य सदैव व सर्वत्र लावीत असलेला दृष्टीस पडतो. हे सर्व आपलेच स्वतःचे कर्तृत्व आहे, हा शोध मनुष्याला परम कष्टाने लागलेला आहे. आता शंकराच्या डमरूचे किंवा देवांच्या विश्वकर्म्याचे किंवा वागधिष्ठात्र्या सरस्वतीचे किंवा पशुपक्ष्यांचे नामकरण करणा-या नोहाचे दैवी अर्थाने काहीएक प्रयोजन उरलेले नाही. ऐतिहासिक दृष्टीने यांच्यातूनही इतिहास निघण्यासारखा आहे.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
११. आकृति-निर्मिती
ध्वनी, रेघा व हावभाव या तीन साधनांइतकेच जुने एक चौथे साधन प्राथमिक मनुष्याला अनुकरणाने सुचले. ते हे की, पाहिलेल्या वस्तूची हुबेहूब आकृती बनविणे. रेघांचे साधन लांबी व रुंदी या दोन परिमाणांतून कार्य करते. हुबेहूब आकृतीच्या साधनाला लांबी व रुंदी लागून शिवाय आणीक खोलीही लागते. प्रथम प्रथम ह्या आकृती तो लाकडाच्या, मातीच्या किंवा दगडाच्या बनवी. राही त्या कपारीचे किंवा गुहेचे अनुकरण करून दोन उभ्या दगडावर तिसरा एक दगड ठेवणे, किंवा राही त्या झाडावरील माच्याचे अनुकरण करून पाण्यात माचे बांधणे, नदीतील रांजण पाहून त्या सारखे लहान मोठे रांजण व रांजण्या करणे, बेलफळे, नारळ इत्यादींच्या कवट्याप्रमाणे मातीची भांडी करणे, गुहेतील पाण्याच्या थिबकण्याने बनलेल्या स्तंभाप्रमाणे दगडाचे स्तंभ बनविणे, पशुपक्ष्यांच्या मृत्तिकामय, दारुमय किंवा पाषाणमय मूर्ती घडविणे, इत्यादी त्रिपरिमाणक आकृत्या बनवून त्यांची कल्पना इतर माणसांना करून देण्याचा हव्यास प्राथमिक मनुष्याला असे. ह्याचीच परिणती होत होत जमिनीवर व पाण्यावर स्वतःच्या उपयोगाकरता नाना प्रकारची भांडी बनविण्याची कला मनुष्याने निर्माण केली. ही कला परिणत दशेस यावयाला हजारो किंबहुना लाखो वर्षे लागली. हे पुनः पुनः सांगण्याचे कारण नाही.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
शकपूर्व चौदाव्या शतकात आर्यांचा अंमल मितानी देशावर असण्याच्या सुमारास अरेमियन लोकांनी आर्य अक्षरसमाम्नाय बहुशः घेतला असावा आणि तोही मोडून तोडून अर्धाकच्चा केला असावा. मूलस्थानातून हिंदुस्थानात येऊन राहिल्यामुळे, मूलस्थानांत भौगर्भिक अदलाबदल झाल्यामुळे व मधील टापूत अद्याप शोध व्हावयाचा असल्यामुळे आर्यांच्या रेखाचित्रांचा व रंगचित्रांचा वगैरे पत्ता लागलेला नाही. तत्रापि पाणिनीपूर्वी आर्यांनी वर्णसमाम्नाय शोधून काढलेला होता यात बिलकुल संशय नाही. हीच पाणिनिकालीन वर्णमाला अपभ्रंश होत होत महाराष्ट्रात बालबोध या संज्ञेने प्रचलित आहे. १०. विचारसूचक अभिनय विचारप्रदर्शनार्थ साधन म्हणून ध्वनीपासून मनुष्याने एका पाठीमागून एकएक शोध करून महत्कालांतराने भाषा निर्माण केली व चित्रांपासून अक्षरे निर्माण