Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
संस्कृत भाषेचा उलगडा
४६ वरील पृथक्करणावरून दिसून आले की पूर्ववैदिकभाषात दोन प्रकारची पुरुषवाचकसर्वनामे असत, १) आत्मनायक ऊर्फ स्वस्मायक ऊर्फ अन्यव्यावर्तक सर्वनामे व २) परस्मायक ऊर्फ अन्यसमावर्तक ऊर्फ अन्यसमावेशक सर्वनामे. आत्मनायक सर्वनामांना आत्मनेपदे म्हटले असता चालेल व परस्मायक सर्वनामांना परस्मैपदे म्हटले असता चालेल. धातूंच्या पुढे आत्मनेपदे लावली म्हणजे त्या धातूंना आत्मनेपदी धातू म्हणत व परस्मैपदे लावली म्हणजे परस्मैपदी धातू म्हणत. आत्मनेपदी धातूंची रूपे क्रियाफलाचे कर्तृगामित्व दाखवीत आणि परस्मैपदी धातूंची रूपे क्रियाफलाचे कर्त्रितरगामित्व दाखवीत. असा भेद का होई याबाबींचे कारण दुसरे तिसरे काही एक नसून, एकच असे आहे की पूर्ववैदिकभाषात आत्मनायक व परस्मायक अशी दोन प्रकारची सर्वनामे असत व ती धातूंपुढे लावली म्हणजे सहजच क्रियेचे भोक्तृत्व इतरांना वर्जून फक्त कर्त्याकडे जाणारे किंवा कर्त्याबरोबर इतरांचा समावेश करणारे होई. संस्कृतभाषेतील आत्मनेपदी व परस्मैपदी असे जे धातूंचे दोन मोठे वर्ग आहेत ते वर्ग बनण्याचे गुह्य याहून जास्त खोल नाही.
संस्कृत भाषेचा उलगडा
लोट् आत्मने
एकवचनी अ उपसर्ग, द्विवचनी आ किंवा इ उपसर्ग व त्रिवचनी अ उपसर्ग लागतो. एकवचनी व अनेकवचनी उपसर्ग वैकल्पिक.
सर्वनामसिद्धी
तु + अ= त्व = स्व
बाकी लुङ् प्रमाणे
पच् धातु : पचस्व, पचेथाम्, पचध्वम्
बिभृ धातु : बिभृष्व, बिभ्राथाम्, बिभृध्वम्
लिङ् आत्मने
लुङ् प्रमाणे सर्व व्यवस्था
बिभ्री धातु : बिभ्रीथा:, बिभ्रीयाथाम्, बिभ्रीध्वम्
इ. इ. इ.
संस्कृत भाषेचा उलगडा
लुङ्, लङ्, लृङ् आत्मने
एकवचनी अ उपसर्ग, द्विवचनी आ किंवा इ उपसर्ग व त्रिवचनी अ उपसर्ग लागतात. एकवचनी व त्रिवचनी उपसर्ग न लागला तरी चालतो. सर्वनामसिद्धी उत्तमपुरुषावरून होते.
सर्वनामसिद्धी
तु + अहम् = त्वहम् = त्वाह् = थाह्
तु + आवाम् = त्वावाम् = त्वाम् = थाम्
तु + वयम् = त्वअम् = थ्वम्
उपसर्ग लागून,
अपच् धातु : अपचथा:, अपचेथाम्, अपचध्वम्
अबिभृ धातु : अबिभृथा:, अबिभ्राथाम्, अबिभृध्वस्
लिट् आत्मने
द्विवचनी आ उपसर्ग लागतो.
सर्वनामसिद्धी
लट्प्रमाणे
से आथे ध्वे
चकृ धातु : चकृषे, चक्राथे, चकृढेव
संस्कृत भाषेचा उलगडा
४५ आत्मनायक मध्यमपुरुषसर्वनामाची साधनिका :
लट्, लुट्, लृट् आत्मने
एकवचनी अ उपसर्गा, द्विवचनी आ किंवा इ उपसर्ग व त्रिवचनी अ उपसर्ग लागतात. तिन्ही वचनी ए हा स्वार्थक प्रत्यय लागतो. उत्तमपुरुषसर्वनामाला तु उपसर्ग लागून मध्यमपुरुषसर्वनामे बनतात. एकवचनी व अनेकवचनी उपसर्ग न लागता, विकल्पाने रूप तसेच रहाते.
सर्वनामसिद्धी
तु+ म् = त्व् = स्
तु + वह् = त्वह् + थ्
तु + मह् = त्मह् = ध्व्
ए प्रत्यय लागून,
स् + ए = से
थ् + ए = थे
ध्व् = ए = ध्वे
वचनोपसर्ग लागून,
पच् धातु : पचसे, पचेथे, पचध्वे
बिभृ धातु : बिभृषे, बिभ्राथे, बिभृध्वे
संस्कृत भाषेचा उलगडा
लिङ् आत्मने
परस्मायक रूपांना इ प्रत्याय लावला म्हणजे आत्मनायक रूपे होतात.
१ अम् + इ = अमि = अइ = इ
२ वह् (व) + इ = वहि
३ मह् (म) + इ = महि
पचेय् धातु : पचेय् + इ = पचेयि = पचेय
* पूर्ववैदिकभाषांत इ व ए यांचे उच्चार य सारखे होत.
