जजु [ यज्यु ( यजुर्वेदज्ञ ) = जज्यु, जजु ] ( भा. इ. १८३६)
जनी १ [ जन्या ( करवली ) = जनी. जनिः ( सून ) = जनी ]
-२ [जानकी = जाणइ = जाणी = जणी = जनी ] ( भा. इ. १८३२ )
जनू [ जनार्दन ( एकशेष ) = जनू ]
जळंभट [जहलण = जळण = जळं. जळं + भट = जळंभट ] ( भा. इ. १८३४)
जानू १ [ जन्युः ( ब्रह्मदेव ) = जानू. जन्यः ( करवला ) = जानू ]
-२ [ जानुक = जाणुअ = जानू ] हा शब्द शाकुंतल नाटकांत श्यालाच्या भाषणांत येतो.
-३ [ जन्हुः = जानू]
जानोजी [ जन्हु = जानोजी ]
जिउ, जिउवा [ जीमूत = जीवूअ = जिऊ, जिउ, जिउवा ] जिउ, जिउबा, जिवाजी, जिवा ही विशेषनामें जीमूत पासून निघालेलीं आहेत.
जिऊ [जीमूत = जिऊअ = जिऊ (पुरुषनाम) ] (भा. इ. १८३३)
जिजा [ जया = जजा = जिजा ( स्त्रीनाम ). जिजाबाई = जया ]
जिजाबा [ ययाति ] ( जजाबा पहा )
जिवा १ [ जीमूत ] ( जिउ पहा )
-२ [ जीवक = जिवा, जिऊ ] जीवक म्हणजे दास, चाकर. जिवा, जिऊ ही शुद्रादिकांत व क्वचित् ब्राह्मणादिकांत नांवें असतात.
जिवाजी [ जीमूत ] ( जिउ पहा )
जुजुत्सु [ युयुत्सु = जुजुत्सु ( हा जपानी शब्द बहुशः आर्य आहे ) ]
जोजार [ यज्वर ( sacrificer ) = जोजार ] जोजार नागेश = यज्वर: नागेश: हें मराठी ग्रंथकाराचें नांव आहे.
जोधाजी [ युधिष्ठिरादित्य = जोध (एकशेष) + जी = जोधाजी ] ( आदित्य पहा)
ठकी [ स्थगिका ( रंडी, तांबूलकरंकवाहिनी ) = ठकिआ = ठकी ] (भा. इ. १८३३)
ठिंठाकराल - हा शब्द कधासरित्सागराच्या १२१ व्या तरंगाच्या ७२ व्या श्लोकांत आला आहे. तसाच कर्पूरमंजरींतहि टिंटाकराल आला आहे. सोमदेवानें बृहत्कथेचा तर्जुमा संस्कृतांत
यथामूल केला. तेव्हां गुणाढ्यानें ठिंठाकराल हा शब्द योजिला, असें म्हणावें लागतें. ठिंठाकराल हें कथासरित्सागरांत कितवाचें नांव आहे. हा कितव जुगारी असे.