केली. ह्या दोन सृष्ट्या उत्पन्न करण्याच्या प्रारंभाच्याही पूर्वी तिस-या एका साधनाचा मनुष्याने उपक्रम केला. ते साधन हावभाव ऊर्फ विक्षेप हे होय. ह्या साधनाचा प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी उल्लेख केला आहे. या साधनाची प्राथमिक मनुष्यांत जी स्थिती होती तीच स्थिती सध्याही आहे. भाषा व अक्षरे यांच्या अवाढव्य प्रगतीमुळे विचारप्रदर्शन व व्यवहार करण्याच्या कामी हे साधन सुधारण्याची आवश्यकता नव्हती, आणि भाषा व अक्षरे यांच्या अभावी आवश्यकता असती तत्रापि भाषा व अक्षरे जे ब्रह्मांड काम करतात ते करण्याची या साधनाची क्षमताही नाही. तत्रापि बोलण्याला पोषक दुजोरा म्हणून याची विचारप्रदर्शनाच्या कामी ज्यांना भाषा कळत नाही त्या पशुपक्ष्यांशी व्यवहार करण्याच्या कामी, व भाषा आणि अक्षरे यांनी जे विचार व विकार प्रदर्शित करता येणे मुष्कील आहे ते विचारविकार दाखविण्याच्या कामी, ह्या साधनाचा मनुष्यप्राणी अतिशय उपयोग करीत आलेला आहे व त्यास त्याने व्यवहारक्षमताही आणलेली आहे. नैसर्गिक हावभावांचे परिणत व कृत्रिम रूप म्हटले म्हणजे ज्यास अभिनय म्हणतात तो होय. अनुकरणात्मक ध्वनीचे भाषा हे जसे परिणत व कृत्रिम रूप, किंवा अनुकरणात्मक रेघांचे अक्षर हे जसे परिणत व कृत्रिम रूप, तसेच अनुकरणात्मक सहज विक्षेपांचे अभिनय हे परिणत व कृत्रिम रूप आहे.
महिकावती (माहीम)ची बखर
४२. उत्तरकोंकणांतील हे लोक देव, वंश व जाति ह्या तीन कादंब-यांचें बेसुमार पान करून झिंगल्या कारणानें, त्यांच्यांत एकसमाजत्वाचा प्रादुर्भाव होणें जितकें अशक्य होतें तितकें च एकराज्यत्वाचा उदय होणें असंभाव्य होतें. कातवड्याला प्राचीन कालीं राजा, राज्य व राष्ट्र हे शब्द देखील अपरिचित होते. आर्यांच्या संसर्गानें तो पुढें आपल्याला वनचा राजा म्हणूं लागला इतकें च. राजा हा शब्द कातवड्याच्या मुळे भाषेंतील अनार्य नाहीं. यहुदी व पारशी हे इतके पराकाष्टेचे दुर्बल, पंगू व भुकेबंगाल होते की राजा हा अर्थ यद्यपि त्यांना अवगत होता तत्रापि त्या अर्थाचा साक्षात्कार करून दाखविण्याची धमक उत्तरकोंकणांत ते कधीं दाखवितील अशी कल्पना हि संभाव्य कोटींतील नव्हती. बाकी राहिले मराठे, मुसुलमान व पोर्तुगीज. हे तिघे हि बाहेरून उत्तरकोंकणांत प्रवेश करून, मुक्तद्वारी व तुटक अश्या विपुलान्न व सुलभान्न लोकांत येऊन त्यांना जिची यत्किंचित् जरूर नव्हती त्या राज्यसंस्थेची ऊर्फ सरकारची स्थापना जबरदस्तीनें स्वार्था साठीं म्हणजे स्वत:चें पोट जाळण्या साठीं करिते झाले, आणि राज्यस्थापने नंतर देशांतील इतर लेाकां प्रमाणें अन्नवैपुल्या मुळें व अन्नसौलभ्या मुळें मुक्तद्वारी, तुटक, उदासीन व राजकारणविमुख