श्लोक
बकदालभ्यं यदा गेात्रं प्रभावति कुलदेवतः ।।
ठाणे स्थाने कृतं राज्यं मम मुद्रा विराजितं ॥ १ ॥
ऐसिं खतें राया नागरस्याने पाहीली ॥ त्या वरि आपण हि सहि घातली ।। त्यांचिं त्यांपें दिधली ।। मग पाठविले घरोघरीं ।। त्या उपरांत राणि कोनि नीघाली ।। पुत्र जाला तेधवां नागरस्याने बहु धर्म केला ॥ ठाण्या हवालदारासिं पत्र लिहिलें ।। धर्म लक्ष दमाचा ।। माहिमा जोतिषि वर्ताळा करोन नामाक्षर केलें ।। नाम त्रिपुरकुमर ठेविले ।। ब्राह्मणासि लक्ष दाम दिधले ।। त्या उपरांत चेउल चंपावति तेथे राजा भोज तो प्रमादला ।। त्याचं हि कुळि पुत्र नाहि म्हणोन तें हि राज्य नागरस्यासि जालें ।। मग दळ रायें नागरसें आपुले देशोदेशि ठेविलें ॥ ते संख्या ।। चेवलास राजप्रधान आणि दळ घोडे २००० हस्ति १४ ।। सजणगांवी ठेविलें घोडे ९०० हस्ति ६॥ सैलान ठेविले घोडे २०० हस्ति ५।। चिखलिनवसारि ठेविले ५० ॥ प्रदापुर ठेविले २०० हस्ति १ ॥ मुळगांवि ठेविले १०० ।। ठाण्या ठेविले १००० हस्ति ५ ।। एवं अवघे दळ चार सहश्र नवस ॥ हस्तिं ३० ।। या उपरांत मेहुणा नागरस्याचा बोलिला जर तुह्मि अवघा देश काबिज केला सत्ता आपुलि चालविता तर मी जे काहि तुमचे समागमि आलों मला काहि ठिकाण द्यावें ।। जें मी नेमिलें आहे तें सांगतों ।। ठाणे मालाड व मरोळ हे तीन गावें आपणासिं द्यावें ।। तेधवां नागरस्या बोलिला जर अवघा देश तुमचा आहे ।। परंतु हे तीन ठिकाणे सांडोन दुसरिं पाहिजतिल तीं सुखें घ्यावी ॥ तेधवां शब्द अमान्यता दिसोन आला म्हणोन तिघे भाव फिरावण जाले ।। ते तेथोन निघाले ।। ते देवगिरिस जावोन रामदेरायासी भेटले ॥ वृतांत सांगितला जर अवघे कोकण यावत् चंपावति राज्य नागरसें घेतलें ॥ आमचे बळें ।। आतां फिरावण जाला ॥ आम्हासि दवडिलें ।। ह्मणोन शरण तुजला ।। जर आम्हास साह्यें तुह्मी व्हावें ।। राज्य नागरस्याचें घ्यावें ।। आईकोन रामदेराव आपले दळे त्यांसि साह्मे होवोन नागरस्या वरि चाल केलि ।। कटक ठाण्यासिं आलें ।। खबर राया नागरस्यासि कळली ।। तेधवां चेदणिकर पाटेल आपले दळे रामदेरायासि भीडला ॥ युद्ध थोर जालें ।। ठाण्या होवोन कळ व्यास पिटाळोन रामदेराय घातला ॥ जहर केला ती खबर राया नागरस्यासि पावली ।। जे चेंदणिकर पाटेल आपलें परिवारें युद्ध केले ।। तवं राजा ठाण्यासि आला ॥ सर्वांसि भेटला ।। चेंदणिकर पाटेल बोलावोन आणिला ।। सभे माजि नावाजिला ।। छत्र सुवर्णकळसाचें दिधले ।। मग नागरस्याचा पुत्र त्रिपुरकुमर पित्रु-आज्ञा घेउन शेषवंशाचि बहु योजोन युद्धि प्रवर्तला । युद्ध थोर जालें ॥ मग त्याहि काढावा काढिला ।। माहुलि प्रवेशले ।। तेथे ही त्रिपुरकुमर पावला ॥ दळाधिपति हेमपंडित हारविला ॥ दळ भंगिलें ।। ऐसें नागरस्याचें पुत्रास जालें ।। नानोजी ।। विकोजी ।। व बाळकोजी हें हि हारविलें ॥ मग त्रिपुरकुमर येशस्वी आपुले गांवि आला ।। रायासिं भेटला ।। तेधवां माहिमकर म्हातारा दादपुरो थोर झुंजला ।। ह्मणोन रानवटकर पद राणे पावला ।। राणेपद राया नागरसें दिधले ।। हें देणे राया नागरस्याचें ।। व पाटेकर अनमानिले ।। दळवाडियेसि नव-अर्बुदे नाव ठेविलें ॥ दुसरे बहु झुंजले त्यासि नांव बहुतका पदाचिं दीधली ।। पाटकर आणि राणे हे पूर्वसमंधि ह्मणोन पालवण कडु-पद चालोन आले ।। साष्टिचा देसला आपले दळें बहुत झुंजला ।। स्यासि सरचौक आधिकारिपद जालें ॥ गोहारिकरा पाईकाला विराण दिधलें ।। नाउरकरांला नेजा काहाळा ।। कांधवळकरांला घोडा दिधला ।। साहारकरा पाईकां पाटवृंदे ।। हें देणे राया नागरस्याच ॥ छ ।। ॥ छ ।।
त्याउपर देवगिरिचा राजा रामदेराव त्याणे जोडा अहिनळवाडापाटणि लिहिला जर राजश्री जयसिंगदेवो जर केशवदेव निमाला ॥ ह्मणोन राजा नागरस्या घणदिवा होवोन येवोन राज्य घेतलें ।। देश आपला केला ।। त्याचे मेहुणे नानोजी व विकोजि व बाळकोजी माहाल मागतां त्यास अमान्यता केलि ।। म्हणोन आम्हास शरण जाणोन आपण हल्ला केला ।। तो निर्फळ गेला ।। म्हणोन तुह्मास लीहितों ।। जर साह्य आपण होवोन चढाये करावी ॥ राज्य घ्यावें ।। आपलें वृत शरणांगतास रक्षावें ।। ह्मणोन लिहितों की पत्र देखतां मुहिम आदरावीं ।। आह्मि सीद्ध असों ।। पत्र प्रविष्ट होतां च राजपुत्र आनंददेव दाहासहस्त्र अश्वासि अहिनळवाडेपाटणा होवोन निघाला तो देवगिरिस आला ।। रामदेरायासिं भेटला ।। तैसि च फौज कोकणा आलि ।। वेसावे प्रथम घेतलें ।। तेथोन आंधेरिसी आले ।। तेथे युद्ध थोर जालें ।। धावणे सिंध्याचे पावले ।। मारामारि जाली ॥ तेथे अहिनळवाडे-पाटणिचा राजपुत्र पडला ।। त्याची स्त्रि आधेरिस सती निघाली ।। तेथोन मोड जाली ।। छ ।।