श्रीगणेशायनमः
।। श्री कुळदेवतायनमः ।। श्रीगुरुचरणकमलेभ्यों नमः ॥
स्वस्ति श्रीनृपविक्रमार्कसमयांतिसंवत ११२५ तत् राजिंद्रचक्रचूडामणौ शालिवान-शके १०६० शशीरुतौ महामांगल्यमासोत्तम-माघमासे शुक्लपक्षें ५ सोमवासरे तद्दिनी अहिनळवाडेपाटण तत्समीप चांपानेरपच्यासि प्रगणे मुख्य माहालें तेथें राजा सूर्यवंशि प्रतापबिंब गोत्र भारद्वाज पंचप्रवर शाखा कात्यायनि कुळदेवता ॥ प्रभावति त्याणे जेष्टबंधु जवंळान्न मुहिम करों आदरिलीं ॥ ते वेळि जमा सेनादिपति नाइकराव व सरकारकोन रघुनाथपंत बोलावोन दृढाव केला ।। जरि चढाये कोकणि करावी ।। तत् समइं राजगुरु हेमाडपंडित यजुर्वेदि माध्यान वाजस्त्रि-शाखा भार्गव-गोत्र त्रिप्रवररान्वित कुळदैवत चंडिका सप्तश्रंगि उपनावं चामरे ।। त्यांसी विनंति केलि जरि स्वामिने कृपा करोन आमचे समागमि यावें ।। तेधवां सुमुर्त राजा प्रतापबिंब १० सहस्त्र अश्वासि चालि केलि ।। राया समागमि सरसुभेदार ।। केशवराव सोमवंशि ॥ गोत्र बकदालभ्य ॥ कुळदेवता पद्मावती ।। आणि सरसबनीस शेषवंशि आनंदराव ॥ गोत्र हरित ।। कुळदेवता हीरबादेवी व सरचिटणिस गंभिरराव सूर्यवंशि ॥ गोत्र वशिष्ट ।। कुलदेवता काळिका ।। व हवालदार सोमवंशि पुरुषोत्तम ॥ गोत्र गौतम ।। कुळदेवता नारायणी ॥ व मुजुमदार सोमवंशि ।। गोत्र विश्वामित्र ।। कुळदेवता ललिता ! व कोटवाल पटवर्धन गंगाजी ।। गोत्र रेणुक ॥ कुळदेवता योगेश्वरी ।। व मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशि ।। गौत्र कौंडण्य ।। कुळदेवता कुमारिका ॥ हा सर्व समुदाय घेवोन चाल केली ।। राजा प्रतापबींब सहकुटुंबि पैठणि आला ॥ तथ राजा विक्रमभोंम सूर्यवंशि त्याणे अतिभ्य विशेष करोन राया प्रतापबिंबास सन्मानल ।। विनति करोन रायास पैठणि स्थिरावलें। वर्षे २ राजा प्रतापबिंब पैठणी राहिला ।। ईतक्यांत मुख्य प्रधान बाळकृष्ण राव बोलता जाला ॥ जर लस्करि खाजना लघु जाणोन मुहिम कोकणि अनमानिली । बुद्धा रायासिं मानली ॥ तेधवां हंकारा कला सैन्य चालिलें ॥ तेधवां पैठणा होउन दशल हरबाज राया समागमी आपले परिवारें निघाले ।। व बाळाजि सिंधा राया समागमी आपल परिवारे ।। सरजमातदार राजयुद्धी प्रखर जाणोन या विक्रमभामें पानपटि देवोन पाठविला ।। सहश्र दोन घोडे ताबी रायान दिधले ।। दक्षणे चालि केली ॥ ते येवोन दवणे प्रविष्ट जाले ॥ तेथे राजा काळोजि सीरण्या त्यास हेर पावतां च शरण तो जाला ।। लोढि दवण यावत् चिखली काबिज केलि ।। मुलुख उद्दस देखोन रायें विचार केला ॥ रम्य स्थळ समुद्रतीर देखोन संतोषला ।। तेथे कुळकर्णिक हरबाजि कायस्त ठेविला ।। आपण राजा दळेसि चाल केली ॥ तारापुरा पासोन यावत् महिकावती प्रविष्ट जाले ।। तेथे राजा विनाजी घोडेल ॥ त्यास दुर करोन ।। राजा महिकावतिस राहिला ।। देशाचि जमा पाहिली ॥ देश उद्दश ठाइं ठाइं अतिशुद्र घोडेल निचयाति उघडे लोक देखोन विचार मांडिला ।। जर या देशिं भले लोक असते तर देश वसाईत होईल ॥ ईतक्यांत मुख्य प्रधान बोलता जाला ।। जरि स्वामिने आपले दृष्टि प्रथम देशाचि जमि पाहावी ।। कीतिक प्रगाणे माहाले स्थापणे ॥ त्या प्रमाणे केलें जाईल ॥ बारा सहश्र फौजीस आदा पाहावा ।। मग जो विचार केला तो केला जाइल ।। वचन रायासिं मानलें ।। बोलता जाला जर तुह्मी दळ घेवोन मोहिम करावी ॥ देशाचि जमी पाहावी ॥ यावत् वाळकेश्वरि जावें ॥ देश काबिज करावा ॥ मुलुख पाहावा ।। त्या प्रमाणे केलें जाईल ।। म्हणोन मुख्य प्रधान बाळकृष्णरावसंन्निध जाब केला ॥ जर आज्ञा प्रमाण स्वामिची ॥ विडा रायें दिधला ॥ हंकारा केला दळ सवें दाहा सहश्र ॥ देवोन रवाना केला ।। मग महीकावति होन प्रधान निघाले ।। थेट हाटदळ पापडि पावले ।। तेथोंन ठाणे-कोकणा प्रविष्ट जाले ॥ तेथे राजा येशवंतराव त्यासि युद्ध जालें ।। येशवंतराव मारिला ।। राज्य घेतलें ।। कळव्यांत ग्रामस्त कोकाट्या तो हि शरण आला ।। प्रगाणा पाहिला ।। चित्तास आला ॥ मग तेथोन मठास गेले ।। तेथे देवालय हरबादेवि ग्रामदेवता ।। आणि मुक्तेश्वर देव ।। तडाग ब्रह्मकुंड ।। ये साव्या पासुन जुहु ॥ यावत् वाहिनळें ॥ राजण फार पाहोन वाळुकेश्वरि गेले ।। बाप्पगंगा देखिली ।। हनुमाप्रतिमा लक्षिली ।। तेथें स्थिर जाले दिवस ५ ॥ मग तेथोन जमि पाहिली ॥ गणति जमिची पाहातां ॥ यावत् वाळुकेश्वर महिकावति मध्य ।। विलाथ अगणित पके कोस २८ महाअरण्य उद्दस जाणोन ।। कागद राया प्रति लीहिला ।। जर अवधि जमि देशाचि पाहिली ।। गणति कोस २८ पके जाणिजे ।। आज्ञा प्रमाण रायाचि ॥ जे विलाथ उद्दस जाणोन जें विनवाल तें केलें जाईल ॥ पत्र महिकावति प्रविष्ट जाले ॥ रायानें वाचिलें । वर्तमान मनास आणिला ।। तेघवा राजा आपण ।। महिकावति होवान ।। हंकारा केला ।। ठाणेयासि येवोन राहिला ।। विलाथ आपले दृष्टि पाहिली ॥ ते चित्तास आली ।।