बनले. हिंदूंतील क्षत्रिय व ब्राह्मण ह्यांचा तर राजा, राज्य व राष्ट्र ह्या तीन शब्दांचा घोष वेदकाला पासून चालू आहे. जेथें जातील तेथें राष्ट्र उत्पन्न करण्याचा ब्राह्मणक्षत्रियांचा मोठा हव्यास, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व त्यांचीं ब्राह्मणें ह्यांच्यांत राजा,राज्य, राष्ट्र, साम्राज्य, बृहद्राज्य, एकराट्, विराट्, गणराट्, अधिराट्, इत्यादि राजकीय शब्दांची रेलचेल पाहिली व राज्यविषयक प्रार्थना पाहिल्या म्हणजे राजा व राष्ट्र हे अर्थ ब्राह्मणक्षत्रियांच्या हाडींमाशीं किती खिळले होते त्याची कल्पना होते. असे हे ब्राह्मणक्षत्रिय सुद्धां उत्तरकोंकणांतील विपुलान्न हवेंत इतर लोकांच्या प्रमाणें च राजसंस्थोदासीन होऊन बसले. ते इतके कीं आफ्रिकेंतील अर्ध रानटी शामळ व मध्यआशियांतील उनाड मोंगल ह्यांनीं अधाशीपणें राज्ययंत्र पटकाविलें असतां तुडुंब पोट भरलेल्या ब्राह्मणक्षत्रियांनीं तिकडे कानाडोळा केला. मुसुलमानांनीं हि पोर्तुगीजां पुढें तो च कित्ता गिरविला. पुढें पोर्तुगीजांची व त्यांच्या बाट्यांची पाळी आली तेव्हां चित्पावनां पुढें बाट्ये तर पहिले छूट वठणीस आले. परंतु पोट न भरलेल्या अस्सल पोर्तुगीजांनीं मात्र प्रिय अन्नाला चिकटून रहाण्याचा हट्ट प्राण जाई तों पर्यंत मुंग्या प्रमाणें धरिला. अन्नसंपन्न उत्तरकोंकणांत राजा, राज्य, राष्ट्र व राज्ययंत्र एतत्संबंधानें माणूस उदासीन कां व कसें होतें त्याचा हा असा इतिहास व हिशेब आहे. राज्ययंत्राची येथें फारशी जरूर च नाहीं. उत्तरकोंकणचा हा दाखला सबंद भारतवर्षाला खुशाल लावावा. राष्ट्र, राष्ट्र, राष्ट्र म्हणून वेदघोष करणारे अन्नतृप्त ब्राह्मणक्षत्रिय जेथें राष्ट्रविन्मुख व समाजसन्यस्त होण्यांत भूषण मानूं लागले, तेथें मुदलांत च नको असलेलें राज्ययंत्र चालविण्याचे काबाडकष्ट भुकेबंगाल पोर्तुगीजादि यूरोपीयन लोक व आरब, अफगान, मोंगल वगैरे आशियाटिक लोक च फक्त करूं इछीत. तदितरांना हा खटाटोप निरर्थक भासे. राष्ट्र व एकराष्ट्र हा अर्थ ह्या अन्नसंपन्न देशांत रुजण्या सारखा व आवश्यक भासण्या सारखा नसे. राष्ट्र होण्याची ज्यांना जरूर नव्हती त्यांना एकसमाज हि होण्याची आवश्यकता नव्हती हें सांगावयाला नको च.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
९. अक्षर व वर्ण