पचेय् + वहि = पचेवहि (य स्वराचा मागील ए त लोप )
पचेय् + महि = पचेमहि ( ,, ,, ,,)
व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश
अजंभट [ अथ्यम = अज्जम = अजम्.
अजम्+भट=अजंभट ] (भा. इ. १८३४)
अजेसेन [ अजितसेन = अजियसेण = अजेसेन ] (भा. इ. १८३५)
अन्त्या [ अनन्त = अंत्या (एकशेष) ] विशेषनाम ). (भा. इ. १८३६)
अंदोजी, अंधोजी [ अंधक ( यदुवंशीय) = अंदोजी, अंधोजी ]
अनुबाई [ अनसूया = अन्, अनी (एकशेष ) ] (भा. इ. १८३६ )
अन्या, अन्याबा [ अनन्त = अन्या (एकशेष) अन्याबा (बहुमानदर्शक) ] (भा. इ. १८३६)
अंबिके [ अंबिके ] ( दासींचीं नांवें पहा)
अबू [ अभिभू (काशीराजाचा पुत्र-भारत) = अबूजी ]
अंबे [ अंब ] ( दासींचीं नांवें पहा)
अर्जोजी [ अर्जुनादित्य = अर्जोजी ] ( आदित्य पहा)
अहिमणी [ अभिमन्यु = अहिमणी (प्राकृत ) ]
आदित्य - अर्जुनादित्य = अर्जोजी
कृष्णादित्य = कन्हू (कन्हचें ममतादर्शक) + जी = कान्होजी
धनादित्य = धनाजी
नागादित्य = नागोजी, नागाजी
परशुरामादित्य = परस ( एकशेष ) + जी = परसाजी, परसोजी
बालादित्य = बालाजी, बाळाजी, बाळोजी
भगादित्य = बगाजी, बगोजी
भीमादित्य = भिउजी, भिमाजी, भिमोजी
मानादित्य = मानाजी, मानोजी
यशआदित्य = एसाजी
युद्धिष्ठिरादित्य = जोध (एकशेष) जी = जोधाजी
रघुनाथादित्य = रघोजी, रघुजी, रघाजी
राजादित्य = राजाजी, राउजी
रामादित्य = रामाजी, रामोजी
लक्ष्मणादित्य = लखाजी, लखजी, लुकजी, लखुजी
संस्कृत भाषेचा उलगडा
४४ आत्मनायक उत्तमपुरुषसर्वनामांची साधनिका
लट्, लुट् लृट् आत्मने
परस्मायक रूपांना नैकट्यदर्शक ऊर्फ आत्मदर्शक ए प्रत्यय लावला म्हणजे आत्मनायक रूपे सिद्ध होतात.
पच् धातु : पचे, पचावहे, पचामहे
द्विष् धातु : द्विषे, द्विष्वहे, द्विष्महे
लुङ्, लङ्, लृङ आत्मने
परस्मायक रूपांना नैकट्यदर्शक ऊर्फ आत्मार्थक इ प्रत्यय लावला म्हणजे आत्मनायक रूपे बनतात.
अपच् धातु : अपचे, अपचावहि, अपचामहि
अद्विष धातु : अद्विषि, अद्विषावहि, अद्विषामहि
संस्कृत भाषेचा उलगडा
लिङ् आत्मने
त, आताम्, इरन् हे प्रत्यय आहेत. त् + अ= त; आ + त् + आम् = आताम्; इर् + अन् = इरन्.
द्विषी जोड धातु :ह्न द्विषी + त = द्विषीत
द्विषी + आताम् = द्विषीयाताम्
द्विषी + इरन् = द्विषीरन्
संस्कृत भाषेचा उलगडा
लोट् आत्मने
त् सर्वनामाला सामीप्यदर्शक आम् प्रत्यय लागतो व एकवचनी अ उपसर्ग, द्विवचनी आ किंवा इ उपसर्ग व त्रिवचनी अन् उपसर्ग लागतो. आम् अंगीकारे म्हणून एक अव्यय संस्कृतात आहे. हा शब्द फार जुनाट आहे. अंगीकार करणे म्हणजे एखाद्या वस्तूस स्वत: जवळ आणणे. एकवचनी उपसर्ग न लागता रूप होते. अनेकवचनी अन् उपसर्गाच्या ऐवजी प्लुत अ ३ वर काम भागते.
पच् धातु : पच् + अताम् = पचताम्
पच् + इताम् = पचेताम्
पच् + अन्ताम् = पचन्ताम्
विभृ धातु : विभृ + ताम् = विभृताम्
विभृ + आताम् = विभ्राताम्
विभृ + अताम् = विभ्र ३ ताम्
संस्कृत भाषेचा उलगडा
लिट् आत्मने
त् सर्वनामाला ए हा प्रत्यय लागतो व एकवचनी उपसर्ग, द्विवचनी आ उपसर्ग व त्रिवचनी इर् उपसर्ग लागतो.
जग्म् धातु : जग्म् + ए = जग्मे
जग्म् + आते = जग्माते
जग्म् + इरे = जग्मिरे