च
च १ - त्याचें च काम झालें = तस्यैव कर्म जातं ।
त्याचें काम च झालें = तस्य कर्मैव जातं ।
त्याचें काम झालें च = तस्य मेव कर्म जातमेव ।
बरें च काम झालें = वर मेव कर्म अभूत् ।
असें च झालें पाहिजे = ईदृशमेव वृत्तं पार्थ्यते ।
महाराष्ट्रींत संस्कृत एव बद्दल च्चिय आदेश होती. च्चिअ = चि = च एव निश्चयार्थे । हा महाराष्ट्री च्चिय निपात वैदिक चित् पासून निघाला आहे हें स्पष्ट आहे. प्राकृत वैय्याकरण एव बद्दल च्चिअ आदेश होतो, असें जें म्हणतात, त्या ऐवजीं एव बद्दल वैदिक च्चिअ पासून निघालेला च्चिअ निपात महाराष्ट्रींत योजतात, असें सांगते तर तें शास्त्रशुद्ध झालें असतें.
(भा. इ. १८३३. बरेंच, असेंच इ. इ. इ. शब्द)
-२ [ त्यत् = च्चअ = च (चा-ची-चें ) ] चां-च या सर्वनामाची सप्तमी एकवचन. ( ज्ञा. अ. ९ )
चकण (णा-णी-पें) [ चक्षुष्काण = चक्कआण = चक्काण = चकण ( णा-णी-णें ) ] (भा. इ. १८३२)
चकणा [ चक्षुष्काणः ( चक्षुषा काणः ) = चकणा ]
चकती [ चक्रवृत्तं-चक्रवर्तिका = चकोती = चकती ] वाटोळी पट्टी.
चकली १ [ चष = चख = चक. चक + ली = चकली चष् चाखणें ] चकली हें एक रुचकर पक्वान्न आहे.
-२ [ (चक्कल) चक्रल = चकली ] a round eatable.
-३ [ शष्कुलि = चख्खुलि = चखली = चकली ] एका प्रकारचें पक्वान्न. ( भा. इ. १८३६ )
-४ [शष्कुली = चकुली = चकली ] शष्कुली म्हणून एक पक्वान्न होतें.
चकवा [ चक्रवाकः = चक्कवाअ = चकवा ]
चकाकणें [ चकास्ट दीप्तौ ] (ग्रंथमाला)
चकाटणें [ ( कथ्) चाकथ्यते = चाकटणें, चकाटणें ] ( भा. इ. १८३६)
चकाट्या १ [ कत्थ् १ श्लाघायाम्, चाकत्थ्य = चकाट ] ( धातुकोश-चाकाट २ पहा)
-२ [ चक्राट (लुच्चा, सोदा) = चकाट ] ( भा. इ. १८३२ )
चकारी १ [ चक्रांगी ( दीनार नाणें ) = चकारी ]
भिक्षुकाला एक चकारी मिळाली म्हणजे एक दीनार मिळाला. दीनार ज्या वेळीं प्रचारांत होते त्या कालापासून चकारी हा शब्द भिक्षुक व सराफ यांच्यांत प्रचलित झाला.
-२ [ चक्राट (दीनार रुप्याचा ) चक्राटिका = चकारी ] चकारी दक्षिणा मिळाली म्हणजे एक रुप्याचा दीनार बक्षीस मिळाला, सध्या चवली.
चक्क १ [ चक्क् दुःखे ] चक्क फिरले ( डोळे) इंगा फिरला म्हणजे. ( धा. सा. श. )
-२ [ प्रत्यक्ष = फार चक्क = फार चक्क = चक्क ] प्रत्यक्षं व्रूते म्हणजे चक्क बोलतो. चक्क म्हणजे डोळ्यासमोर. ( भा. इ. १८३४)
चक्का [ चाषकिकं दधि = चक्का दहीं ] चषक म्हणजे लहान पेल्यांत घट्ट विरजलेलें दही.
चखाळ [ खल् १ संचये. चाखल्य = चखाळ, चोखाळ ] ( धा. सा. श. )
चंग [ संगः = चंग ( कंवर बांधणें ) स = च ]
चंगळ [ चंगलता = चंगळ, चंगळाई ]
चंगळ म्हणजे श्रेष्ठपणा, चांगलेपणा, सुकाळ.
चघळणें १ [(गृ) जिगल् (सन्नत) = चिघल = चघळ (णें) गृ (गिळणें) ] (भा. इ. १८३३)
-२ (गृ) जीगीर्यते =जिगिळणें = चिघिळणें = चघळणें ] (भा. इ १८३६)