अक्षरसंस्थानाचा हा असा समाम्नाय म्हणजे परंपरा आहे. (१) सबंध प्रसंगाचे मिश्र चित्र, (२) सुटे चित्र, (३) चित्राचा भाग, (४) सरळ रेघा, (५) वक्र रेषा, (६) शब्ददर्शक रेघा, (७) शब्दावयवदर्शक रेघा, व (८) शेवटी साध्या मूळध्वनीच्या सरळवक्र रेखामय खुणा ऊर्फ मूळाक्षरे, अशी लांब परंपरा आहे. चित्रणे व लिहिणे यांची प्राक्सिद्धी झाल्यावाचून मूळाक्षरांची सिद्धी शक्य नाही. मूळाक्षरांच्या पूर्वी चित्र काढणे व रेषा काढणे या क्रियांचे ज्ञान मनुष्याला अवश्य आहे. अर्थात ज्यांना मूळाक्षरे माहीत आहेत ते लोक स्वतः तरी किंवा ज्यांच्यापासून त्यांनी मूळाक्षरे उसनी घेतली ते लोक लिहिण्याच्या टप्प्यावरून अगोदर गेले असले पाहिजेत. वर उल्लेखिलेल्या आठ पाय-या चढल्याशिवाय मिश्रध्वनीचे मूलध्वनीत पृथक्करण करता येणे संभाव्यसुद्धा नाही, मग शक्य कोठून असेल ? सुलभ व सोईस्कर मूळाक्षरांच्या शोधावर येत असताना व आल्यावर नंतर मूलध्वनीचे पृथक्करण मनुष्याला शक्य झाले. वैदिक आर्यांनी ज्या काली अक्षरांचा शोध केला त्या काली अक्षरांना ते वर्ण या संज्ञेनेही ओळखीत. वर्ण व अक्षर हे दोन शब्द शकपूर्व १००० च्या सुमारास झालेल्या पाणिनीच्या अष्टाध्यायीत गृहीत धरलेले आहेत. वर्ण म्हणजे रंगाने काढलेली ध्वनीची खूण व अक्षर म्हणजे ध्वनीची न बदलणारी खूण. -हस्वं लघु व दीर्घ च, या दोन सूत्रांत -हस्वं या नपुसकलिंगी रूपांपुढे उच्चार हा पुल्लिंगी शब्द अध्याहृत समजता येत नाही, अक्षर किंवा वर्ण हे दोन नपुंसकलिंगी शब्दच अध्याहरणे भाग पडते. अक्षर व वर्ण ह्यांच्यात भेद असा आहे की लोखंडी शलाकेने फळा पाटी, दगड वगैरे कठीण भूमीवर खोदून जी आकृती निघते तिला अक्षर म्हणत व भूर्जपत्रादि मऊ भूमीवर रंगाने काढलेल्या आकृतीस वर्ण म्हणत. शलाकादी कठीण पदार्थांनी दगडावर रेखाचित्रे व रंगांनी रंगचित्रे काढण्याची कला अत्यंत प्राथमिक मनुष्याला माहीत होती, हे सुप्रसिद्ध आहे. तेव्हा पाणिनिकालीन आर्यांना ह्या लेखनाच्या दोन्ही त-हा माहीत होत्या हे सांगणे नको. इतकेच नव्हे तर रेघांच्या खुणांनी संख्यादर्शक ध्वनी दर्शविण्याची कला ऋग्वेदकालीच माहीत होती, हे पंचकर्ण्य: व अष्टकर्ण्य: ह्या रूपांवरून सर्वमान्य आहे. सबब, अरेमियन लोकांपासून अक्षरे हिंदूंनी उसनी घेतली असावी इत्यादी तर्क सयुक्तिक दिसत नाहीत. उलट अरेमियन लोकांनी आर्यांच्यापासून अक्षरे काढण्याची व अक्षरसमाम्नायाची कला उचलली असावी, असे दिसते.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
८. मूळाक्षरांची लिपी
परंतु ही कला कालांतराने फार अवजड झाली. जेवढ्या म्हणून वस्तू व कल्पना मनुष्याला अवगत होत्या त्या हजारो वस्तूंची व कल्पनांची हजारो चित्रे काढावी लागत व त्यांचे अर्थ ध्यानात ठेवावे लागत. शिवाय निरनिराळे कलावंत एकाच वस्तूची निरनिराळी चित्रे काढून घोटाळा मजवीत असतील तो निराळाच. सबंद प्राणी काढण्याचे सोडून दिले, तरी प्राण्यांच्या मुंडक्यांची, कानांची, खुरांची, चोचींची व शेपटांची चित्रे काढणे आणि हसणे, लाजणे, खाणे, पळणे इत्यादी क्रियांची चित्रे काढणे