लेखांक २३.
*
अखंडित-लक्ष्मी-आळंकृत राजमान्य राजश्री मोरो त्रिमल गोसावियांसि
पोष्य राघो बदलाल नमस्कार विनंति उपेरी गोसावि पाठविळे तें पाऊन अभिप्राय कळों आला की स्वमीचे आज्ञेवरुनु लिहिले की मौजे चिखली तेथील पाटिल व कुणबी व कुलकर्णी हिसेबाबदल भांडत आहेती त्यास दाहा वरसे जाळी आहेती. कुणबी ह्मणताती कीं निवाडा राजश्री पंतीं सन सलासांत केला आहे, तो निवाडियाचे कागद हारपले ऐसे कुणबी ह्मणताती. तरी हा निस्चय तुमच्या पत्रावरी आला आहे तरी हा निवाडा जाला ऐसे आपणास कलले असिले तरी उतर तैसेच लिहिले पाहिजे. तेणेप्रमाणे यांस वर्तउनु जरी आपणास ठावके नसेल तरी सिवाजी कुलकर्णी व कुणबी आणुन हिसेब पाहाता कुणबियाचे हिसेबे सिवाजीवरी पैके निघो लागले. इतकियामधे कुलकर्णी पलौनु गेला तो हा कालपर्यंत आपण देखिला नाही. परंतु कुलकर्णी खोटा आहे विदित असावे हे विनंति लक्ष एक