फार बेताल भासू लागले. ह्या भानगडीतूनही कल्पक मनुष्याने रस्ता काढला. साक्षात् मुंडकी, कान काढण्याऐवजी उभ्या, आडव्या, तिरप्या वाकड्या, वक्र, खाली, वर, पुढे व मागे, रेघा काढून वस्तू व शब्द दाखविण्याची युक्ती निघाली. रेघोट्यांत आकृतीचा चित्रपणा व वस्तुदर्शनत्व सहजच मागे पडत चालले व त्या फक्त शब्दांच्या व तदद्वारा वस्तूच्या बोधक झाल्या. रेघोट्या शब्द दाखवीत, त्यामुळे त्यांची संख्या शेकडोंनी मोजावी लागे. शब्द फोडून त्यांतील निरनिराळे अवयव विवक्षित रेघांनी दर्शविण्याची क्लृप्ती ही ह्यापुढील पायरी होय. तत्रापि हजार पाचशे खुणा ध्यानात ठेवाव्या लागतच. शेवटी शब्दावयव ज्या साध्या ध्वनीचे बनलेले असतात त्या साध्या ध्वनींच्या दर्शक अशा खुणा अस्तित्वात आल्या, म्हणजे मातृका म्हणून ज्यास संस्कृत शब्द आहे त्यांचा शोध झाला. ह्या मातृकांना म्हणजे मोजक्या विवक्षित खुणांना संस्कृतांत अक्षरे म्हणजे न बदलणा-या कायमच्या खुणा असे अन्वर्थक नांव पडले. मूळाक्षरांचा शोध हा असा पायरीपायरीने व बहुत प्रयासाने लागलेला आहे, एकदम नव्याने कोणी निर्माण केला असा अर्थ नाही. मूलाक्षरे ही अगदी साध्या अत्यंत पृथक्कृत ध्वनीची तेवढी दर्शक आहेत, वस्तू किंवा कल्पना किंवा शब्द यांची दर्शक नाहीत. चित्रावरून अक्षरापर्यंत येता येता, वस्तू व कल्पना यांना अजिबात काट मिळून फक्त साधा पृथक्कृत ध्वनी तेवढा राहिला.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
७. चित्रलिपीचा उदय
सुट्या ध्वनिसाधनाने तीन बाबींचा बोध होतो : (१) बाह्य वस्तु , (२) त्या वस्तूची मनातील कल्पना आणि (३) बाह्य वस्तू व आंतर कल्पना यांचा दर्शक स्वतः शब्द. प्राथमिक मनुष्य चित्राने प्रथम बाह्य वस्तू दाखवू लागला. मग त्या वस्तूला नाव म्हणजे शब्द म्हणजे ध्वनी त्याने दिला असो किंवा नसो. कालांतराने त्याच्या असे लक्षात आले की, चित्र जी वस्तू दर्शविते त्या वस्तूचा जो ध्वनी त्या ध्वनीचेही दर्शक चित्र होऊ शकेल. एथपासून चित्र ध्वनीचे म्हणजे वस्तुदर्शक शब्दाचे दर्शक झाले. घोड्याचे चित्र घोडा या वस्तूचे जसे दर्शक तसेच घोडा या शब्दाचे दर्शक झाले. पुढे असे सुचले की घोड्याचा संबंध सगळा आकार काढण्यापेक्षा नुसता घोड्याचा मुखवटा काढला तरी तेवढा मुखवटाच घोडा शब्दाचा दर्शक होऊ शकेल. ह्या युक्तीने चित्रानी शब्द दर्शविण्याला उघडच जास्त सोईचे झाले. चित्रलेखनाने वस्तूही ध्यानात येई व शब्दही ध्यानात येई. चित्रलेखनात शब्दांचे समास देखील दाखविता येत. तडागांतर्गत मच्छः ह्या शब्दसमासाचा किंवा कल्पनासमासाचा चित्रसमास तळ्याच्या चित्रात माशाचे चित्र काढून दाखविला जाई. एणेप्रमाणे चित्रलेखनाची कला अस्तित्वात आली.